mrityunjaymahanews
कोल्हापूरठळक बातम्या

ऊस ट्रॅक्टर चालकावर धारदार शस्त्राने हल्ला बेलेवाडी घाटातील प्रकार

 

 

ऊस ट्रॅक्टर चालकावर धारदार शस्त्राने हल्ला

बेलेवाडी घाटातील प्रकार

 

        उत्तूर-बेलेवाडी मार्गावरील बेलेवाडी घाटात ऊस वहातुक करणाऱ्या तरुणावर अज्ञातांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. यामध्ये ट्रॅक्टर चालक अक्षय बाबूराव पाटील (वय २७, रा. चन्नेकुप्पी, ता. गडहिंग्लज) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी (१८) रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला असून पूर्ववैमनस्यातून अथवा दुसऱ्या वाहनाला जाण्यासाठी बाजू देण्याच्या कारणावरून सदर प्रकार घडला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


        याबाबत  मिळालेली अधिक माहिती अशी की, चन्नेकुप्पी येथील अक्षय शुक्रवारी रात्री चन्नेकुप्पी येथून उसाने भरलेला ट्रॅक्टर घेऊन उत्तूरमार्गे बेलेवाडी काळम्मा येथील कारखान्याकडे जात होता. रात्री ११:३० वाजता बेलवाडी घाटात त्याचा ट्रॅक्टर रस्त्याच्या उजव्या बाजूच्या शेतवाडीत घुसला. त्यामुळे अपघात झाला, असे समजून रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी ट्रॅक्टरकडे धाव घेतली. त्यावेळी तो जखमी दिसून आला. अज्ञातांनी त्याच्यावर हल्ला केला होता. त्याला गडहिंग्लजच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

        या प्रकारामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या गाड्यांच्या चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

 

 

राजारामबापू हे सहकार कोळून प्यालेले व्यक्तिमत्त्व : आ. हसन मुश्रीफ

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व आजरा साखर कारखान्याचे माजी संचालक स्व. राजारामबापू देसाई हे सहकार कोळून प्यालेले व्यक्तिमत्व होते. सहकारांमध्ये नोकऱ्यांचा बाजार त्यांनी कधीच न मांडल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते निष्ठेने त्यांच्या पाठीशी राहिले असे प्रतिपादन माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.

स्व. राजारामबापू देसाई यांच्या पंधराव्या स्मृतीदिनानिमित्त स्व. राजारामबापू देसाई फाउंडेशनच्या वतीने आयोजित विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे,कॉम्रेड संपत देसाई, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई, प्रा. पी. डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आमदार मुश्रिफ पुढे म्हणाले, सहकारांमध्ये स्वतःला मालक न समजता विश्वस्त म्हणून काम करण्याची गरज आहे. सद्यस्थितीला राजारामबापू,रवींद्र आपटे यांच्यासारखी प्रामाणिक माणसे सहकारात टिकून राहणे आवश्यक आहे. बापूंच्या स्मृतिदिनानिमित्त सहकारी संस्थांच्या कारभार नेटकेपणाने व पारदर्शकपणे चालवू असा संकल्प सर्वांनी मिळून करूया असे आवाहनही करत बापुंमुळेच आपणाला जिल्हा बँकेत सर्वप्रथम अध्यक्षपदाची संधी मिळाली अशी प्रांजळ कबुलीही आ.मुश्रीफ यांनी दिली.

यावेळी आ. हसन मुश्रीफ व मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम केलेल्या मान्यवरांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
प्रमुख वक्ते प्रा. पी. डी. पाटील यांनी समाजावर संस्कार न झाल्यामुळे भ्रष्टाचारासारखी समस्या मोठ्या प्रमाणावर दिसू लागली आहे. वाचनाचा अभाव व विचारांची न होणारी पेरणी हेसुध्दा यामागचे कारण आहे. विचारांची पेरणी करणे, विचाराप्रमाणे आचार अमलात आणणे या गोष्टींचे पालन केल्यास निश्चितच संस्था व संघटना मोठ्या होण्यास मदत होते. भौतिक संपत्ती वाढवण्यापेक्षा विचारांचे बळ वाढवणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये १५७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. पुरस्कारार्थींच्या वतीने ग्रामसेवक मुरलीधर कुंभार, उद्योजक दत्तात्रय जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रम प्रसंगी जिल्हा दूध संघाच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, उपनगराध्यक्षा सौ. अस्मिता जाधव, मनसेचे जिल्हाप्रमुख नागेश चौगुले, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष संभाजी पाटील, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष जनार्दन टोपले, तालुका संघाचे अध्यक्ष एम. के.देसाई, सुभाष देसाई, मधुकर यलगार, बबन पाटील,सौ.रचना होलम,सौ.कामिना पाटील, सौ. सुरेखा देसाई, शिवसेना तालुकाप्रमुख राजू सावंत, जनार्दन बामणे, सुनील दिवटे, अनिकेत कवळेकर, महादेव पोवार, श्रीपती यादव, विजय देसाई, विजय कुंभार, मारुतीराव घोरपडे रणजीत देसाई, जोतिबा चाळके, सुभाष देसाई, राजू होलम, फाउंडेशनचे अध्यक्ष वृषाल हुक्केरी, तुकाराम प्रभू, रवींद्र देसाई, दौलती पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

उपस्थितांचे स्वागत आजरा साखर कारखान्याचे संचालक अनिल फडके यांनी केले. प्रास्ताविक युवराज पवार यांनी केले तर आभार जनार्दन बामणे यांनी मानले. एकनाथ बोलके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.

आमचा घोटाळा करशीला…

चारच दिवसांपूर्वी अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांच्या वाढदिवस प्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी अण्णा व आपण एकत्र आलो तर तालुक्यात काहीही करू शकतो असे विधान केले होते. नेमका हाच धागा पकडत आमदार हसन मुश्रीफ यांनी दोन मित्र ठरवून काहीही करू शकतात परंतु मुकुंदराव तुम्ही आमच्या घोटाळा करशीला… असा मिश्किल टोला लगावल्याने कार्यक्रमात एकच हशा पिकला.

 

मुकुंददादांचा वाढदिवस उत्साहात

आजरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

वाढदिवसानिमित्त माजी ग्रामविकास मंत्री,आमदार हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी, आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे, उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी, संचालक मलिककुमार बुरुड, अनिल फडके, दशरथ अमृते, जनार्दन टोपले,शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुकाप्रमुख युवराज पवार राजेंद्र सावंत, शहर प्रमुख ओंकार माद्याळकर, गोकुळ दूध संघाच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर, दिग्विजय कुराडे, नगरसेवक अभिषेक शिंपी, अमर चव्हाण, जयसिंग चव्हाण, मनसे जिल्हाप्रमुख नागेश चौगुले, जयकुमार मन्नोळी, गंगाधर व्हसकोटी, अल्बर्ट डिसोजा, महादेव पोवार, माजी सभापती उदय पवार, सौ. कामिनी पाटील, सौ.रचना होलम, रणजीत देसाई, रणजीत के पी पाटील, बाळासाहेब पाटील, तानाजी गडकरी, वसंतराव धुरे, विष्णुपंत केसरकर, राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष अनिकेत कवळेकर, जिल्हा युवा राष्ट्रवादीचे सरचिटणीस देवदास बोलके, मसनू सुतार, सतीश पाटील, बाबुराव नाईक, महादेव उर्फ बापू टोपले, विलास नाईक, सहदेव नेवगे, सचिन इंजल पांडुरंग सरंबळे, धनाजी देसाई, जी.एम. पाटील, बबन पाटील, देवदास आजगेकर, मारुती मोरे,एम . बी.पाटील, सुभाष दोरूगडे, सर्जेराव देसाई, अभिषेक शिंपी, सचिन देसाई, अश्विन डोंगरे, प्रा.डॉ. सुधीर मुंज, भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार, सूर्यकांत नार्वेकर यांच्यासह मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून देसाई यांना शुभेच्छा दिल्या.

संबंधित पोस्ट

आज-यात आज माजी सैनिक पतसंस्थेचा रौप्य महोत्सव …. आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह मान्यवर राहणार उपस्थित…भारतीय जनता पार्टी आजरा युवा मोर्चा  मार्फत  रक्तदान शिबिर उत्साहात

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा येथील शिवाजीनगर घाट परिसरात हिरण्यकेशी नदीपात्रात आढळला पुरुषाचा मृतदेह

mrityunjay mahanews

रणधुमाळी

mrityunjay mahanews

आजरा येथे विकास कामासाठी भरीव निधी: आमदार प्रकाश आबिटकर यांची माहिती

mrityunjay mahanews
error: Content is protected !!