सोमवार दिनांक ११ नोव्हेंबर २०२४


ट्रान्सफॉर्मर बदलताना विजेचा धक्का लागून मजुराचा मृत्यू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा ते परोली मार्ग शेजारील चित्रा नदीच्या पात्रालगत असले परोली ता. आजरा हद्दीत जुन्या एमएसईबीचे ट्रान्सफॉर्मर वरील एबी स्विचपाशी चढलेल्या मोहरलाल मेझलामांझी बेसरा (वय २३ व्यवसाय- एमएसईबी मजुर, सध्या रा. कडगाव ता. भुदरगड जि. कोल्हापुर येथे मुळ रा. कसीयाडीह, पोस्ट- बडकी, ता. ठिकहरा, जि. बोकारो, झारखंड) या मजुराचा मृत्यू झाला.
याबाबतची वर्दी बाबुदास संजुलमांझी बेसरा रा. कडगाव ता. भुदरगड यांनी दिली आहे.रविवारी दुपारी १३.३० वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली.
आजरा पोलीस स्टेशनचे पांडुरंग येलकर पुढील तपास करीत आहेत.

विकास कामांच्या जोरावर आबिटकर यांच्या पाठीशी : पेरणोलीत बैठक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार प्रकाश आबिटकर यांनी पेरणोली पंचक्रोशीत विकास कामांचा डोंगर उभा केला आहे. पाच-दहा वर्षांनी येऊन विकासाची भाषा करणाऱ्या मंडळींना विकास म्हणजे काय हे दाखवून देण्याचे काम त्यांनी केले असून पंचक्रोशीत झालेल्या विकास कामामुळे या भागातून त्यांना घसघशीत मताधिक्य देऊ असे प्रतिपादन पेरणोली येथील मतदारांनी केले. विकासासाठी त्यांना निवडून आणण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.
भाजप शाखा पेरणोली मार्फत कार्यकर्ता बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीमध्ये आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पाठीशी राहून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी निर्धार करण्यात आला. यावेळी श्री.अरुण देसाई,श्री.सुधीर कुंभार,श्री.मलिक बुरुड यांनी मार्गदर्शन केले. भाजपा कार्यकर्ते पूर्ण ताकदीनिशी आबिटकर यांना विजयी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले
भाजप जिल्हा कार्यकारीणी सदस्य जयवंत येरुडकर यांनी या बैठकीचे नियोजन केले होते.

विकासासाठी शिवाजी पाटील यांनाच विजयी करा : अशोक चराटी
आजरा येथे प्रचार सभा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
चंदगड मतदारसंघाचा विकास हा एकच ध्यास मनी बाळगत अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन अण्णाभाऊ शैक्षणिक संस्था समूहाचे अशोक चराटी यांनी येथे केले.
आजरा येथे अण्णाभाऊ शैक्षणिक संस्था समूहातर्फे शिवाजी पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. अशोक चराटी म्हणाले, ‘चंदगड मतदारसंघाचा विकासासाठी पुन्हा एकदा शिवाजी पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहू.’
शिवाजी पाटील म्हणाले ‘विद्यार्थी ,नोकरदार , शेतकरी, लष्करातील निवृत्त जवान यांच्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. चंदगड भागात दहा कंपन्या, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, रोजगार मिळावे, सैनिक शाळा, स्पोर्टस् ॲकॅडमी उभी करून या माध्यमातून मतदारसंघाचा विकास हे ध्येय समोर ठेवले आहे.’
यावेळी आजरा अर्बन बँकेचे अध्यक्ष रमेश कुरुणकर, डॉ. अनिल देशपांडे, डॉ. दीपक सातोस्कर, विजयकुमार पाटील, विलास नाईक, मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, बाळ केसरकर, जयवंत सुतार, समीर पारदे, दशरथ अमृते, संदीप चौगुले, विकास बागडी, बापू होडगे, संतोष चौगुले, सुरेश रेडेकर, एम. टी. पाटील उपस्थित होते

बंद पडलेला गडहिंग्लज साखर कारखाना सुरू करून मंत्री हसन मुश्रीफ यांनीच शेतकऱ्यांना व कामगारांना आधार दिला :सतीश पाटील
गिजवणे येथील सभेला जोरदार प्रतिसाद….

गडहिंग्लज : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बंद पडलेला गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीच सुरू करून शेतकऱ्यांसह कामगारांनाही आधार दिला होता. परंतु; त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांच्या त्रासाला कंटाळूनच ब्रिस्क कंपनी हा कारखाना सोडून गेली, असा आरोप जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर यांनी केला. आत्ता निवडणुकीनंतर डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्या मनमानी आणि भ्रष्टाचारी कारभारामुळेच पुन्हा शेतकरी आणि कामगारही अडचणीत आले आहेत, असेही ते म्हणाले.
गिजवणे ता. गडहिंग्लज येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
श्री. पाटील पुढे म्हणाले, सौ. स्वाती कोरी पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्यावर धादांत खोटे आरोप करीत आहेत. २०१३ मध्ये कै. ॲड. शिंदे यांची सत्ता होती. कर्मचाऱ्यांचा ११ महिन्यांचा पगार थकला होता, त्यांच्यावर शेतमजूरीला जाण्याची वेळ आली होती. या परिस्थितीत आम्हा सर्वांचा आग्रह आणि पाठपुराव्यामुळे मंत्री मुश्रीफ यांनी ब्रिक्स कंपनीला कारखाना चालवण्यास घ्यायला लावला. आठ वर्षे कारभार सुरळीत असताना नंतर या मंडळींच्या त्रासामुळेच कंपनी कारखाना सोडून गेली. तसेच; वर्षापूर्वी मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीनंतर डॉ. प्रकाश शहापूरकर यांना अध्यक्ष केले. त्यांनी कोणालाही विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत भ्रष्टाचाराचे महापाप केले. त्याचीही चौकशी सुरू आहे, यातून सर्व सत्य बाहेर येईल.
पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गेल्या पंधरा वर्षांपासून पासून कडगाव- गिजवणे जिल्हा परिषद मतदार संघ कागल विधानसभा मतदारसंघात समाविष्ट झाला. या परिसरातील गाव-खेड्यांचा सखोल अभ्यास करून सुरुवातीच्या काळात मूलभूत सोयी -सुविधा पुरवण्याकडे लक्ष दिले. नंतरच्या काळात मिळालेल्या विविध मंत्रिपदाच्या माध्यमातून सर्वच गावांमध्ये कोट्यावधींचा निधी दिला. मूळच्या कागल मतदारसंघापेक्षा अधिक प्रमाणात निधीची उपलब्धता केल्यामुळे प्रचंड विकास कामांच्या माध्यमातून गावेच्या गावे सर्वांगसुंदर बनली. येथील लोकांनी मला नेहमीच पाठबळ दिल्यामुळे आपल्या सर्वांच्या ऋणात राहीन, असेही ते म्हणाले.
गोडसाखर उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य ॲड. हेमंत कोलेकर, मराठा संघटनेचे देसाई, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा सौ. शितल फराकटे, विजय काळे यांचीही मनोगते झाली.
व्यासपीठावर गडहिंग्लज कारखाना अध्यक्ष प्रकाशभाई पताडे, किरण कदम, सुषमा पाटील, सौ. शैलजा पाटील, सरपंच पौर्णिमा कांबळे, एस. आर. पाटील, के. बी. पोवार, पी. एस. देसाई, मिलिंद मगदूम, अनुप पाटील, पृथ्वीराज पाटील, सुदेश चौगले, नितीन पाटील, अमित देसाई, भूषण गायकवाड, संतोष चव्हाण, अजय बुगडे आदी प्रमूख मान्यवरांसह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.स्वागत उपसरपंच आदित्य पाटील यांनी केले. आभार रमेश पाटील यांनी मानले.

सरंबळवाडी येथील विजय निर्धार सभेस उत्स्फूर्त प्रतिसाद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सरंबळवाडी ता. आजरा येथे भाजपा नेते रमेश रेडेकर यांनी आमदार राजेश पाटील यांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या विजय निर्धार सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांचा मिळालेला हा प्रतिसाद म्हणजे विजयाची नांदी असल्याचे मत यावेळी उद्योजक रमेश रेडेकर यांनी व्यक्त केले.
यावेळी श्री.संग्रामसिंह कुपेकर (भाजप नेते),श्री.रमेशराव रेडेकर (भाजप नेते), सौ.सुनीता रेडेकर (माजी जि.प. सदस्या), श्री . आदित्य रेडेकर, श्री.एम. के. देसाई (व्हा चेअरमन आजरा साखर),श्री.नांदवडेकर सर (संचालक आजरा साखर),श्री. दिंगबर देसाई, (संचालक आजरा साखर),श्री.राजू मुरुकटे (संचालक आजरा साखर), श्री.अभय देसाई (माजी अध्यक्ष बाजार समिती), श्री. तानाजी देसाई (नेते शेतकरी संघटना), श्री. मधुकर यलगार (राष्ट्रवादी नेते), श्री. कृष्णा कुंभार (सरपंच निंगुडगे), श्री.संजय देसाई (नेते शेतकरी संघटना), श्री.जनार्दन बामणे (आजरा संघ मॅनेजर), श्री.संभाजी पाटील (संचालक आजरा साखर), श्री.संजय कांबळे (नेते सरपंच संघटना), सौ.प्रियंका आजगेकर (सरपंच होनेवाडी), सौ.सुनीता कांबळे (सरपंच सरंबळवाडी), सौ.सुष्मिता पाटील (सरपंच कानोली), श्री.प्रमोद देसाई (डे.सरपंच निंगुडगे), श्री.दत्ता परीट (मा सरपंच मलिग्रे), श्री.सचिन सावंत (ग्रामपंचायत सदस्य कागिनवाडी), श्री.देवेंद्र बोलके ( डे सरपंच बोलकेवाडी), श्री.मारुती सरंबळे (ग्रामपंचायत सदस्य सरंबळवाडी), श्री.गजानन देशपांडे (मा सरपंच मलिग्रे), श्री.युवराज जाधव (खानापूर), ज्येष्ठ नागरिक संघटना (सरंबळवाडी), ज्येष्ठ नागरिक संघटना (कानोली) उपस्थित होते.
मसणू सुतार यांचा पाठिंबा...
आमदार राजेश पाटील यांना आजरा पंचायत समितीचे माजी सभापती मसणू सुतार यांनी पाठिंबा जाहीर केला आहे . विधानसभा मतदारसंघात झालेली विकास कामे विचारात घेऊन सदर पाठिंबा देत असल्याचे सुतार यांनी स्पष्ट केले आहे.

अप्पी पाटील यांची प्रचारात आघाडी

महागाव : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा जोर शिगेला पोहोचला असून अपक्ष उमेदवार विनायक उर्फ अप्पी पाटील यांनी घेतलेली मतदार संघातील प्रचाराची आघाडी पाहता यावेळी चंदगड विधानसभा मतदारसंघात पाटील यांचे वारे पुन्हा एक वेळ वाहू लागले आहे.
गत विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी रिंगणात उतरून आपली पाटील यांनी जोरदार मुसंडी मारली होती. यावेळी पाटील यांच्या पाठीशी गोपाळराव पाटील,पी.डी.पाटील,कॉ. संपत देसाई यांच्यासह अनेक मंडळी असल्याने या मंडळींनी प्रचाराचे रान उठवले आहे. पाटील यांच्यासाठी शेवटच्या चार दिवसांमध्ये जोरदार घडामोडी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात असल्याने चंदगड विधानसभा मतदार संघामध्ये चुरशीची लढत निर्माण झाली आहे.

लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..
तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त...
✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
✅ इतर अनेक सुविधा


🏡साईटचा पत्ता :
समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा
☎️ संपर्क –
+91 9527 97 3969


