



चोरी केलेल्या सात मोटरसायकलसह एकजण आजरा पोलिसांच्या ताब्यात
आजरा: (क्राईम न्यूज प्रतिनिधी)
आजरा- पेरणोली- देवकांडगाव मार्गावर गस्त घालत असताना देवकांडगाव येथील रस्यावर संशयीतरित्या मोटरसायकलवरून जाणाऱ्या शशांक शिवाजी पाटील, (वय. २७, रा. सानेगुरूजी वसाहत, गंधर्वनगरी कोल्हापूर) या व्यक्तीकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याच्याजवळ चोरीस गेलेली मोटारसायकल असलयाचे समजले. सदरची मोटरसायकल ही संभाजी चौक आजरा येथून चोरल्याचे कबूल केले. त्यानंतर सदर आरोपीस अटक करून अधिक चौकशी केली असता, त्याने कोल्हापूर शहरातील तसेच आजरा, गडहिंग्लज परीसरातून ६ मोटारसायकली चोरी केल्याचे कबूल केले आहे. आरोपी शशांक शिवाजी पाटील याचेकडून एकूण दोन लाख वीस हजार रुपये किंमतीच्या ७ मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. शैलेश बलकवडे , कोल्हापूरचे अपर पोलीस अधीक्षक सौ. जयश्री गायकवाड, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सोो गडहिंग्लज विभाग गडहिंग्लज श्री. राजीव नवले, आजरा पोलीस ठाणेप्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. सुनील केशव हारूगडे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. युवराज एस. जाधव, अशोक एस. शेळके, आनंदा एस. नाईक, प्रशांत पी. पाटील, संदीप मसवेकर, चेतन घाडगे, विशाल कांबळे, अनिल तराळ यांनी सदरची कारवाई केलेली आहे.
देशी दारू विक्री करणारा एकजण गजाआड
उत्तुर (ता. आजरा) येथे बेकायदेशीररित्या देशी दारूची विक्री करत असताना संतोष नाना मांडे (वय ४२ रा. कुंभार गल्ली उत्तूर) याला ८६४० रुपयांच्या मुद्देमालासह पोलिसांनी रंगेहात पकडून त्याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे. रविवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास उत्तूर येथील कुंभार गल्लीत मांडे याला पोलिसांकडून रंगेहात पकडण्यात आले. याबाबतची फिर्याद दिपक सुभाना किल्लेदार यांनी पोलिसात दिली आहे.

