
आजरा अर्बन बँकेचा एकूण व्यवसाय १३२५ कोटी रुपये

नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये आजरा बँकेने रु. १६५ कोटी इतकी व्यवसायामध्ये वाढ केली असून एकूण व्यवसाय रु. १३२५ कोटी इतका झाला आहे. याच बरोबरीने निव्वळ एनपीएचे प्रमाण हे शून्य टक्के राखण्यात यश मिळवले आहे. या आर्थिक वर्षात बँकेस सर्व आवश्यक तरतुदी करून एकूण १० कोटी ८१ लाख इतका नफा झाला आहे. मागील वर्षी जिल्ह्यामधील सर्वोत्कृष्ट बँक हा पुरस्कार मिळवल्यानंतर याही वर्षी प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यामध्ये सातत्य राखण्याचे काम हे बँकेचे हितचिंतक, सभासद, ठेवीदार, कर्जदार यांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच हे शक्य झाले अशी माहिती बँकेचे चेअरमन डॉ. अनिल देशपांडे यांनी दिली.
याच बरोबरीने बँकेच्या या यशामध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी अविरत काम केल्यामुळेच बँकेची प्रगती होऊ शकते असे मत बँकेचे उपाध्यक्ष श्री. रमेश कुरुणकर यांनी व्यक्त केले.
सातत्याने विविध नवीन योजना आपल्या सभासद आणि ग्राहकांच्या विकासासाठी आणणे याला संचालक मंडळाने प्राधान्यक्रम दिला आहे. मागील वर्षी केंद्र आणी राज्य शासनाच्या विविध अनुदानाच्या योजना बँकेने राबविल्या आहेत. नुकतेच सूक्ष्म, लघु आणि माध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने खादी आणि ग्रामोद्योग आयोगामार्फत चालविल्या जाणाऱ्या पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेच्या अंमलबजावणीसाठी “आजरा बँकेचा” समावेश झाला आहे. या योजनेचा लाभ घेऊन ग्रामीण भागात रोजगार निर्मितीचा उपक्रम बँकेमार्फत करण्याचा मानस अण्णा भाऊ संस्था समूह प्रमुख श्री. अशोक चराटी यांनी व्यक्त केला.
ग्रामीण भागातील तरुणांना व्यवसायासाठी तयार करणे आणि त्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण देखील बँकेच्या माध्यमातून देण्याचा संकल्प ज्येष्ठ संचालक श्री. सुरेश डांग, श्री. विलास नाईक, श्री. प्रकाश वाटवे, डॉ. दीपक सातोसकर, आणि श्री. किशोर भुसारी, श्री. बसवराज महाळंक, श्री. मारुती मोरे, श्री. आनंदा फडके, सौ. प्रणिता केसरकर, श्रीमती शैला टोपले, सौ. अस्मिता सबनिस श्री. सुनिल मगदूम, श्री. सुर्यकांत भोईटे, श्री. किरण पाटील, श्री. संजय चव्हाण, अॅड. सचिन इंजल, श्री. मनोहर कावेरी, श्री. जयवंत खराडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रशांत गंभीर यांनी केला आहे.


आमदार मुश्रीफांच्या वाढदिनी महाविकास आघाडीतर्फे महाआरती व रस्सीखेच स्पर्धा

आजरा येथे महाविकास आघाडीतर्फे माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त राम मंदिर येथे महाआरती आयोजित करण्यात आली. यावेळी आमदार मुश्रीफ यांच्यावरील ईडीचे संकट दूर व्हावे,अशी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मुकुंद देसाई , जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई ,गोकूळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, कारखाना संचालक विष्णूपंत केसरकर, अल्बर्ट डीसोझा,एम. के. देसाई ,संभाजी पाटील,युवराज पोवार, अनिल फडके, राजू होलम,सौ. रचना होलम,मधुकर यल्गार,सुभाष देसाई ,सुनिल दिवटे,जनार्दन बामणे,राजू मुरुकटे ,अशोक शिंदे यांच्यासह तालुक्यातील विविध पक्ष व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
रस्सीखेच स्पर्धाही घेण्यात आल्या. या स्पर्धेत कीणे ग्रामस्थ मंडळ, उत्तूर ग्रामस्थ मंडळ,शिप्पूर ग्रामस्थ मंडळ व आवंडी धनगरवाडा येथील संघानी अनुक्रमे प्रथम चार क्रमांक पटकाविले. स्पर्धेत १६ संघानी भाग घेतला.

मेडिकल असोसिएशन ऑफ आजरा या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड

मेडिकल असोसिएशन ऑफ आजरा या आजरा तालुक्यातील नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनेच्या सन २०२३ – २४ या कालावधी साठी अध्यक्ष पदी स्त्री-रोग तज्ञ डॉ. स्मिता अशोक फर्नांडिस यांची निवड करणेत आली .
उपाध्यक्ष पदी डॉ. प्रविण निंबाळकर , सेक्रेटरी पदी डॉ. स्वप्नील कातकर आणि ट्रेझरर पदी अस्थीरोग तज्ञ डॉ. कुलदीप देसाई यांची निवड करणेत आली .
इंडियन मेडिकल असोसिएशन या शिखर संघटनेचे व आजरा तालुक्यातील इतर तीन पॅथीच्या संघटनेचे पदाधिकारी हे पूर्वीप्रमाणेच या वर्षी देखील कार्यरत ठेवणेत आले .
IMA आजराच्या अध्यक्ष पदी – डॉ. दीपक सातोसकर , उपाध्यक्ष पदी – डॉ. अशोक फर्नांडिस , सेक्रेटरी पदी – डॉ.अनिल देशपांडे आणि ट्रेझरर पदी – डॉ. कुलदीप देसाई यांची निवड करणेत आली.
NIMA आजरा या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या संघटनेच्या अध्यक्ष पदी – डॉ. अंजनीं देशपांडे , उपाध्यक्ष पदी – डॉ. श्रद्धानंद ठाकुर , सेक्रेटरी पदी – डॉ. संजय ढोणूक्षे आणि ट्रेझरर पदी – डॉ. संदीप देशपांडे यांची निवड करणेत आली
आजरा होमिओपॅथीक असोसिएशनच्या अध्यक्ष पदी – डॉ. दीपक हरमळकर , उपाध्यक्ष पदी – डॉ.बळीराम पाटील , सेक्रेटरी पदी – डॉ. सागर पारपोलकर आणि ट्रेझरर पदी – डॉ. सागर तेऊरवाडकर यांची निवड करणेत आली .
नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभास गडहिंग्लज येथील देसाई हॉस्पिटल अँड कार्डियाक केयर सेंटर चे प्रमुख फिजिशियन डॉ. चंद्रशेखर देसाई , हृदयरोग तज्ञ डॉ. रोहित देसाई आणि नेत्ररोग तज्ञ डॉ. दिशा राणे – देसाई हे उपस्थित होते .
तिन्ही डॉक्टर्सनी विविध वैद्यकीय विषयांवर सखोल मार्गदर्शन केले .
संघटनेचे २०२२ – २३ या काळात अध्यक्ष पद भूषविलेले डॉ. संदीप देशपांडे यांनी गेल्या एक वर्षात मेडिकल असोसिएशन ऑफ आजरा या संघटनेच्या वतीने राबविलेल्या सर्व उपक्रमांचा आढावा घेतला .
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. रोहन जाधन यांनी केले .
डॉ. अनिल देशपांडे यांनी आभार मानले


व्यंकटराव हायस्कूलचे प्रज्ञाशोध परीक्षेत यश

महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत व्यंकटराव हायस्कूलचे राज्यगुणवत्ता यादीत चार विद्यार्थी चमकले.
सौश्रृती अमित पुंडपळ (इयत्ता६वी) हिने राज्य गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकविला.प्रणव भगवान पाटील (इयत्ता ७वी) याने द्वितीय क्रमांक पटकविला.कार्तिक रमेश दळवी (इयत्ता सहावी) हा राज्यात २६वा तर सृष्टी संजीव नाईक (इयत्ता सातवी) हिने राज्यात ३३वा येण्याचा मान मिळवला.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेत गुणगौरव करणेत आला.. या विद्यार्थ्यांना आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष श्री. जयवंतराव शिंपी, सर्व संचालक मंडळ व प्राचार्य आर. जी. कुंभार, पर्यवेक्षक सौ.व्ही.जे. शेलार यांचे प्रोत्साहन लाभले..
मार्गदर्शक शिक्षक व यशस्वी विद्यार्थी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



रायवाडा येथे हत्तीकडून ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी
आजरा तालुक्यातील रायवाडा येथे हत्तीने धुमाकूळ घालत ट्रॅक्टर ट्रॉली पलटी करत आजूबाजूच्या नारळ, व काजू झाडांचेही मोठे नुकसान केले आहे. शुक्रवारी रात्री हत्तीने संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात प्रवेश करून त्यांचे नुकसान केले.






आजरा तालुक्यातील रायवाडा येथे हत्तीने धुमाकूळ घालत ट्रॅक्टर ट्रॉली पलटी करत आजूबाजूच्या नारळ, व काजू झाडांचेही मोठे नुकसान केले आहे. शुक्रवारी रात्री हत्तीने संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात प्रवेश करून त्यांचे नुकसान केले.