बुधवार
५ ऑगस्ट २०२६


आंबेओहोळ मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला,सांडव्यातून विसर्ग सुरू.
उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील आंबेओहोळ मध्यम प्रकल्प मंगळवारी दुपारी पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सायंकाळी ४ वाजताच्या नोंदीनुसार धरणाची पाणीपातळी ६८५.७३ मीटर इतकी असून प्रकल्पातील एकूण पाणीसाठा ३५.११ दशलक्ष घनमीटर (१२४० दशलक्ष घनफूट) झाला आहे. त्यामुळे धरणाची १०० टक्के साठवण क्षमता पूर्ण झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात १ जूनपासून आतापर्यंत १३१७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील २४ तासांत ५ मिमी पाऊस झाला असून धरणातून १० क्यूसेक्स इतका विसर्ग सुरू आहे.
प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने परिसरातील शेतीला तसेच भविष्यातील पाणीपुरवठ्याला मोठा दिलासा मिळाला असून, पुढील काळात पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

पाय घसरला… पर्यटक दरीत कोसळला…
शोध मोहीम सुरू

आंबोली पर्यटनासाठी आलेले जत्राट, निपाणी येथील ४५ वर्षीय पर्यटक डॉक्टर आयुब सय्यद हे मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास महादेव गड येथे पर्यटनाचा आनंद लुटताना पाय घसरून खाली सुमारे चारशे फूट खोल दरीत कोसळले. जोरदार पाऊस, अंधार आणि धुक्यामुळे शोध कार्य थांबवण्यात आले असून आज पुन्हा त्यांची शोध मोहीम राबवण्यात येणार आहे.
सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्कयू टीम आंबोली-सांगेलीकडून शोधमोहीम सुरु आहे.
पर्यटकांनी काळजी घेण्याची गरज…
सध्या ठीक-ठिकाणचे धबधबे व निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत. ज्या त्या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या सूचनांकडे दुर्लक्ष न करता पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्याची गरज अधोरेखित होत आहे.

रक्तदानातून स्व. राजारामबापू देसाई यांना आदरांजली; १७५ दात्यांचे उत्स्फूर्त योगदान

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, स्व. राजारामबापू देसाई यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्व. राजारामबापू देसाई फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल १७५ रक्तदात्यांनी रक्तदान करून बापूंना आदरांजली अर्पण केली. या शिबिरासाठी लायन्स ब्लड बँक, गडहिंग्लज यांचे विशेष सहकार्य लाभले.
शिबिराचे उद्घाटन सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी तहसीलदार समीर माने, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, साखर कारखान्याचे आजी-माजी संचालक, तालुका खरेदी-विक्री संघाचे आजी-माजी संचालक, तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी आणि फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्व. राजारामबापू देसाई फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

शेतकऱ्यांना मागणी प्रमाणे विनाअट खते शासनाने द्यावीत.
आजरा येथे माकपची मागणी

ग्रामीण भागातील वाडी वस्तीवर राहणारे शेतकरी यांच्या कडे फोनची रेंज वेळेवर मिळत नाही. त्यामुळे शासनाने खते देण्यासाठी घातलेली आँनलाईन नोंद रद्द करून , शेतकऱ्यांना खते उपलब्ध करून द्यावी. यासाठी आजरा नायब तहसिलदार विकास कोलते यांना सर्वश्रमीक संघटना व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
खतांचे वाचलेले दराने शेतकरी अडचणीत असताना आँनलाईन खतांची नोंद करुन केवळ जुजबी खते देऊन शेतकऱ्यांची फसवणूक व अडचण केली जात आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून रासायनीक खता शिवाय शेती पिकत नाही. शेतकरी खतांचा योग्य वापर करत असताना, गैर वापर करण्यार्याना मोकाट सोडून शासन शेतकऱ्यांच्या आड येत शेती व शेतकरी यांना अडचणीत ठेवत आहे. पेट्रोल डिझेलचे दर वाढल्याने मशागतीचे व मजूरांचे दर वाढले ,तर जंगली जनावरे शेतीचे नुकसान करीत आहेत. याचा परिणाम शेती उत्पादनांवर होत असल्याने शासनाने विनाअट खते उपलब्ध करून द्यावी अशी मागणी काँ.शांताराम पाटील यांनी केली आहे.
यावेळी नारायण भडांगे, महादेव होडगे ,हिंदूराव कांबळे, काका देसाई, निवृत्ती मिसाळे, दौलती राणे, सदाशिव नार्वेकर, काशिनाथ मोरे , संजय घाटगे उपस्थित होते.

आजरा हायस्कूलमध्ये १० कोटी नशामुक्त प्रतिज्ञा महाअभियान उत्साहात संपन्न

राजयोग एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशनच्या वैद्यकीय विभागामार्फत आयोजित ‘१० कोटी नशामुक्त प्रतिज्ञा महाअभियान’ आजरा हायस्कूल, आजरा येथे उत्साहात संपन्न झाले. ब्रह्माकुमारी राजयोगिनी संध्या बहनजी व मनीषा बहनजी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात शाळेतील ९८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत नशामुक्तीची प्रतिज्ञा केली.यावेळी विद्यार्थ्यांना व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले तसेच निरोगी व व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री. ए. आर. व्हसकोटी पर्यवेक्षक श्री.एम. एस.गोरे, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो क्लिक…

आजरा तालुक्यामध्ये भातरोप लावणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.
स्थळ : पोळगाव शिवार

आजचे पंचांग
दिनांक : ५ ऑगस्ट २०२६
वार : बुधवार
माह (अमावस्यांत) : आषाढ
माह (पूर्णिमांत) : श्रावण
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन tv
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : सप्तमी तिथी (रात्री ०८.४२ पर्यंत) त्यानंतर अष्टमी तिथी
नक्षत्र : अश्विनी नक्षत्र (रात्री ०९.१७ पर्यंत) त्यानंतर भरणी नक्षत्र
योग : शूल योग (सायंकाळी ०५.२८ पर्यंत) त्यानंतर गण्ड योग
करण : विस्ती भद्रा करण (सकाळी ०९.२६ पर्यंत) त्यानंतर भाव करण
चंद्र राशी : मेष राशी
सूर्य राशी : कर्क राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी १२.४४ ते दुपारी ०२.२१ पर्यंत
सूर्योदय : सकाळी ०६.१८
सूर्यास्त : सायंकाळी ०७.११
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

छाया वृत्त

स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्या कल्पनेतून साकारलेल्या व आमचे नेते माननीय नाम. हसनसो मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या अथक प्रयत्नातून पूर्णत्वास गेलेल्या आंबेओहोळ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला.
याप्रसंगी धरणातील पाण्याचे पाणी पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी वसंतराव धुरे साहेब. श्री काशिनाथ आण्णा तेली, श्री शिरीष देसाई, विकासराव चोथे, गणपतराव सांगले,, गंगाधर हराळे, शंकर पावले, संजय येजरे, विजयराव वांगणेकर., रामदास साठे, सागर सरोळकर, संजय पवार , तुषार घोरपडे, संभाजीराव पाटील, विनायक तेली, दशरथ धुरे, सागर वाघरे, दशरथ पावले, तात्या देसाई,संजय पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


