mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

बुधवार दि.२४ डिसेंबर

सुलगाव नजीक अपघातात दोन ठार

(मृत -मनीष सोलापुरे / कल्लाप्पा कांबळे)

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

आजरा गडहिंग्लज मार्गावरील सुलगांव फाट्यावर ओमणी चारचाकी व आयशर टेंम्पोचा अपघात होवून गडहिंग्लजचे दोन भाजी व्यापारी ठार झाले आहेत तर एक महिला जखमी झालीं आहे. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास सदर अपघात घडला.

.याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी…

मनिष श्रीकांत सोलापुरे रा. गडहिंग्लज (चालक),गीता कृष्णा कांबळे (रा गडहिंग्लज) व कृष्णा कलाप्पा कांबळे (रा गडहिंग्लज) हे काल सावंतवाडीचा भाजीपाला व्यापार करुन परत गडहिंग्लजकडे जात होते.रात्री दीडच्या सुमारास आजऱ्याजवळील सुलगांव फाट्याजवळ ओम नी चालक याचा गाडी चालवत असताना चुकीच्या दिशेने गाडी गेल्याने समोरुन आलेल्या आयशरवर  आदळली यामध्ये कृष्णा कलाप्पा कांबळे हे जागीच ठार झाले तर चालक मनिष सोलापूरे व गीता कांबळे जखमी झाले. दोघानाही उपचारासाठी गडहिंग्लज नंतर कोल्हापूर येथे नेण्यात आले मात्र यातील चालक मनीषा चा उपचारादरम्यान मृत्यू झाला .गीता कांबळे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सागर नाईक यांचे कौतुक...

अपघातानंतर गौराई रुग्णवाहिकेचे सागर नाईक यांनी प्रसंगावधान दाखवत जखमींना रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर उपचार केले. यातील सोलापुरे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी पुढे हलवत असताना त्यांचा वाटेत मृत्यू झाला. सागर यांच्या या कामाचे कौतुक होत आहे.

संबंधित पोस्ट

शहाजी देसाई यांचे निधन… पंधराव्या वित्त आयोगाची बिले तातडीने अदा करा…. पंचायत समिती सभेत सूचना… किटवडे येथे ३ टीएमसी चा पाणी प्रकल्प उभारण्याच्या हालचाली

mrityunjay mahanews

सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!