mrityunjaymahanews
अन्य

बहिरेवाडी येथे बैलाचा “लम्पी’ ने मृत्यू… गडहिंग्लज उपविभागातील पहिला बळी

 

 

बहिरेवाडी येथे बैलाचा ‘लम्पी ‘ ने मृत्यू

गडहिंग्लज उपविभागातील पहिला बळी

बहिरेवाडी (ता. आजरा) येथील युवराज मारुती चौगुले यांच्या मालकीचा बैल लम्पी आजाराने मृत्युमुखी पडला. गडहिंग्लज उपविभागात लम्पीचा हा पहिला बळी असून यामुळे शेतकरी वर्गामध्ये खळबळ उडाली आहे. चार दिवसापासून सदर बैल लम्पीने आजारी होता. याचबरोबर चौगुले यांचा दुसरा बैलही लम्पीने बाधित आहे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

तालुक्यातील शेतकरी वर्गाने आपल्या जनावरांना लम्पीची लक्षणे आढळल्यास तातडीने पशुधन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ.पी.डी. ढेकळे यांनी केले आहे.

आमदार पाटील  यांच्या हस्ते  नवीन वसाहतीमधील सोयी सुविधांचा लोकार्पण सोहळा उत्साहात

‘उचंगी’ प्रकल्प उभारणीत सर्वस्व गमावलेल्या चाफवडेकरांचा त्याग मोठा आहे. त्यानी एकजूट दाखवून श्रमदानातून उचंगी प्रकल्पाच्या डाव्या तीरावर नवीन वसाहत तयार केली. या वसाहतीमधील सुविधांसाठी माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा केला त्यांची जिद्द व चिकाटी वाखण्याजोगी त्यांच्यात एकजूटता व निष्ठा आहे. असे गौरवोदगार चंदगड विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पाटील यांनी काढले.चाफवडे (ता.आजरा) येथे नवीन विज वितरण व जनजीवन मिशन योजनेतंर्गत पाणी पुरवठा वितरण व्यवस्था
कामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात आमदार पाटील यांच्या हस्ते पार पडला. या वेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई, माजी सभापती अल्बर्ट दिसोझा,राजू होलम,अभिषेक शिंपी, रचना होलम, संजय तार्डेकर,शिवाजी नांदवडेकर, गटविकास अधिकारी अविनाश पाटील,महावितरणचे कार्यकारी अभियंता विजयकुमार आडके, उ पी. डी. माने महावितरणचे शाखाभियंता संदिप उपस्थित,मारुती चव्हाण उपस्थित होते.

नवीन वसाहत नियोजन समिती अध्यक्ष पांडुरंग धडान यानी स्वागत केले. सरपंच विलास धडाम प्रास्ताविकात म्हणाले, दीडशे घरांच्या विस्थापनाचा प्रश्न होता. तो दूर करण्यासाठी आमची धडपड होती. प्रकल्पग्रस्त हा पुढील पिढीवर शिक्का बसू नये म्हणून ‘आमच्या मातीत वसवू आमचे गाव’ अशी संकल्पना तयार करून नवीन वसाहत निर्माण केली. यासाठी आम. पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.

यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज-यात आज डोक्यावरील आरतीचा थरार

शारदीय नवरात्र उत्सवाचे खास आकर्षण असणाऱ्या डोक्यावरील आरती च्या कार्यक्रमाचे आज (सोमवारी) सायंकाळी 7:30 वाजता आयोजन करण्यात आले आहे.

येथील रवळनाथ मंदिर येथे सदर आरतीचा कार्यक्रम होणार असून भाविकांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन उत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

आजरा अर्बन व जनता बँक जिल्ह्यात सरस


कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोशीएशन च्या वतीने 500 कोटीपेक्षा जास्त ठेवी असणारी उत्कृष्ठ बँक म्हणून आजरा अर्बन बँकेला प्रथम पुरस्काराने गौरवण्यात आले.


कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोशीएशन च्या वतीने 251 ते 500 कोटीपर्यन्त ठेवी असणारी उत्कृष्ठ बँक म्हणून जनता सहकारी बँकेला प्रथम पुरस्काराने गौरवण्यात आले.

व्यंकटराव हायस्कूल व ज्युनि.काॕलेजमध्ये महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांना अभिवादन

व्यंकटराव हायस्कूल आजरामध्ये महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंती साजरी करणेत आली.

गांधी ही एक व्यक्ती नसून ती एक विचारधारा आहे.जगाने आज त्यांचा जन्मदिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून पाळला आहे.इतकी मानवतेची उंची गाठलेल्या या महामानवाला भारत कधीही विसरणार नाही.असे संस्थेचे चेअरमन जयवंतराव शिंपी म्हणाले.लालबहाद्दूर शास्त्री यांच्या कार्याची माहिती देणेत आली.कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष आण्णासो पाटील,संचालक सुनिल देसाई, सचिव. श्री एस पी कांबळे ,प्राचार्य सुरेशराव खोराटे,पर्यवेक्षक संजयकूमार पाटील ज्युनि.काॕलेज प्राध्यापक वृंद सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.नियोजन ज्युनि.काॕलेज सांस्कृतिक विभागाने केले.

जागर नवरात्रीचा… सन्मान स्त्री शक्तीचा –सौ बिनादेवी अनिलराव कुराडे

येथील जनता एज्युकेशन सोसायटी आजरा संचलित आजरा हायस्कूल आजरा मध्ये हादगा समारोप समारंभा व जागर स्त्री शक्तीचा या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापिका व संस्थेच्या सल्लागार सौ सुरेखा भालेराव होत्या तर प्रमुख पाहुण्या व वक्त्या म्हणून संभाजीराव माने आर्ट्स, कॉमर्स,सायन्स,कनिष्ठ महाविद्यालय गडहिंग्लज च्या प्राध्यापिका सौ. बिनादेवी अनिलराव कुराडे उपस्थित होत्या स्त्री ही जगाचा उद्धार करणारी असून समाज प्रबोधनात सिंहांचा वाटा उचलत आहे असे त्या बोलत होत्या यावेळी हादगाबोळव हत्ती पुजन व प्रतिमा पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले हदग्याची गाणे गात प्रमुख मान्यवर विद्यार्थ्यांनी आजी माजी शिक्षीका माता पालक यांनी फेर धरुन गाणे गायली सदर कार्यक्रमास…. आजरा हायस्कूलचे मुख्याध्यापक.उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, डॉ अंजनी देशपांडे आजराच्या , नगराध्यकक्षा ज्योत्स्ना चराटी-पाटील सर्व संचालकांच्या सुविद्य पत्नी. परीक्षक परुळेकर मॅडम ,कामत मॅडम आजी माजी शिक्षिका सर्व जनता एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखांमधील कुटुंबतील महिला व स्त्री शिक्षिका.उपस्तीत होत्या सूत्रसंचलन व्ही एच अडकुरकर तर स्वागत व प्रास्ताविक -विभागप्रमुख श्रीमती एस एस कुराडे यांनी केले तर
आभार यु डी देसाई यांनी मानले

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

‘छावा’ मुळे आजऱ्याच्या मातीचा सुगंध जगभर दरवळला…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!