

भूमी अभिलेख कार्यालयातील एक जण लाचलुचपतच्या जाळ्यात…?

….…….आजरा – प्रतिनिधी………..
आजरा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील नियमतानदार निवास वसंत पाटील (मूळ गाव कll वाळवा, ता.राधानगरी ) हे सहा हजार रुपयाची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले असल्याची खात्रीलायक बातमी आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी ..
संबंधित तक्रारदार यांच्या चिमणे ता.आजरा येथील जमिनीच्या मालमत्ता पत्रकावर (प्रॉपर्टी कार्ड ) वारसाने नावे चढवण्यासाठी त्यांनी पैशाची मागणी केली होती. यापैकी कांहीं पैसे पाटील यांना यापूर्वी पोहोच करण्यात आले होते. उर्वरित सहा हजार रुपये देण्याकरता पाटील यांनी तगादा लावल्यानंतर संबंधितांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवली होती. या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख कार्यालय येथेच सदर कारवाई झाल्याचे समजते.
पाटील यांच्यावर रीतसर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पाटील यांच्याकडून असे प्रकार वारंवार होत होते त्यामुळे झाल्या कारवाईने आजरा तालुकावासीयातून समाधान व्यक्त होत आहे .

तर मग शेतकऱ्यांना चारशे रुपये दुसरा हप्ता देण्यात अडचण काय ? स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सवाल

◼️आजरा: प्रतिनिधी◼️
आजरा साखर कारखान्याला जर गेल्या आर्थिक वर्षांमध्ये एक कोटी रुपयांचा नफा असेल तर शेतकऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दुसरा हप्ता चारशे रुपये देणे कारखान्याला फारसे अवघड नाही. संचालक मंडळाने चारशे रुपये प्रमाणे ऊस उत्पादकांना हप्ता देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आजरा साखर कारखाना संचालकांना करण्यात आले .
आक्रोश पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर आजरा कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज आजारा साखर कारखान्यावर धडक दिली. यावेळी बोलताना राजेंद्र गड्यानवर म्हणाले राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये साखरेचे दर समाधानकारक वाढले आहेत .
आजरा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करतच शेती करावी लागते रात्रंदिवस राबूनही जर शेतकऱ्याला त्याच्या घामाचे उचित दाम मिळत नसेल तर शेतकऱ्याने जगायचे कसे ? कोणत्याही परिस्थितीमध्ये दिवाळीपूर्वी घेण्यासाठी गाळप झालेल्या उसाला प्रति टन ४०० रुपये प्रमाणे दुसरी उचल द्यावी. यापुढे स्पर्धक कारखान्यांच्या उसाचे दर पाहूनच तालुक्यातील शेतकरी ऊस कोणत्या कारखान्याला घालवायचा हे ठरवणार आहेत याचे भान संचालकांनी ठेवावे .

यावेळी तानाजी देसाई म्हणाले,आजरा साखर कारखान्याला संस्थापक अध्यक्ष वसंतराव देसाई यांचे नाव संचालक मंडळांनी देऊन सभासदांना एकप्रकारे समाधान मिळवून दिले .याचप्रमाणे संचालक मंडळाने मागील हंगामातील दुसरा हप्ता चारशे रुपये प्रमाणे देण्याबरोबरच येत्या गणित हंगामाकरिता चांगला दर देण्याची गरज आहे .प्रत्येक वेळी कारखाना आर्थिक अडचणीत आहे असे सांगून शेतकऱ्यांना अडचणीत आणू नये असे आवाहनही त्यांनी केले .
कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले, गतसाली आजरा साखर कारखान्याच्या एफ आर पी पेक्षाही सुमारे १७६ रुपये इतकी जादा उचल दिली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे उर्वरित हप्ता मिळावा यासाठी आपली सकारात्मक भूमिका आहे. संचालक मंडळासमोर यावर चर्चा होऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले .
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृष्णा पाटील, संजय देसाई यांनीही झालेल्या चर्चेत भाग घेतला .
कारखाना संचालक मंडळाच्या वतीने संचालक मुकुंदराव देसाई,विष्णुपंत केसरकर , श्रीमती अंजनाताई रेडेकर , एम. के.देसाई , वसंतराव धुरे, राजेंद्रसिंह सावंत , दशरथ अमृते यांनी चर्चेत भाग घेतला.
आंदोलन प्रसंगी पंचायत समितीचे माजी उपसभापती निवृत्ती कांबळे , प्रभारी कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती , सतीश बामणे , संदीप कांबळे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
विष्णुपंत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसोबत…?
कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व माजी चेअरमन विष्णुपंत केसरकर हे आंदोलन सुरू असताना चक्क स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जाऊन बसले यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.


चौथ्या दिवशी १०८ उमेदवारी अर्ज दाखल…
आज शेवटचा दिवस

◼️आजरा: प्रतिनिधी◼️
आजरा तालुक्यातील १० ग्रामपंचायत निवडणूकीसाठी गुरुवारी एकूण १०८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. चौथ्या दिवशी दाखल करण्यात आलेल्या अर्जामध्ये सदस्य पदासाठी ८८ तर सरपंचपदासाठी २० अर्ज दाखल करण्यात आले आहेत . यामुळे गुरुवार अखेर अखेर सरपंच पदासाठी एकूण ३० तर सदस्य पदासाठी १३३ अर्ज दाखल झाले आहेत.
आज शुक्रवार हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उर्वरित अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडण्याची शक्यता आहे.
सर्व्हर डाउन असल्यामुळे पहिले दोन दिवस अर्ज दाखल झाले नव्हते . अखेर प्रशासनाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी मात्र मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले यामध्ये बुरुडे, इटे, हरपवडे व मेंढोली येथील अर्जांचे प्रमाण निश्चितच जादा आहे.
ग्रामपंचायत निहाय दाखल अर्ज पुढील प्रमाणे :-
◼️ बुरुडे :- सरपंच ३/सदस्य २७
◼️ पेरणोली :- सरपंच ४/सदस्य ११
◼️ सुलगाव :- सरपंच ३/सदस्य ७
◼️ चांदेवाडी :- सरपंच १/सदस्य ७
◼️ हरपवडे :- सरपंच ४/सदस्य १४
◼️ मेंढोली :- सरपंच ८/सदस्य २१
◼️ इटे:- सरपंच २/सदस्य१९
◼️ वेळवट्टी -. सरपंच १/सदस्य१४
◼️ मसोली:- सरपंच ३/सदस्य ८
◼️ देऊळवाडी :- सरपंच १/सदस्य ५
असे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.



आणखी एका पतसंस्थेत बनावट सोने प्रकरण…? दबक्या आवाजात चर्चा

◼️आजरा: प्रतिनिधी◼️
आजरा शहरातील उच्चशिक्षित मंडळींच्या एका पतसंस्थेत बनावट सोने ठेवून लाखोंच्या कर्जाची उचल केल्याची शहरामध्ये गेले काही दिवस दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. काल मुथूट फीनकॉर्प मधील बनावट सोने कर्ज प्रकरण उघडकीस आल्यानंतर पुन्हा एकवेळ ही चर्चा होऊ लागली आहे.
शहरामध्ये पगारदार नोकरांच्या संस्था मोठ्या प्रमाणावर आहे. सुरक्षित कर्ज वाटप म्हणून सोने तारण कर्जाकडे पाहिले जाते. शहरातील एका उच्चशिक्षित मंडळींच्या पतसंस्थेत वर्षभरापूर्वी बनावट सोने ठेवून मोठ्या प्रमाणावर कर्जाची उचल झाली आहे. कर्जदार कर्जाची मुदत संपल्यानंतरही कर्ज परतफेड करण्यास करण्यास टाळाटाळ करत असल्याने सोन्याचे क्रॉस चेकिंग केले असता सदर प्रकार उघडकीस आला आहे.
मुळातच संस्था बड्या व बुद्धिजिवी मंडळींची असल्याने या प्रकरणाचा कुठेही गाजावाजा होऊ नये यासाठी खबरदारी घेऊनही वसुलीचा प्रश्न तसाच असल्याने याची आता चर्चा होऊ लागली आहे.
सोन्याच्या अशा कर्जप्रकरणांमध्ये मूल्यांकन करणारे सराफ, संबंधित कर्जदार व संस्थेतील काही मंडळींची मिली भगत असल्याची शक्यताही वर्तवली जाते. आता इतर आर्थिक संस्थांनी तरी किमान कालच्या प्रकरणातून बोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.


शिव कॉलनीतील शोष खड्ड्यात घाणीचे पाणी

◼️आजरा : प्रतिनिधी◼️
आजरा येथील शिव कॉलनी येथे
खुल्या जागेत नगर पंचायतीने गटर्सच्या पाण्याकरिता भला मोठा शोष खड्डा खोदला आहे. तो खड्डा घाणीच्या पाण्याने दोन दिवसात भरला असुन गेले वीस दिवस सदर पाण्याचा घाण वास सुटण्याबरोबरच डासांचे प्रमाण खूप वाढले आहे.
शिव कॉलनीतील नागरिकांच्या आरोग्याशी आजरा नगरपंचायत खेळ खेळत आहे असा आरोप शिव कॉलनीतील स्थानिक नागरिक करत आहेत.
नगरपंचायतीने सदर खड्डयाची विल्हेवाट लावून कॉलनीत खराब पाण्याचे योग्य प्रकारे निरसन करावे अन्यथा कॉलनीतील सर्व रहिवाशांना पुढील निर्णय घेणे भाग पडेल असा इशाराही देण्यात आला आहे.या खराब पाण्यामुळे या कॉलनीतील लोकांचे आरोग्य बिघडत असून यामुळे आरोग्याचा प्राशन गंभीर झाला तर त्याला आजरा नगरपंचायतीचे सर्व अधिकारी व नगरसेवक जबाबदार असतील असेही स्पष्ट केले आहे.



आजरा हायस्कूलचे यश

◼️आजरा – प्रतिनिधी◼️
संत गजानन महाराज पॉलिटेक्निकल कॉलेज, महागाव येथे आयोजित ‘ अनुत्तरा -२०२३ ‘ या स्पर्धे अंतर्गत एस.जी. एम. जीनियस २०२३ या स्पर्धेत आजरा हायस्कूल मधील कुमारी अंजली केसरकर, प्रेरणा लवटे, सोहम इंजल, आर्यन कामत या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.
या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व चषक देऊन गौरवण्यात आले.आजरा, गडहिंग्लज व चंदगड येथील २०० शाळांनी यामध्ये सहभाग घेतला होता.
यशस्वी विद्यार्थ्यांना कुंडलिक नावलकर यांचे मार्गदर्शन मार्गदर्शन व मुख्याध्यापक एस. आर. कुलकर्णी, उपमुख्याध्यापक बी.एम.दरी यांचे प्रोत्साहन लाभले.


आज शहरात…
नवरात्र विशेष
♦श्री रवळनाथ नवरात्र उत्सव समिती♦
अजित तोडकर व परिवार यांचा भक्तीगीतांचा कार्यक्रम व हळदी कुंकू ( वेळ दु.४ ते ७ वाजता )
♦लायन्स किंग नवरात्र उत्सव मंडळ♦
हळदी कुंकू (वेळ- सायं. ६ वाजता)
♦भगवा रक्षक नवरात्र उत्सव मंडळ♦
हळदी कुंकू (४ वा.) होम मिनिस्टर स्पर्धा (वेळ- रात्री ९ वाजता )
♦छ. शिवाजीनगर तरुण मंडळ नवरात्र उत्सव♦
सौ. वर्षा डहाळे यांचे ‘एकत्र कुटुंब पद्धती, धर्मरक्षा, लव्हजिहाद ‘ या विषयावर व्याख्यान (वेळ – रात्री ८ वाजता )
♦क्रांतिकारी नवरात्र उत्सव मंडळ,आजरा♦
हळदी कुंकू कार्यक्रम (वेळ – सायं. ५ वा.)


दुर्गामाता दर्शन
धर्मवीर तरुण मंडळ,गांधीनगर,
आजरा

◼️संस्थापक अध्यक्ष :-आनंदा मनोळकर
◼️अध्यक्ष : महेश खेडेकर
◼️मूर्ती देणगीदार : सुरज पाटील (गांधीनगर)
शिव शंभो सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळ दाभिल

वाघाचा चौक नवरात्र उत्सव, पेरणोली

वाचकांना आवाहन
मृत्युंजय महान्यूज करता आपल्या परिसरातील सामाजिक, शैक्षणिक,सहकार,राजकीय, सांस्कृतिक व इतर क्षेत्रातील बातम्या, निवड, दुःखद निधन यासारख्या बातम्या,जाहिराती प्रसिद्धीसाठी ९६३७५९८८६६ या क्रमांकावर व्हाट्सअप द्वारे पाठवाव्यात.
(तालुक्यातील बातम्यांना प्राधान्य राहील.)



…

