mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


शिवीगाळ व मारहाण प्रकरणी शिरसंगी येथील दिघांविरोधात गुन्हा नोंद

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      शिरसंगी ता.आजरा येथे जमिनीच्या वादातून शिवीगाळ व मारहाण केल्यामुळे सुवर्ण मारुती होडगे व मारुती होडगे हे जखमी झाले असून या प्रकरणी पोलिसांनी सुवर्णा होडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शंकर कृष्णा होडगे, तानुबाई शंकर होडगे व विकास शंकर होडगे या तिघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे

      होडगे कुटुंबीयांमध्ये जमिनीचा वाद आहे. सुवर्णा व मारुती होडगे तेलकी लंबर नावाच्या शेतात काम करत असताना तेथे शंकर ताराबाई व विकास हे आले व त्यांनी शेत आमचे आहे आमच्या शेतात का काम करता ? असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी सुवर्णा व मारुती यांनी शेत आम्ही केले आहे काम आम्ही करणार असे सांगत असताना त्यांना लाठीने मारहाण करून जखमी केले व पुन्हा मारण्याची धमकीही दिली असे सुवर्णा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

      पुढील तपास संतोष घस्ती करीत आहेत.

जनता बैंक आजराच्या मुख्य कार्यालय सुशोभिकरणाचे  उद्घाटन

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा येथील सुवर्ण महोत्सव साजरी करणारी जनता सहकारी बैंक लि., आजराच्या सुशोभीकरण करणेत आलेल्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन कोल्हापूर नवनिर्वाचीत खासदार श्री.शाहु छत्रपती यांचे हस्ते 
करण्यात आले. यावेळी आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील उपस्थित होते.

     उ‌द्घाटन कार्यक्रमप्रसंगी खासदार श्री. शाहू छत्रपती यांनी बँकेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करुन ग्रामीण भागातील बैंक या स्पर्धात्मक युगात प्रगती करुन रिझर्व बँकेच्या अटी व शर्तीना पात्र ठरत असलेबद्दल संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. आमदार श्री. सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी शुभेच्छा देवून बँकेचा ताळेबंद पाहुन समाधान वाटलेचे मत व्यक्त करुन सर्वांचे कौतुक केले.

     या कार्यक्रमास बँकेचे अध्यक्ष श्री. मुकुंददादा देसाई, व्हा. चेअरमन श्री. महादेव टोपले, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. एम बी पाटील यांच्यासह सर्व संचालक व अधिकारी उपस्थित होते.

     गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात शिवसेना आजरा तालुका पदाधिकारी यांची कामकाजा संदर्भात बैठक 

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     भादवण येथील दोन दिवसांपूर्वी सर्पदंश झालेल्या महिलेचा मृत्यू झाला होता. त्याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख श्री संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर खोत यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारण्यात आला.

     सदर रुग्णाला साप चावल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय सूचीनुसार योग्य ते उपचार न देता अपुरे उपचार करून उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. तोपर्यंत बराच वेळ गेला.उपजिल्हा रुग्णालय येथे व्हेंटिलेटर ची सोय नसल्यामुळे सदर पेशंटला खाजगी दवाखान्यात पाठवावे लागले. योग्य वेळेत उपजिल्हा रुग्णालयाकडून पुढील उपचार न मिळाल्यामुळे पेशंट दगावला या उपजिल्हा रुग्णालयाच्या ढीसाळ कारभाराबाबत जाब विचारण्यात आला.

      पेशंट दगावल्यानंतर शव विच्छेदन साहित्यसाठी उपजिल्हा रुग्णालयातून नातेवाईकांकडून पैसे घेतले जातात याबाबत रुग्ण कल्याण कमिटी मार्फत व्यवस्था करण्यात यावी अशी सूचना करण्यात आली.

     सदर चर्चेमध्ये उपजिल्हा रुग्णालयाचा सुरक्षारक्षकच पोस्टमार्टम चे काम व रुग्णवाहिकेची सेवा सुद्धा स्वतःच पुरवत असलेचे निदर्शनास आले. तसेच तो रुग्णाच्या नातेवाईकांकडून वारेमाप पैसे मागत असल्याने त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

     या संदर्भात आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे निवेदन देऊन उपजिल्हा रुग्णालयाच्या एकूण भोंगळ कारभाराबाबत बैठकीची मागणी करण्यात येणार आहे.

     या चर्चेमध्ये गडहिंग्लज शिवसेना तालुकाप्रमुख संजय संकपाळ,आजरा शिवसेना शहर प्रमुख विजय थोरवत, आजरा तालुका कृषी कमिटी अध्यक्ष इंद्रजीत देसाई, साळगावचे सरपंच धनंजय पाटील, लाटगावचे उपसरपंच रणजीत सर देसाई, संतोष भाटले, सुनील दिवेकर व मृताचे नातेवाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.

धान्य वितरणातील अडचणी दूर करा…
तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांची मागणी

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक यांच्या वतीने धान्य वितरणातील विविध अडचणी दूर करण्यात याव्यात यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार समीर माने यांना देण्यात आले. सदर निवेदन निवासी तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनी स्वीकारले.

     यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय येसादे ,कार्याध्यक्ष प्रमोद कांबळे, उपाध्यक्ष शंकर कसलकर, वसंत पोवार, बयाजी येडगे, विकास मुरकुटे, जावेद दरवाजकर, शिवाजी अजगेकर, गुणाजी साबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Breaking News

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजऱ्यात मनसेचे खळ्ळ -खट्याक : नगरपंचायतीचे गाळे अखेर मूळ मालकांना देण्याचा निर्णय…… पोलिसांकडून साडेपाच लाखांची दारू नष्ट….. चारचाकी ने धडक दिल्याने जाधेवाडीतील महिला जखमी

mrityunjay mahanews
error: Content is protected !!