दि. २० सप्टेबर २०२४


शिवीगाळ व मारामारी प्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा नोंद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
होन्याळी ता. आजरा येथे बिरंबोळे व तेली कुटुंबीयांमध्ये मारामारी व शिवीगाळ केल्याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी…
होन्याळी तालुका आजरा येथे चिमणे- महागोंड रस्त्यावरील चौकामध्ये बिरंबोळे व तेली कुटुंबीयांमध्ये एकमेकांना शिवीगाळ केल्यावरुन वाद झाला. या वादाचे पर्यवसान मारामारीत झाले.
याप्रकरणी विनायक शिवलिंग तेली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरेश तुकाराम बिरंबोळे, सुरेखा सुरेश बिरंबोळे व सुजय सुरेश बिरंबोळे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तर सुरेश उर्फ गोविंद तुकाराम बिरंबोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून काशिनाथ सत्याप्पा तेली, स्मिता काशिनाथ तेली, प्रथमेश काशिनाथ तेली, विनायक शिवलिंग तेली, विद्या विनायक तेली, अशोक बसप्रभू तेली यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत.


‘व्यंकटराव ‘मध्ये आज अभ्यास वर्गांचे पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
व्यंकटराव प्रशालेमध्ये कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र अंतर्गत अभ्यास वर्ग सुरू होत आहे.याचे ऑनलाईन उद्घाटन पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचे हस्ते व वर्गाचे उद्घाटन आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष श्री. जयवंतराव शिंपी यांचे हस्ते आज शुक्रवार दि. २० सप्टेंबर २०१४ रोजी सकाळी १०.३० वाजता होणार असल्याची माहिती प्राचार्य श्री.एस.व्ही.शेळके यांनी दिली.

मोरजकर महाराजांचा आज दिंडी सोहळा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ह. भ. प. पू. लक्ष्मण बुवा मोरजकर महाराज यांच्या दिंडीचा कार्यक्रम आज शुक्रवार दिनांक २० रोजी होणार आहे.
गेले सात दिवस महाराजांचा सप्ताह शिवाजीनगर येथील विठ्ठल मंदिरात सुरू असून आज शुक्रवारी दुपारी बारा वाजता दिंडी कार्यक्रमास सुरुवात होणार आहे.
शिवाजीनगर येथील घाट परिसरातील समाधी पासून सदर दिंडीस सुरुवात होईल. उद्या शनिवारी दुपारी बारा ते तीन या वेळेमध्ये महाप्रसाद तर रात्री दहा वाजता तांदळाच्या प्रसाद होणार आहे.

टोलमुक्त संघर्ष समितीची आज बैठक
आज शुक्रवार दि २० सप्टेंबर २०२४ ठीक १२.०० वाजता हॉटेल मॉर्निंग स्टार, आजरा येथे टोल मुक्ती संघर्ष समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती काँ. संपत देसाई यांनी दिली.





