
आजऱ्यात संजय गांधी योजनेच्या १६१ प्रकरणांना मंजूरी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुका संजय गांधी निराधार समितीची बैठक येथील मध्यवर्ती तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात झाली. समितीचे अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. संजय गांधी योजनेतील १६१ प्रकरणे यावेळी मंजूर करण्यात आली. कागदपत्रे अपूर्ण असल्यामुळे १७ प्रकरणे फेर चौकशीसाठी पाठवण्यात आली आहेत.
तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी संजय ढमाळ, आजरा नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी राकेश चौगले प्रमुख उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीनंतर संजय गांधी निराधार समितीची पहिलीच बैठक झाली. श्री. डिसोझा म्हणाले, संजय गांधी, इंदिरा वृध्दापकाळ योजना, श्रावण बाळ योजना या सर्व योजनांची माहीती जनतेपर्यंत गेली पाहीजेत. पात्र लाभार्थी निवडले पाहीजेत. श्रावण बाळ योजनेसाठी ८७ प्रकरणे आली होती. यापैकी ६८ प्रकरणांना मंजूरी देण्यात आली. १७९ प्रकरणे आली होती. यापैकी १०० प्रकरणे मंजूर करण्यात आली. कागदपत्रे अपूर्ण असलेली प्रकरणांची फेर चौकशीसाठी पाठवण्यात आली आहेत.
यावेळी जी. एम. पाटील, दत्ता पाटील, निवृत्ती शेंडे, गीता देसाई, श्वेता सरदेसाई, सयाजी देसाई, चंद्रकांत खंदाळे यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. नायब तहसीलदार विकास कोलते यांनी स्वागत केले. वरिष्ठ कारकुन श्री. बारापत्रे यांनी आभार मानले.
आजऱ्यात बकरी ईद उत्साहात

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरासह तालुक्यात बकरी ईद उत्साहात साजरा करण्यात आला.
येथील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आले.मौलाना अ.करिम काकतीकर यांनी कुतबा पठण केले तर हाफिज अब्दुल कांडगावकर यांनी नमाज पठण केले . नमाज पटनानंतर एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
ईदच्या पार्श्वभूमीवर गृहरक्षक दलाचे जवानांसह पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
प्राथमिक विद्यामंदिर, बहीरेवाडी शाळेस संगणक प्रदान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
माजी सैनिक विष्णू चोथे, बहिरेवाडी यांचे सुपुत्र असिस्टंट मॅनेजर सेनिकॉर्न टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमीटेड, पुणे व डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन ट्रस्टी संदीप चोथे व डॉ. प्रियांका चोथे व चोथे परिवार यांच्या वतीने प्राथमिक विद्यामंदिर, बहिरेवाडी शाळेस ४ संगणक संच भेट देण्यात आले .
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आजी-माजी सैनिक तालुका वेल्फेअर असोसिएशन गडहिंग्लज तालुकाध्यक्ष कुमार पाटील व सचिव रामकृष्ण शेंडे, लोककला महोत्सवाचे प्रमुख गणपती नागरपोळे ,डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन व विद्यार्थी विकास परिषद, कोल्हापूर चे अध्यक्ष डॉ. सचिन पोवार, शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष अरविद मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच रत्नजा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
यावेळी बहिरेवाडी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुनील चव्हाण, सदस्य जनार्दन कापसे, रामचंद्र कापसे,माद्याळ सैनिक संघटने सचिव मिनीन रॉड्रिक्स,अजित मगदुम, उत्तम आयवाळे, प्रीती कांबळे, अरुणा यादव, विठ्ठल कदम, अशोक जोधळे, पाटील ,संजय पोवार, अमित कडाकणे , ओमकार मिरजकर, आदींसह विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन डी. एल.चौगले यांनी तर आभार तानाजी गिरी यांनी मानले.
विशेष ग्रामसभेत टोल माफीचे ठराव करा : संजय पाटील

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
२० जून रोजी शासनाच्या आदेशाप्रमाणे विशेष ग्राम सभा आयोजीत केल्या आहेत. सदर ग्रामसभेत कामकाज सुरू असलेल्या संकेश्वर-बांदा हायवेवरती आजरा एम. आय. डी. सी. येथे टोल नाका उभारण्यात येत आहे. सदरचा टोल नाका झाला तर चार चाकी किंवा त्यावरील मोठ्या वाहनांना ना मासीक ३३०/- रु.प्रमाणे टोल भरावा लागणार आहे.
याबाबत जनजागृती करणे संदर्भात ग्रामसभेत नागरीकांना माहिती द्यावी आणि आजरा तालुक्यातील जनतेला टोल माफी मिळणे बाबत ठराव पारीत करावा. त्या मध्ये एक तर टोल माफी किंवा टोलचे ठिकाण घाटकरवाडीच्या पुढे घ्यावे असे ठराव पारीत करून त्याची एक प्रत तहसील कार्यालय, तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांचे नावे द्यावी असे आवाहन संघटनेचे तालुकाध्यक्ष व शिवसेना ( शिंदे गट) तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी केले आहे.

