मंगळवार दि.२५ मार्च २०२५


बोगस धनादेशप्रकरणी एकाला शिक्षा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मैत्रीपूर्ण झालेल्या आर्थिक व्यवहारात दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी विलास परशराम येमाटे (रा.कोवाडे) याला आजरा येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी मा. आर.पी.थोरे यांनी तक्रारदार अभय तुकाराम पाटील (मासेवाडी) यांना या व्यवहारातील उर्वरीत १,१५,०००/- रुपये देण्याच्या आदेशाबरोबरच दोन महिन्यांच्या साध्या कारावासासह ५,०००/- रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
तक्रारदाराच्या वतीने ॲड. जावेद दिडबाग यांनी काम पाहिले.

देवर्डे रस्ता प्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात मनसेचा ठिय्या आंदोलनाचा इशारा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
देवर्डे (ता.आजरा) येथील वहीवाट रस्ता प्रकरणी,मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. नी रस्ता अतिक्रमण दूर करून, रस्ता पूर्ववत करणे संदर्भात निर्णय दिला असताना
प्रशासन व ग्रामपंचायत देवर्डे हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून, रहिवाशी्यांना वेठीस धरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू पाहत असल्याचा वारंवार पाठपुरावा करून देखील तसेच,वरिष्ठ अधिकारी ह्यांनी वारंवार, गटविकास अधिकारी ह्यांना सूचना करून देखील त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत या प्रकरणाच्या
निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजरा व ग्रामस्थ देवर्डे यांनी ३ एप्रिल रोजी गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सदर आंदोलनादरम्यान काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेस त्यास प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असेही स्पष्ट केले आहे.
याबाबतचे लेखी निवेदन गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले असून निवेदनावर
आनंदा घंटे, सुशांत पोवार,संतोष शिवगंड.
संजय तेजम, अभिजित होडगे यांच्या सह्या आहेत.

आजरा-साळगाव मार्गावरील दुर्गंधीने नागरीक त्रस्त
दुर्लक्ष होत असल्याने नागरीकामधून संताप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा-साळगाव मार्गावरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राकडे जाणाऱ्या मार्गावर दुर्गंधी येत असल्याने या मार्गावरून जाणारे वाहतूकदार व नागरीक दुर्गंधीमुळे त्रस्त झाले आहेत.याकडे नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शहरापासून अर्धा ते एक किलोमीटरवर नूतन बांधकामे होत असून नागरिक तेथे राहावयास येत आहेत. परीणामी सांडपाणी व प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणावर येत असल्याने दुर्गंधी येत आहे. साळगाव व शहरातील नागरीक या मार्गावर रोज फिरायला जातात.सकाळी व संध्याकाळी फिरायला जाणा-या नागरीक, वाहनधारकांना याचा त्रास होत आहे.
आजरा नगरपंचायतीकडे काही नागरीकांनी याबाबत तक्रार केली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. गेले दोन महिन्यापेक्षा अधिक काळापासून दुर्गंधी येत असल्याने नागरीकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याकडे दुर्लक्ष होत असल्याने संतापही व्यक्त करण्यात येत आहे.
व्यंकटराव प्राथमिक विद्यामंदिर आजरा शाळेचे यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप (ऑल इंडिया)स्पर्धेमध्ये व्यंकटराव प्राथमिकचे २३ विद्यार्थी मेडल प्राप्त ठरले.
इयत्ता पहिली :- सानवी सागर किरुळकर ( गोल्ड मेडल ),राजवीर युवराज पोवार ( गोल्ड मेडल ),अविराज दयानंद पाटील (सिल्वर मेडल),स्वराली हनमंत गजरकर ( सिल्वर मेडल) वरद एकनाथ वंजारे ( सिल्वर मेडल),वेणू सचिन इंजल ( सिल्वर मेडल),अर्पिता अश्विन डोंगरे ( सिल्वर मेडल), अन्विता अजित चौगुले ( सिल्वर मेडल ), कनिष्क कुणाल पोतदार( ब्राँझ मेडल )
इयत्ता दुसरी : –राजनंदिनी सचिन इंदूलकर ( सिल्वर मेडल ),ज्ञाना विलास गवारी ( सिल्वर मेडल ), काव्या जयदीप दोरुगडे ( ब्राँझ मेडल मनस्वी मनोज पंडित (ब्राँझ मेडल), रणवीर रणजीत डोंगरे ( ब्राँझ मेडल)
इयत्ता तिसरी:-पार्थ रवींद्र केळकर ( गोल्ड मेडल ),अद्विता किशोर खोत (सिल्वर मेडल ), केतकी रामदास होरटे( सिल्वर मेडल),
दियती धीरज सनगर ( सिल्वर मेडल),आर्यन विनोद दळवी ( सिल्वर मेडल),यश संतोष जाधव ( ब्राँझ मेडल), मृणाल अभिजीत पाटील ( ब्राँझ मेडल),ज्ञानेश अभिजीत इंजल (ब्राँझ मेडल),
संचिता संतोष राणे (ब्राँझ मेडल)
इयत्ता चौथीचे ११ विद्यार्थी प्रमाणपत्रधारक ठरले आहेत.
या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका
सौ.एस.पी.चव्हाण,एम. के. खोत.एन.सी.हरेर, एन.आर. हासबे,आर. व्हि.देसाई , एस.बी. डेळेकर, एल .पी. कुंभार,आर. एच .गजरकर यांचे मार्गदर्शन लाभले.

छायावृत्त

वाटंगी तालुका आजरा येथे क्षयरोग निर्मूलनाच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांनी रॅली काढून जनजागृती निर्माण केली.

निधन वार्ता…
पार्वती कुंभार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कुंभार गल्ली, आजरा येथील श्रीमती पार्वती शंकर कुंभार (वय ८५ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.महादेव कुंभार यांच्या त्या आई होत.
त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.




व्यंकटराव प्राथमिक विद्यामंदिर आजरा शाळेचे यश