mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

बुधवार  १२ नोव्हेंबर २०२५

विवाहित महिलेवर अत्याचार…

एका विरोधात गुन्हा नोंद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

जीवे मारण्याची धमकी देऊन किटवडे ता.आजरा येथील विठ्ठल रामलिंग पाटील याने ३२ वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार केल्याची फिर्याद पीडित महिलेने आजरा पोलीस स्टेशनला दिली असून याप्रकरणी विठ्ठल पाटील यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पीडित महिलेच्या पतीच्या आजारपणाचा फायदा उठवत तिला जिवे मारण्याची व तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर कोल्हापूर येथील लॉजवर नेऊन अत्याचार केले असे संबंधित पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धोंडे पुढील तपास करीत आहेत.

सर्वर डाऊन…
आघाड्यांवर शिक्कामोर्तब नाही..
दुसरा दिवसही चर्चेत गेला

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

एकीकडे सर्वर डाऊन मुळे नगरपंचायत निवडणुकी करता इच्छुक उमेदवारांना बरीच धावपळ करावी लागत असताना दुसरीकडे आघाडी प्रमुखांनी अद्याप आघाड्यांच्या रचनेसह उमेदवाऱ्या जाहीर न केल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशीही एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.

अशोकअण्णा चराटी यांची आघाडी व त्या विरोधात दुसरी आघाडी असे आघाड्यांचे चित्र दिसत आहे. दोन्हीही आघाड्यांनी सावध भूमिका घेतली आहे. समोरचे उमेदवार अधिकृत रित्या कोण राहणार याकडे आघाडी प्रमुखांचे लक्ष लागून आहे. यामुळे एकमेकांच्या उमेदवारांवरच अंतिम उमेदवारीवर निर्णय होणार आहे .
काल दिवसभर सर्वर डाऊन असल्याने इच्छुकांची फक्त कागदपत्जरे मा करण्याकरता धावपळ सुरू होती. ऑनलाइन पद्धतीने एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याचे निवडणूक विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

परस्पर विरोधी चित्र

कांही प्रभागांमध्ये इच्छुकांची मांदियाळी आहे तर कांही प्रभागांमध्ये सक्षम उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे असा विचित्र विरोधाभास दिसत आहे.

गारगोटी ते कागल व्हाया अजिंक्यतारा…

आघाडी प्रमुखांसह इच्छुक उमेदवारांनी आघाडी बांधणी व उमेदवारी निश्चितीसाठी पालकमंत्री प्रकाश आबीटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक व आमदार सतेज पाटील, आम.शिवाजी पाटील यांचे उंबरे झिजवण्यास सुरुवात केली आहे.

अशोकअण्णा चराटी यांच्या वाढदिवस शुक्रवारी

 कार्यक्रम…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

अण्णा भाऊ संस्था समुहाचे अध्यक्ष,आजरा बॅंकेचे चेअरमन अशोक चराटी यांच्या वाढदिवसानिमित्त सोहळ्याचे माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमास पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह खासदार धनंजय महाडिक, चंदगड चे आम.शिवाजी पाटील , यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

शुक्रवारी ता.१४ रोजी अण्णा भाऊ सांस्कृतिक सभागृहात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार असून सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

या कार्यक्रमात पुष्पहार, गुच्छ आणण्याऐवजी वह्या आणाव्यात असे आवाहन वाढदिवस समितीने केले आहे.

आजरा तालुका महा ई सेवा /आपले सरकार सेवा केंद्र चालक संघटनेचे काम बंद आंदोलन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुका महा ई सेवा /आपले सरकार सेवा केंद्र चालक संघटनेमार्फत आजरा तहसीलदार यांना १२ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या तीन दिवसात राज्यव्यापी काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे.

याबाबतचे लेखी निवेदन तहसीलदारांना देण्यात आले असून संघटनेचे अध्यक्ष प्रमोद घाटगे, उपाध्यक्ष धीरज पाटील, सेक्रेटरी विनोद ओतारी, जिल्हा प्रतिनिधी प्रेमानंद पोवार तसेच केंद्र चालक प्रणव तवंदकर, सूर्याजी पाटील ,कुमार कांबळे, शरद उंडगे, बाळू कुंभार,मनोज भोगण, संकेत पाटील, इत्यादीं केंद्र चालक यावेळी उपस्थित होते. 

आर. आर. (आबा) पाटील यांच्या विचारांचा वारसा जपणारे फाउंडेशन – युवा नेते राहुल पाटील यांचे प्रतिपादन

उत्तूर : आजरा मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

उत्तूर ता.आजरा येथे अश्विन भुजंग फाउंडेशनतर्फे पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात युवा नेते राहुल पाटील म्हणाले की, अश्विन भुजंग फाउंडेशनने आर. आर. (आबा) पाटील यांच्या विचारांचा वारसा जपत समाजहिताचे कार्य केले आहे. पुढेही असेच उपक्रम राबवावेत, त्यासाठी आमचे नेहमीच सहकार्य राहील. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच किरण आमणगी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शेतकरी मार्गदर्शक पुरस्कार वसंतराव तारळेकर, समाजभूषण पुरस्कार डॉ. सचिन पोवार, शिक्षक पुरस्कार संतोष शिवणे, वैद्यकीय दूत पुरस्कार डॉ. रविकांत शर्मा आणि आदर्श शिक्षक पुरस्कार राजेंद्र सुतार यांना राहुल पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्हे व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी अश्विन भुजंग, शिवलिंग सन्ने, विठ्ठल उतूरकर, शिरीष देसाई, महेश करंबळी, पांडुरंग रावण, शंकर कोरवी, कृष्णा बामणे, पद्मजा भुजंग, विलास सावंत, सूरज जाधव, आनंदा गाडीवडर, संदीप बारंगुळे, मनोहर कुंभार, दिगंबर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनकर खवरे यांनी केले.

निधन वार्ता
तानूबाई गाडे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

भादवण ता. आजरा येथील तानुबाई यल्लाप्पा गाडे ( वय ८० वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. भादवणचे माजी उपसरपंच व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संजय गाडे यांच्या त्या आई होत.

 

संबंधित पोस्ट

GROUND REPORT

mrityunjay mahanews

आजऱ्यात पूरस्थिती कायम

mrityunjay mahanews

सौ.शोभा घाटगे यांचे निधन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!