mrityunjaymahanews
अन्य

मुंगूसवाडी येथे मारामारी…सहा जणांविरोधात गुन्हा नोंद

सुलगाव येथे वृद्धाचा मृतदेह आढळला

सुलगाव (ता. आजरा) येथे शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास नंदकुमार वसंतराव देसाई यांच्या हद्दीतील गवतामध्ये वृद्धाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. गेल्या दीड महिन्यापासून बेपत्ता असलेल्या सुलगाव येथील महादेव गंगाजी डोंगरे(वय ९०) यांचा सदर मृतदेह असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृतदेहावरील कपडे व इतर वर्णन पाहता सदर मृतदेह डोंगरे यांचा असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याबाबतची वर्दी बबन महादेव डोंगरे यांनी आजरा पोलिसात दिली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

मुंगूसवाडी येथे मारामारी

सहा जणांविरोधात गुन्हा नोंद

परस्परविरोधी फिर्यादी दाखल

मुंगूसवाडी (ता. आजारा) येथे जमीन वहिवाट व परस्परा विरोधात गैरसमजातून झालेल्या वादाचे पर्यवसान मारामारीत होऊन एकमेकांना शिवीगाळ करणे, धमकी देणे, मारहाण करणे अशा बाबींचा पार्श्वभूमीवर पोलिसांनी सहा जणाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. याबाबत शंकर पांडुरंग जाधव व बबन नारायण कोंडूसकर यांनी परस्पर विरोधी फिर्यादी दिल्या आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की गुरुवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास शंकर जाधव व बबन कोंडुसकर यांच्यामध्ये जमिनीची वहीवाट व एकमेकांना बदनाम केल्याचा आरोप करत वाद सुरू झाला . या वादाचे पर्यावासान अखेर मारामारीत झाले. यामध्ये शंकर जाधव व बबन कोंडुसकर यांना मारहाण झाल्याचे परस्परविरोधी फिर्यादीत म्हटले आहे.

शंकर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी बबन नारायण कोंडुसकर व सौ अंजना बबन कोंडुसकर यांच्या विरोधात तर बबन नारायण कोंडुस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शंकर पांडुरंग जाधव, दयानंद गुंडू रेडेकर, अजित धोंडीबा जाधव , मारुती बंडू जाधव यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यावेळी एकमेकांना जीवे मारण्याची धमकी देण्याबरोबरच शिवीगाळ झाल्याचेही फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत.

अन्यथा रस्त्याचे काम करू देणार नाही…

आज-यात शेतकरी आक्रमक

विश्वासात घेण्याची मागणी, प्रांताधिकाऱ्यांचे सहकार्याचे आवाहन

केवळ वळणे व विस्तारीकरण याचा विचार न करता जेवढी शेत जमिन रस्त्यात जाते त्याची नुकसान भरपाई शासनाने द्यावी. शेतकऱ्यांना विश्वासात घेवून काम करावे. अन्यथा रस्त्याचे काम करू दिले जाणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी या वेळी दिला. रस्ता हा सर्वासाठी आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शासन व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन भुदरगड आजराच्या प्रांताधिकारी वसुंधरा बारवे यांनी केले. आजरा शहरातील रहिवाशांनी मार्चाने येवून प्रांताधिकारी श्रीमती बारवे यांना निवेदन दिले.

येथील तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात शेतकरी, आजरा शहरवासीय व अधिकारी यांची बैठक झाली. प्रातांधिकारी श्रीमती बारवे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. महामार्ग प्राधीकरणाचे उपअभियंता टी. एस. शिरगुप्पे प्रमुख उपस्थित होते. पावर पाइंटने रस्त्याबाबत सादरीकरण अधिकाऱ्यांनी केले. या वेळी झालेल्या चर्चेत शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्याचे काम गाफिल ठेवून केले जात असल्याचा आरोप केला.

कॉम्रेड. संपत देसाई म्हणाले, सध्याच्या रस्त्याचा काही भाग हा शेतकऱ्यांच्या नावावर असून त्याची नुकसान भरपाई मिळाली पाहीजेत. त्याचबरोबर रस्त्याचे विस्तारीकरण व मजबूतीकरणासाठी पुन्हा आवश्यक जमिन संपादित केली तर त्याचीही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहीजेत. हा रस्ता व्यावसाईक आहे. याला टोल लावून व्यवसाय होणार आहे. त्यामुळे शेतक-यांना समृध्दी महामार्गाच्या दराने नुकसान भरपाई मिळावी. त्याचबरोबर ज्या शेतक-यांची जमिन रस्त्यात जाणार आहे. शेतकऱ्यांना स्पष्टता येण्यासाठी गावचावडीवर माहीतीचा जाहिरनामा लावावा.

कॉम्रेड शिवाजी गुरव म्हणाले, रस्त्याबाबत प्रशासनाने स्पष्टता ठेवलेली नाही. कोणालाही विश्वासात घेतलेले नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रथम सोडवा मगच रस्ता करावा. कॉ. संजय तर्डेकर म्हणाले, प्रश्न सोडवण्यासाठी संघटना आहेत. शेतकऱ्यांना विश्वासात घेवून रस्त्याचे काम करा. शेतकऱ्यांचे प्रश्न पहिल्यांदा शासनाने सोडवावेत अन्यथा काम करू देणार नाही असा इशारा सुधीर देसाई यांनी दिला.
विलास नाईक यांनी रस्त्यावर पडलेले खड्डे मुजवण्याची मागणी केली. शिवाजी गुडूळकर, समीर मोरजकर, अरुण देसाई, गणपती येसणे, जयवंत थोरवतकर, बशीर दरवाजकर, गोविंद पाटील,राकेश करमळकर,विजय थोरवत, प्रकाश मोरुसकर, हंबीरराव अडकूरकर यांनी चर्चेत भाग घेतला. यावेळी जयवंतराव शिंपी, मानसिंगराव देसाई, दिनेश कृरुणकर, दत्तात्रय मोहीते, गणपतराव डोंगरे, यशवंत इंजल,संजय इंगळे,योगेश पाटील,सूरज जाधव,राजेंद्र परीट,विवेक बिल्ले,सौ.स्नेहल देसाई,सौ.लक्ष्मी भोई,सौ.राजश्री बिल्ले,सौ.मीनल इंजल,प्रकाश हरमळकर, व आजरा, गडहिंग्लज येथील शेतकरी उपस्थित होते.

महिलेच्या मृत्यूनंतर माहेरवासीय आक्रमक

देवर्डे येथे विहीरीत सापडला होता मृतदेह

देवर्डे (ता. आजरा) येथे सौ. दिपा दिगंबर पाटील या महीलेचा मृतदेह विहीरीत सापडला. गुरुवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेची आजरा पोलीसात नोंद झाल्यानंतर पोलीसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून तो आजरा ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान सौ. दीपा यांच्या मृत्यूची बातमी सुपे (ता. चंदगड) येथील माहेरी समजल्यानंतर रात्री उशीरा मोठ्या संख्येने सुपे येथून आलेल्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतली. मृत्यबाबत संशय व्यक्त करत प्रथम मृत्यूचे कारण स्पष्ट होवू देत त्यानंतर मृतदेहावर अंतिम संस्कार करावेत अशी भूमीका घेत मृतदेह ताब्यात घेण्यास मज्जाव केला.

सकाळी सदर प्रकार स्थानिक पोलीस प्रशासनाच्या लक्षात आल्यावर तातडीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल हारुगडे तहसीलदार विकास अहिर, निवासी नायब तहसीलदार डी.डी. कोळी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी आजरा ग्रामिण रुग्णालयात धाव घेतली. या वेळी सौ. दीपा यांच्या माहेरच्या नातेवाईकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न झाला. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करा असा माहेरवासियांकडून स्थानिक वैदयकिय अधिकाऱ्यांकडे आग्रह करण्यात आला. अखेर माजी वैदयकिय अधिक्षक डॉ. अशोक फर्नाडीस यांना बोलावण्यात आले.

उपस्थितासह अधिकारी वर्गाशी त्यांनी चर्चा करून सदर शवविच्छेदनाचा व्हिसेरा राखून ठेवला असून पुणे येथील वैदयकिय प्रयोगशाळेत पाठवल्यानंतर त्यांचा अहवाल येईल व त्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल असे स्पष्ट केले. वरिष्ठ अधिका-यांच्या मध्यस्थीनंतर सुपे येथील ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्यास सहमती दर्शवली.

या वेळी मोठ्या संख्येने देवर्डे व सुपे येथील ग्रामस्थ एकत्र आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

BIG BREAKING

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आज-यात बैलगाडी शर्यती वेळी राडा.. बैलांसह तिघे झाले जखमी… पाच जणांविरोधात गुन्हा नोंद

mrityunjay mahanews
error: Content is protected !!