

कासारकांडगाव येथे हत्तीकडून चारचाकीचा चुराडा
आजरा तालुक्यात हत्तींचा धुमाकूळ सुरूच असून गुरुवारी रात्री कासारकांडगाव परिसरात धुमाकूळ घालत हत्तीने नारायण बापू सरदेसाई यांच्या शेतातील घराशेजारी लावलेल्या चारचाकीचा धक्के मारून चुराडा केला. याचबरोबर या परिसरातील ऊस पिकासह इतर पिकांचेही मोठे नुकसान केले आहे.
मुरुम टाकण्यावरुन अधिकारी धारेवर…
आजरा नगरपंचायत मासिक सभा : विविध विषयावर चर्चा

आजरा नगरपंचायतीची मासिक सभा बुधवारी पार पडली. विचारण्याआधी रस्त्यांवर मुरुम टाकल्याने संबंधीत अधिका-यांना नगरसेवकांनी धारेवर धरले. तसेच झाडांच्या फांदया तोडण्यावरुनही जोरदार चर्चा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा श्रीमती ज्योत्स्ना चराटी होत्या.
नोटीस वाचन संजय यादव यांनी केले. शहराला पाणीपुरवठा वेळेत होत नसल्याचे नगरसेविका सुमैय्या खेडेकर व अस्मिता जाधव यांनी सांगितले. पाणी कधीही सोडले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट करत संबधीतांना तशा सुचना केल्या. नगरसेवक अशोक चराटी यांनी गांधीनगरमध्ये कच-याचा प्रश्न उद्भवत असल्याचे स्पष्ट करत पावसाला सुरुवात होण्यापुर्वी किटकनाशक औषध फवारणी करावी अशी सूचना केली.
नगरसेवक आनंदा कुंभार यांनी नगरपंचायत कार्यालयाच्या डागडुजीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. विद्याधन कॉम्पेल्क्स येथील पहिल्या मजल्यावरील पाच खोल्यांच्या भाडेवाढबद्दल चर्चा करण्यात आली. यामध्ये वार्षिक कमीत कमी 1 लाख रुपये भाडे मिळावे अशी मागणी नगरसेवक चराटी यांनी केली.
वारसा नोंदणी, खरेदी, इतर नोंदणी फी व दंड ठरविण्याबाबत चर्चा करण्यात आली. याशिवाय आठवडी बाजार लिलाव प्रक्रिया, कर आकारणी, दर्गा गल्लीत पेव्हींग ब्लॉक बसविणे यासह विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
चर्चेत उपनगराध्यक्ष संजीवनी सावंत, नगरसेवक संभाजी पाटील, किरण कांबळे, अभिषेक शिंपी, किशोर पारपोलकर, अस्मिता जाधव, सीमा पोवार, शुभदा जोशी, शकुंतला सलामवाडे, सिकंदर दरवाजकर, यास्मिन लमतुरे, यास्मिन बुड्डेखान यांनी सहभाग घेतला. आभार अजिंक्य पाटील यांनी मानले.
मुरूम येतो कुठून ?
एकीकडे मुरुमासाठी नगरसेवकामध्ये वादावादी होत असताना हा मुरूम नेमका कोठून काढला जातो? मुरुम उत्खननाची रीतसर परवानगी काढली आहे का? या प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे.मिळालेल्या माहितीनुसार विनापरवाना उत्खनन करून सदर मुरूम काढला जात असल्याचे समजते व असे असेल तर या मुरुमासाठी नगरसेवकामध्ये वाद होणे कितपत योग्य आहे याची चर्चा सभेनंतर उपस्थितांमध्ये होती.

—————
आजरा सूतगिरणीला ‘इंडियन इकॉनॉमिक रिसर्च ‘ कडून पुरस्कार

आजरा येथील आण्णाभाऊ सूतगिरणीला इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट रिसर्च असोसिएशन दिल्ली (इडरा) या संस्थेकडून आत्मनिर्भर भारत योजनेमध्ये सहभागी होवून राष्ट्रीय विकास योजनेमध्ये विशेष योगदान दिलेबद्दल ‘फास्टेस्ट ग्रोइंग इंडियन कंपनी एक्सलन्स अवॉरड’ प्रदान करुन गौरविण्यात आले.
पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे संस्थेमध्ये सकारात्मक वातावरण तयार होणेस सुरुवात झाली आहे. याकरिता आण्णाभाऊ संस्था समुहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी, संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अन्नपुर्णादेवी चराटी, उपाध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे, जनरल मॅनेजर अमोघ वाघ, विष्णू पोवार, सचिन सटाले, राजेंद्र धुमाळ, आर. ए. पाटील, श्रीकांत कुलकर्णी यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आजरा सूतगिरणीस पुरस्कार विशेष सहकार्य लाभले.


नुपुर शर्मा व जिंदाल यांचा आज-यात निषेध

हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या बाबत जाणून- बुजून खालच्या पातळीवरची अभद्र टिप्पणी केल्याचा निषेध आजरा येथील जमियात उलमा या संघटनेच्या वतीने करण्यात आला. तशा आशयाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.हजरत मोहम्मद पैगंबर हे मुस्लिम समाजाचे सर्वश्रेष्ठ असे वंदनीय व्यक्तिमत्व आहे अशावेळी नुपूर शर्मा, अश्विन कुमार, जिंदाल यांच्यासारख्या मंडळींनी अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन त्यांच्याविरोधात टिप्पणी केली आहे. ही बाब निश्चितच मुस्लीम समाजाच्या दृष्टीने दुखावणारी आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. महामानवांवर अशी टिप्पणी करणा-यांविरोधात कडक कायदा करण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली आहे.
यावेळी इरफान आबुतालीब चॉद,अध्यक्ष जमिअते उलमा आजरामौलाना अ. रहमान मुनाफ काकतिकर,मुक्ति तौफीक खत्ताल नेसरिकर,
अ.जब्बार निअमत वंटुमोरे,हाफिज फीरोज वदुद शेख,हाफिज मुस्तकीम मन्सूर हींगलजकर,
सैफुल्ला कादर आगलावे यांच्यासह मुस्लिम बांधव उपस्थित होते.







