mrityunjaymahanews
अन्य

BREAKING…


पुन्हा ‘तेथेच ‘ अपघात…
एक ठार… एक जखमी


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा


गोव्याच्या दिशेने सिमेंटचे पाईप वाहून नेणारी गाडी रस्त्यावर आलेल्या गव्याला चुकवताना पलटी झाल्याने महादेव पोपट मोरे (वय ३६,रा.निरंकार कॉलनी, संजय नगर, सांगली ) यांचा जागीच मृत्यू झाला.तर यश नामदेव सावंत (वय २१,रा.संजय नगर, सांगली ) हा गंभीर जखमी झाले असून त्याला उपचारासाठी गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सांगली येथून सिमेंट पाईप भरून सदर वाहन गोव्याच्या दिशेने निघाले असता देवकांडगाव नजिक  समोर गवा आल्याने वाहनचालक गव्याला चुकवण्याच्या प्रयत्नात असताना वाहन पलटी झाले असल्याचे सांगण्यात येते.

 

आजरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.


धोकादायक ठिकाण…


याच ठिकाणी गेल्या दोन वर्षांमध्ये पुन्हा-पुन्हा अपघात होत असून पाच जणांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे येथे अपघात होऊ नये यासाठी आवश्यक ते सूचना फलक लावण्यासह खबरदारी घेणे आवश्यक आहे.


संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

रामतीर्थ जवळ मानवी कवटी सापडली

mrityunjay mahanews
error: Content is protected !!