


मानवी कवठी… बघ्यांची गर्दी…
आजऱ्यापासुन जवळच असणाऱ्या रामतीर्थ पर्यटनस्थळाच्या वळणावर मानवी कवटी पडली असल्याचे स्थानिक वाटसरूंच्या लक्षात आल्यानंतर याचा गावात बोभाटा झाला आणी बघ्यांनी येथे गर्दी केली.
पावसाळ्यामध्ये रामतीर्थ येथील नदीपात्रातून बऱ्याचवेळी मृतदेह वाहून येतात.उन्हाळ्यात नदीचे पाणी कमी झाले की हे मृतदेह झाडी झूडपामध्ये अडकलेल्या स्थितीत दिसतात.असे मृतदेह व अवयव यापूर्वीही सापडले आहेत.असाच प्रकार घडला असावा अथवा कुणीतरी भोंदूगिरी च्या उद्देशाने हा प्रकार घडवून आणला असावा अशी शहरवासियांमध्ये चर्चा आहे. पोलिसांनी रितसर सदर कवटीचा पंचनामा करून ताब्यात घेतली आहे.
उत्तुरमध्ये अभाविपचे जिल्हास्तरीय अनुभूती शिबीर संपन्न

दि.०६, ०७ व ०८ मे २०२२ रोजी उतूर येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे अनुभूती शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिरामध्ये आजरा, गडहिंग्लज, चंदगड, हातकणंगले, कागल, शिरोळ या ६ तालुक्यातून विद्यार्थी सहभागी झाले होते. दि. ०६ मे रोजी सायंकाळीb शिबिराच्या उद्घाटनासाठी अभाविप प.महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री श्री रोहित राऊत व विभाग संघटन मत्री श्री मित ठक्कर शिबिर प्रमूख प्रितम जिरगे जिल्हा सहसंयोजक सुमित महाजन उपस्थित होते प्रितम जिरगे यांनी शिबिराची प्रस्तावना केली तर रोहित राऊत यांनी अभाविप मांडणी केली व सुत्र संचालन मेघा शिरगावे यांनी केले.
०७ मे रोजी श्री जोमकाई देवीच्या डोंगरावर ट्रॅकिंग झाले. तिथे शिबिरार्थींना स्थानिक भौगोलिक, नैसर्गिक ,अध्यात्मिक माहिती देण्यात आली. त्यानंतर विविध पारंपरिक खेळ तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रात्री विद्यार्थ्यांसाठी शेकोटी सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक ०८ मे रोजी विद्यार्थ्यांना बोलते करण्यासाठी ओपन माईक तसेच ट्रेझर हंट सारखे अनोखे खेळ घेण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सध्याच्या सध्य परिस्थितीवर वाद विवाद स्पर्धा घेण्यात आली.
या शिबिराचा समारोप नेहरू चौकातील श्री हनुमान मंदिरात घेण्यात आला.यावेळेस जिल्हा परिषद सदस्य उमेश आपटे यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधले. ऍड. संजय पवारांनी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून होणारे संस्कार व समाजास अपेक्षित असा विद्यार्थी कसा घडतो हे सांगितले. दिगंबर यादव यांनी व्यवस्था परिचय करून दिला. सूत्रसंचालन बनशंकरी सदलगी यांनी केले व ऍड.स्वागत परुळेकर यांनी शिबिराचा समारोप केला.
उत्तुर सारख्या ग्रामीण भागातील समाजिक परिस्थितीचा परिचय विध्यार्थ्यांना करून देणे,हा या मागील उद्देश होता.
यावेळी अभाविपचे जिल्हा संयोजक आदित्य खंडागळे शिबिर प्रमूख प्रितम जिरगे सहसंयोजक सुमित महाजन, अभिषेक रोडगी, मेघा शिरगाव, शहरमंत्री श्वेताली तावडे शहर सहमंत्री सनिका पाटील, तेजस शेळके, संकल्प पाटील, रोहित कोरवी, प्रतीक्षा देसाई, ओम जाधव, ओंकार ठाकूर, अक्षय वेसणेकर,पृथ्वीराज रेडेकर व तुषार रावळ हे उपस्थित होते.
संशयकल्लोळ ….
आजरा कारखान्यातील बेरिंग्ज् चोरी प्रकरणावरून 34 जण संशयाच्या भोवऱ्यात
आजरा साखर कारखान्यातील बेअरींग चोरी प्रकरणाचा करखान्यांतर्गत चौकशी समितीचा अहवाल आज संचालक मंडळाकडे देण्यात आला. त्यानुसार 7 अधिकारी आणि इतर कर्मचारी मिळून 34 जणांकडे संशयाची सुई फिरली आहे. प्रशासन आणि सुरक्षा विभागाच्या निष्काळजी व हलगर्जीपणावर बोट ठेवत संबंधितांची खातेनिहाय चौकशी करावी अशा सूचना समितीने केल्या असल्याचे सांगण्यात आले.
सन 2019-20 व 2020-21 या कारखाना बंद असलेल्या कालावधीत ही घटना घडली होती. ती तीन महिन्यांपूर्वी उघड झाल्यावर तालुक्यातील सर्वच स्तरावरून तपास करण्याबाबत दबाव वाढला होता. त्यानुसार कारखान्याने आजरा नोंदवली. फिर्याद नोंदवली. पण कारवाईस वेळ होऊ लागल्याने कारखान्याने स्वतःची 7 सदस्यीय समिती नेमली. त्यामध्ये कारखान्याचे उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णींच्या अध्यक्षतेखाली संचालक राजेंद्र सावंत, लक्ष्मण गुडुळकर, तानाजी देसाई, कर्मचारी वर्गातील सदस्य तुकाराम पाटील व संजय उत्तुरकर तसेच कायदेशीर सल्लागार म्हणून ऍडव्होकेट शैलेश देशपांडे अशा 7 जणांचा समावेश केला.
त्यानुसार गेली अडीच महिने चौकशी करीत या समितीने आज आपला अहवाल संचालक मंडळ बैठकीसमोर ठेवला. त्यानुसार कारखान्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे सदर प्रकार घडला असून याबाबत संबंधित सर्व संशयितांवर सामूहिक जबाबदारी निश्चित करावी व 15-20 दिवसात खात्यांतर्गत चौकशी करावी, असेही सुचविण्यात आले आहे.
पोलीस तपास काय सांगतो…?
वास्तविक या प्रकरणात पोलीस तपासाला महत्व देणे गरजेचे आहे.कारखाना प्रशासनाने चौकशी समिती नेमून पर्यायी तपास यंत्रणा राबविली.यामध्ये चोरी कालावधीत कामावर असणारे सर्वच कर्मचारी व अधिकाऱ्यांचा संशयीतांमध्ये समावेश केला आहे.याच्या उलट- सुलट प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत.
नियोजनबद्ध पद्धतीने वरिष्ठांकडून प्रकार
प्रकार …
सदर चोरीचा प्रकार हा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने घडलेला प्रकार आहे.तत्कालीन कांही अधिका-यानी अधिकाराचा वापर आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांकडून गैरप्रकार करवून घेतले.यातील संशयितांपैकी कांहीना प्रकरणाची चर्चा सुरु झाल्यानंतर चोरीबद्दल माहिती समजली.आता या कर्मचार्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे.कारखाना चौकशी समितीने ठपका ठेवलेल्या कर्मचारी व अधिका-यामध्ये नेमके कोण दोषी आहेत , हे पोलीस तपासातच स्पष्ट होणार आहे.त्यामुळे तूर्तास सर्वांना संशयाच्या नजरेने पहाणे कितपत योग्य आहे ? हा सवालही उपस्थित होत आहे.
झालेल्या चौकशीत स्क्रॅप ठेकेदाराने काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून सदर बेरिंग्ज उचलले असल्याची चर्चा असल्याने स्क्रॅप ठेकेदाराकडून यासंदर्भात अधिक माहिती मिळू शकते.आतापर्यंत या घडामोडीत या चौकशी पासून स्क्रॅप ठेकेदार लांबच असल्याचे समजते.






