mrityunjaymahanews
अन्य

काय आहे 5G नेटवर्क… सिम कार्ड, स्पीड आणि किंमत याबाबत संपूर्ण माहिती…


💫💫आजपासून इंटरनेट सुस्साट; 5G नेटवर्क, सिम कार्ड, स्पीड आणि किंमत याबाबत संपूर्ण माहिती…

🔸आजपासून देशात 5G इंटरनेट सेवा सुरु होत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात 5जी इंटरनेट सेवा लाँच  झाली . यामुळे आता भारतातही इंटरनेट सुस्साट होणार आहे. रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या कंपन्या स्पर्धेत आहेत. आता कोणती कंपनी 5G इंटरनेटची सुरुवात करतेय, हे पाहावं लागेल.

5G इंटरनेट सेवा सुरु होणार या पार्श्वभूमीवर अनेक मोबाईल कंपन्यांनी आधापासून 5जी मोबाईलवर लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली होती. सध्या बाजारात अनेक 5G मोबाईल उपलब्ध आहेत. तर काही कंपन्या सर्वात स्वस्त 5G मोबाईल देत आहेत. रिलायन्स जियो कंपनीने नुकताच जिओ 5G फोन लाँच केला आहे.

काय आहे 5G नेटवर्क?

5G इंटरनेट सेवा म्हणजे Fifth Generation अर्थात पाचवी पिढी असा आहे. ही सेल्युलर मोबाईल कम्युनिकेशनची पाचवी पिढी म्हणून ओळखली जाते. 5G नेटवर्क 2G , 3G , 4G नेटवर्कपेक्षा अधिक वेगवान असेल. 5G नेटवर्क 4G पेक्षा कमीतकमी 10 पटीने वेगानं इंटरनेट स्पीड देईल.

असं असेल 5G सिम कार्ड

सध्या बाजारात 2G ते 4G पर्यंत सिम कार्ड उपलब्ध आहे. काही कंपन्यांच्या मते, 4G सिम कार्डमधेच 5G इंटरनेट सेवा वापरता येईल. तुम्ही तुमचं 4G सिम कार्ड 5G मध्ये अपग्रेड करु शकता. यामुळे 4G वरून 5G सेवा अपग्रेड केल्यानंतर सिम कार्ड ग्राहकांना बदलावं लागणार नाही. ग्राहकांना त्यांच्या टेलिकॉम ऑपरेटरना कळवून त्यांचं 4G कनेक्शन थेट 5G मध्ये रूपांतरित करता येईल.

5G इंटरनेटसाठी 5G मोबाईल आवश्यक

तुम्हाला 5G इंटरनेट सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे 5G मोबाईल असणं गरजेचं आहे. 4G स्मार्टफोनमध्ये 5G सेवा चालवता येईल, असं म्हटलं जात होतं. मात्र 5G सेवा फक्त 5G स्मार्टफोनमध्येच चालेल आणि यासाठी तुम्हाला नवीन 5G स्मार्टफोन घ्यावा लागेल. उदाहरणार्थ, 2G फोनमध्ये 4G सिम इन्स्टॉल करता येते, पण त्यावर फक्त 2G सेवा उपलब्ध असते. तसेच जर तुम्ही 2G किंवा 3G फोनमध्ये Jio सिम कार्ड वापरण्याचा प्रयत्न केला तर ते चालत नाही. याचं कारण म्हणजे Airtel, Vodafone Idea सिमकार्डमध्ये 4G सोबत 2G आणि 3G सेवा आहे. तर Jio कडे फक्त 4G नेटवर्क उपलब्ध आहे. त्यामुळे जिओ सिम कार्ड 2G किंवा 3G फोनमध्ये सपोर्ट करत नाही. त्यामुळे तुम्हाला 4G स्मार्टफोनमध्ये 5G नेटवर्क वापरता येणार नाही, 4G स्मार्टफोनमध्ये तुम्हाला फक्त 4G नेटवर्क स्पीड मिळेल. त्यामुळे 5G इंटरनेटसाठी 5G स्मार्ठफोन आवश्यक आहे.

5G स्पीड कसा असेल?

5G इंटरनेटमुळे तुम्हाला अवघ्या काही सेकंदांमध्ये चित्रपट डाउनलोड करता येतील. टेलिकॉम कंपन्यांनी 5G स्पीडबाबत चाचण्या केल्या आहेत. ज्यामध्ये 5G चा स्पीडचा चांगला अनुभव आला आहे. एअरटेलने 5Gच्या चाचणीमध्ये 3000 एमबीपीएस पर्यंतचा वेग मिळवला होता. तर व्हीआयने (Vodafone-idea) 3.7 Gbps पर्यंत स्पीड गाठला होता. तर, जिओला 5G नेटवर्कच्या टेस्टमध्ये 1000 एमबीपीएस पर्यंतचा स्पीड मिळाला आहे.

5G ची किंमत काय असेल?

रिलायन्स जिओ आणि एअरटेल या कंपन्या 4G च्या किंमतीमध्ये 5G इंटरनेट सेवा देण्याची शक्यता आहे. 5G इंटरनेट सेवा 4G पेक्षा 20 टक्क्यांपर्यंत महाग असू शकते. त्यामुळे सर्व टेलिकॉम कंपन्यांनी 5G स्पेक्ट्रम लिलावात मोठी रक्कम गुंतवल्याचं म्हटलं जातं आहे. आता भारतात 5G च्या किंमती काय असतील हे पाहावे लागेल.

(  Source :  chat.whatsapp )

मी खासदार झालो आहे…काळजी करू नका

खा.धनंजय महाडीक

आजरा येथे आरोग्य शिबीर उत्साहात सुरु

राज्यसभेची निवडणूक म्हणजे अशक्य कोटीतील शिवधनुष्य होते. वरिष्ठ मंडळींनी आपणाला संधी दिली त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. मी आता खासदार झालो आहे तुम्ही काळजी करू नका.असे प्रतिपादन खा.धनंजय महाडिक यांनी केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याचे औचित्य साधून आजरा तालुका भाजपाच्या वतीने आयोजित मोफत महा आरोग्य शिबिरप्रसंगी खा. महाडिक बोलत होते.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी होत्या.

 

उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार यांनी केले.यावेळी बोलताना खासदार महाडिक म्हणाले काजू व तांदूळ उत्पादनात आघाडीवर असणारा आजरा तालुका उद्योगांच्या बाबतीत मात्र मागे राहिला आहे यासाठी आयटी पार्क सारखे प्रकल्प उभा करण्याची गरज प्रकर्षाने पुढे येऊ लागली आहे.

कोल्हापूर येथून विमान सेवा सुरू झाल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला आता औद्योगिक दृष्ट्या वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. वाहतुकीच्या उपलब्ध असणाऱ्या सोयी व मोठ्या शहरांमध्ये असणारी जागेची कमतरता यामुळे उद्योजकही आता ग्रामीण भागाकडे वळू लागले आहेत. जिल्ह्यामध्ये उद्योग वाढीकरता आपण निश्‍चितच प्रयत्नशील आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

कार्यक्रम प्रसंगी अशोक चराटी,डॉ.अनिल देशपांडे, जनार्दन टोपले, सुधीर मुंज, अरुण देसाई,डॉ. दीपक सातोस्कर, विजय पाटील,उदय चव्हाण, धनाजी पारपोलकर समीर चांद, संतोष बेलवाडे अथायु मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर, कोल्हापूर कॅन्सर सेंटर,इंडियन मेडिकल असो.आजरा, आजरा ग्रामीण रुग्णालयाचा अधिकारी वर्ग उपस्थित होता.

 

 

 

 

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

BREAKING

mrityunjay mahanews

तणाव निवळला… बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Breaking News

mrityunjay mahanews

प्रा. संजय मंडलिक हेच योग्य उमेदवार

mrityunjay mahanews
error: Content is protected !!