गुरुवार दि. ३१ जुलै २०२५


शेती काम करत असताना शेतकऱ्याचा मृत्यू
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शेतामध्ये कामासाठी गेलेल्या चाफे गल्ली, आजरा येथील पांडुरंग रामचंद्र नांदवडेकर या ७९ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
मुरुडे येथील शेतामध्ये ते शेती कामासाठी गेले असता काम करत असतानाच अचानक त्यांना चक्कर आली. उपचारासाठी दवाखान्यात दाखल करत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची वर्दी अनिल पांडुरंग नांदवडेकर यांनी आजरा पोलिसांत दिली असून पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत.

सौ. कोमल पाटील यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी बढती…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गजरगाव ता. आजरा येथील सौ. कोमल विशाल पाटील यांची पोलीस उपनिरीक्षक पदावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी बढती झाली. योगायोग म्हणजे कालच त्यांना बढतीचे पत्र मिळाले आणि कालच कन्यारत्नही झाले.
पुणे येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर काम करणाऱ्या सौ. पाटील यांची मुंबई येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी बढतीसह बदली झाली आहे.

८० वर्षाच्या वृद्धाची घराअभावी परवड

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आरदाळ , ता .आजरा येथील गंगाराम कांबळे या ८० वर्षाच्या वृद्धाचे राहते घर पडण्याच्या अवस्थेत असून आपला जीव धोक्यात घालून गंगाराम कांबळे राहत आहेत . प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे नवीन निवाऱ्याचा शोध सुरू आहे.
जून पासून जोराचा पाऊस व जोरदार वारा यामुळे गंगाराम कांबळे यांचे घर जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे या पडक्या धोकादायक घरात रहात आहेत. पावसाळ्यात त्यांच्या घराची पडझड झाली आहे. ग्रामसेवक पाहणी करून गेले मात्र त्यांच्या व्यवस्थेकडे डोळझाक केली .
आरदाळ गावचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. महादेव ढोकरे- पाटील, सुहास पाटील, बयाजी ससाणे यांच्यासह कांही कार्यकर्ते त्यांच्या मदतीसाठी प्रयत्न करत आहेत पण त्यांना मर्यादा येत आहेत. घरासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन गंगाराम कांबळे यांना आसरा देणे गरजेचे आहे . पत्नी मरण पावल्याने ते एकटेच घरी राहतात, त्यांचे वय ८० च्या घरात आहे त्यामुळे त्यांना पूर्वीसारखे मजुरीचे कामही जमत नाही. गळक्या ओल्या घरात आज ते राहत आहेत.वृद्ध कांबळे यांचे मोडकळीस आल्याने घर पडून त्यांच्या जीवितास काही धोका निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील असे सामाजिक कार्यकर्ते कॉ. शिवाजी गुरव यांनी स्पष्ट केले आहे.
रामतीर्थ प्राथ शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी डॉ. मारुती डेळेकर व व्हा. चेअरमनपदी श्री. संजय केसरकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील रामतीर्थ प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री.डॉ. मारुती पांडुरंग डेळेकर तर व्हाईस चेअरमनपदी श्री संजय गुंडू केसरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आजऱ्याचे सहाय्यक निबंधक श्री. सुजयकुमार येजरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ही निवड करण्यात आली. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते.

उत्तूरच्या इंदिरानगर प्रॉपर्टी कार्ड संदर्भांत प्रांताधिकारी कार्यालयात बैठक

उत्तूर : आजरा मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर ता आजरा .येथील इंदिरानगर वसाहतीचा प्रलंबित असणाऱ्या प्रॉपर्टी कार्ड संदर्भात राधानगरी – भुदरगडचे प्रांताधिकारी हरेस सुळ यांच्या उपस्थित ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांचे समवेत बैठक होऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली .वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत मागील आठवडयात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भुदरगडच्या प्रांताधिकारी . हरेश खुळ यांनी अभ्यास करून तात्काळ अहवाल सादर करावा अशा सुचना केल्या होत्या .
प्रांताधिकारी यांचे समवेत सरपंच किरण आमणगी , जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे , आजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष वसंतराव धुरे संचालक मारूती घोरपडे,शिरीष देसाई, राजेंद्र खोराटे, अशोक पाटील, सचिन फाळके, सुनील रावण आदींच्या बरोबर चर्चा करण्यात आली . प्रॉपटी कार्डाचा प्रश्न निकालांत निघण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न ग्रामपंचायतीकडून सुरु झाल्याने इंदिरानगर वासियांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत .

सुभाष गोविलकर यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील भादवण गावचे सुपुत्र पोलीस उपनिरीक्षक (पालघर) श्री.सुभाष गंगुबाई भिमराव गोईलकर यांचा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक देऊन सन्मान करण्यात आला .
पोलीस दलात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल त्यांना यापूर्वीच राष्ट्रपती पदक जाहीर झाले होते. सन्मानपूर्वक त्यांना ते प्रदान करण्यात आले.

निधन वार्ता
रंजना गुरव

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गजरगाव ता. आजरा येथील सौ. रंजना नेताजी गुरव (वय ५० वर्षे ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात चार मुली, दोन जावई, पती, नातवंडे असा परिवार आहे.

छायावृत्त…

आजरा शहरांमध्ये ठिकठिकाणी पावसामुळे अशी अवस्था झाल्याने शहरवासीयांनी व वाहन चालकांनी यातून मार्ग काढायचा तरी कसा? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे.
फोटो क्लिक....

तिठ्ठयावरील अमावस्या…


