mrityunjaymahanews
अन्य

मतदानात टोकाची ईर्षा… प्रस्थापितांना धक्का…?

गुरुवार दि.२१ नोव्हेंबर २०२४              

चंदगड, राधानगरीत धोक्याचा इशारा…?

कागल मध्ये मुश्रीफ -घाटगे कॉंटे की टक्कर

जिल्ह्यात ७६ टक्के मतदान

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       विधानसभा निवडणुकीकरीता प्रचंड चुरशीने मतदान झाले असून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ७६ टक्के इतके मतदान झाले आहे. प्रस्थापितांना या निवडणुकीत धक्का बसण्याची शक्यता मतदानानंतर व्यक्त होत आहे. मतदानाचा टक्का वाढल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. जिल्ह्यातील १२१ उमेदवारांचे भवितव्य काल मतदान यंत्रात बंदिस्त झाले आहे. निवडणुका विधानसभेच्या असल्या तरीही या निवडणुकांना ग्रामपंचायत निवडणुकांचे स्वरूप प्राप्त झाले होते. एका एका मतासाठी कार्यकर्ते झटताना दिसत होते.

सकाळपासूनच मोठ्या इर्षेने मतदानाला सुरुवात झाली. सुगीचे दिवस असल्याने शेतकरी वर्गाने मतदान करूनच शेताकडे जाणे पसंत केले. पहिल्या सत्रामध्ये मतदान केंद्रावर उमेदवारांचे पहिल्या फळीतील कार्यकर्ते उपस्थित असल्याचे दिसत होते.

जिल्हा परिषद निहाय आजरा तालुक्यातील स्थिती...

आजरा तालुक्यामध्ये कोळींद्रे जिल्हा परिषद मतदार संघात अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांचीच हवा दिसत होती. उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघात मंत्री हसन मुश्रीफ यांचे वारे तर आजरा जिल्हा परिषद मतदार संघात विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर हे गतवेळच्या मतदानापेक्षा बॅक फुटवर आलेले जाणवत होते.

एकंदर मतदानानंतरचे चित्र पाहता चंदगड मधून अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील हे प्रस्थापितांना धक्का देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. अप्पी पाटील व शिवाजीराव पाटील यांनी इतर उमेदवारांना चांगलाच घाम फोडल्याचे दिसत होते.

राधानगरी – भुदरगड मधून माजी आमदार के.पी.पाटील यांनी लावलेल्या जोडण्या यशस्वी झाल्यास आमदार प्रकाश आबिटकर हे डेंजर झोनमध्ये गेल्यास आश्चर्य वाटू नये. राधानगरीतल मताधिक्य येथील संभाव्य विजयी उमेदवाराला तारणार आहे.तर ‘ कॉंटे की टक्कर ‘ अशी अवस्था असणाऱ्या कागल विधानसभा मतदारसंघात ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा दिसत असून अगदीच काठावर असणाऱ्या मताधिक्यामुळे नेमक्या चित्राबाबत संभ्रमावस्था दिसत आहे. मतदानानंतर मंत्री मुश्रीफ व समरजीत घाटगे यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केल्याने या संभ्रमावस्येत आणखीन भर पडली आहे.

मतदारसंघ निहाय जिल्ह्यामध्ये झालेल्या मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे :-

चंदगड – ७४.६१

राधानगरी – ७८.२६

कागल – ८१.७२

दक्षिण – ७४.९५

करवीर – ८४.७९

कोल्हापूर उत्तर-६५.५१

शाहूवाडी – ७९.०४

हातकणंगले – ७५.५०

इचलकरंजी – ६८.९५

शिरोळ – ७८.०६

एकूण – ७६.२५

बाहेरून मतदानाकरीता खाजगी गाड्यांचा वापर

मुंबई- पुणे सह बाहेरगावचे चाकरमानी मतदानाकरीता आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ट्रॅव्हल्स व चार चाकी भाडोत्री गाड्यांचा वापर करण्यात आला. बाहेर गावच्या चाकरमान्यांनीही गावी येऊन मतदान करण्यास प्राधान्य दिले. बाहेरगावच्या मतदानाची खास ‘व्यवस्था’ उमेदवारांनी लावली होती.

दुपारनंतर शुकशुकाट…

सकाळच्या सत्रातच मतदानाची आकडेवारी वाढल्याने दुपारनंतर अनेक मतदान केंद्रांवर शुकशुकाट दिसत होता. ठीक ठिकाणी मतदारांसाठी चहा- पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती.

एक्झिट पोल ने वाढवले टेन्शन

कुणाची सत्ता येणार ? कोण डेंजर झोन मध्ये? याबाबतची वेगवेगळी आकडेवारी विविध संस्था व चॅनल्सनी एक्झिट पोलद्वारे प्रसिद्ध केल्याने या एक्झिट पोल्सनी उमेदवारांसह कार्यकर्त्यांचे टेन्शन वाढवले आहे .

आजरा जि.प.व शहर स्थिती

आजरा जिल्हा परिषद मतदार संघात ३७ हजार ९०६ पैकी २५ हजार ३९६ मतदारांनी (६६.९९%) मतदानाचा हक्क बजावला यापैकी ग्रामीण भागामध्ये २३४८३ पैकी १६,१२८ (६८.६७%) तर आजरा शहरात १४४२३ पैकी ९२६८ (६४.२५%) इतके मतदान झाले.

उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघात ३८ हजार २०८ पैकी २८ हजार ९९० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर उत्तूर शहरात ७३.५० % इतके मतदान झाले.

आजरा जिल्हा परिषद गावनिहाय स्थिती...

आजरा -६४.२५%

देवकांडगाव – ६४.८५%

कोरीवडे – ७५.३९%

हरपवडे – ७०.९८%

पेरणोली -६६.८६%

साळगांव – ७१.०५ %                             

 सुलगांव – ६९.९१%

चांदेवाडी -७०.२९%

हाजगोळी बु – ७१.१२%

हाजगोळी खु – ६२.७३%

खेडे – ६५.४८%

एरंडोळ- ६८.७७%

लाटगांव- ७२.८२%

इटे- ५७.५८%

देऊळवाडी – ६७.७४%

आवंडी – ७७.१४%

किटवडे- ६९.०५%

सुळेरान – ७०.४७%

आंबाडे – ७१.६४%

गवसे – ६५.८९%

मेढेवाडी – ७२.९६%

देवर्डे – ६९.७१%

वेळवट्टी – ७३.८८%

मसोली – ६७.७९%

दाभिल – ६७.११%

उत्तूर जिल्हा परिषद 

झुलपेवाडी – ७६.०७%

बेलेवाडी हु.- ७६.३२%

धामणे – ८१.९०%

चव्हाणवाडी – ८०.२०%

चिमणे – ७०.४६%

महागोंड – ७४.३८%

वझरे – ८०.१०%

वडकशिवाले – ६२.६१%

हालेवाडी – ७७.३६%

होण्याळी – ७४.२८%

आर्दाळ – ७८.०५%

करपेवाडी – ८५.८८%

उत्तूर – ७३.५१%

मुमेवाडी – ७९.३३%

बहिरेवाडी – ७७.४१%

पेंढारवाडी – ७४.५५%

मासेवाडी – ७५.४२%

सोहाळे – ७७.३३%

मडिलगे – ७८.१६%

खोराटवाडी – ८६.१३%

जाधेवाडी – ७७.६३%

भादवण – ७१.३७%

भाद.वाडी – ७७.९१%

विशेष सूचना…

(बातमीपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली आकडेवारीत थोडाफार फरक असू शकतो)

 

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा साखर कारखाना अध्यक्षपदी मुकुंदराव देसाई …

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

चार लाख मे.टन गाळपाचा टप्पा यावर्षी ओलांडणार : प्रा.शिंत्रे आजरा साखर कारखान्याची वार्षिक सभा संपन्न…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!