mrityunjaymahanews
कोल्हापूरठळक बातम्या

सातच्या बातम्या

नवीन आकारणीप्रमाणे कर भरू नका… माजी नगरसेवकांचे आजरेकरांना आवाहन

                     आजरा: प्रतिनिधी

         नगरपंचायतीच्या करवाढीस नगरसेवकांना जबाबदार धरणे हा नगरसेवक पदासाठी इच्छुक असणाऱ्यांकडून  सुरू असलेला  केवळ सध्याच्या नगरसेवकांच्या बदनामीचा प्रयत्न आहे. या करवाढीमध्ये सध्या संपुष्टात आलेल्या नगरपंचायत सभागृहातील नगरसेवकांचा कोणताही, कसलाही संबंध नाही. आपलाही या करवाढीस विरोध आहे.नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत नवीन कर आकारणी प्रमाणे कराचा भरणा करू नये. त्यातूनही कर वसुलीचा प्रयत्न झाल्यास आजरा शहर बंद ठेवू असा इशारा विद्यमान नगरसेवकांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिला.

        नगरपंचायतीकडून करण्यात आलेल्या करवाढीच्या पार्श्वभूमीवर आजरा येथील शहरवासीय संतप्त भावना व्यक्त करत असून या सर्व प्रकारास मावळत्या सभागृहातील नगरसेवक जबाबदार आहेत असा आरोप केला जात आहे. काल गुरुवारी शहरवासीयांनी करवाढीचा निषेध नोंदवत करवाढीस जबाबदार थरत नगरसेवकांवरही ताशेरे ओढले होते. या सर्व पार्श्वभूमीवर आज नगरसेवकांनी पत्रकार बैठक घेतली.

          यावेळी बोलताना ज्येष्ठ नगरसेवक अशोकअण्णा चराटी म्हणाले, कोणत्याही सभेमध्ये करवाढीचा विषय आलेला नाही. त्यामुळे नगरसेवकांनी या करवाढीला पाठिंबा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. गरज नसताना नाहक हा विषय नगरसेवकांवर लादला जात आहे.नगरसेवक विलास नाईक म्हणाले, करवाढीस कोणत्याही नगरसेवकाने यापूर्वी समर्थन दिलेले नाही अथवा आजही या करवाढीस कोणत्याही प्रकारचे समर्थन नाही. केवळ शासकीय नियमाप्रमाणे मूल्यांकन करण्यास सभागृहात मंजुरी देण्यात आली होती करवाढीचा कोणताही विषय सभागृहात घेतला गेलेला नाही . मार्च २०२४ पर्यंत जुन्या दरानेच कर आकारणी करावी व नवीन सभागृह अस्तित्वात आल्यानंतर सभागृहासमोर हा विषय ठेवून त्यानंतरच याबाबतचा निर्णय घ्यावा अशा सूचना नगरसेवकांनी यावेळी कर विभागाला केल्या.

        बैठकीस  नगरसेवक संभाजीराव पाटील, अनिरुद्ध केसरकर,अभिषेक शिंपी, किरण कांबळे सिकंदर दरवाजकर यांच्यासह नगरपंचायतीचे कर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आजचे मरण उद्यावर…

         गेले दोन दिवस नगरपंचायतीच्या कर विभागाकडून दिली जात असणारी माहिती व शासनाचे निर्देश विचारात घेता कोणत्याही परिस्थितीत करवाढ होणार हे स्पष्ट होऊ लागले आहे. फरक फक्त इतकाच आहे की ही करवाढ लांबवली जाईल परंतु कर वाढ निर्णय लांबला तर पुन्हा रेडीरेकनरचे दर वाढून जादा कराचा भार शहरवासीयांना बसण्याची शक्यताही नाकारता येत नाही. याकरिता आता व्यापक जनआंदोलनाची गरज भासू लागली आहे.

नगरपंचायतीची पुन्हा ग्रामपंचायत करता येईल का?

          गेल्या सहा वर्षातील बरे वाईट अनुभव लक्षात घेता शहरांमध्ये प्राथमिक सुविधा तर कोणत्याच नाहीत परंतु बांधकाम परवान्यांसह करवाढीचे भूत मानगुटीवर बसत असल्याने आता कांही शहरवासीय नगरपंचायतीची पुन्हा ग्रामपंचायत करता येईल का… यासाठी नेमकी प्रक्रिया काय ? असा सवाल ही करू लागली आहेत. एकंदर ग्रामपंचायतचे नगरपंचायत करण्याची शहरवासीयांची हौस आता भागली असल्याचेही स्पष्ट होत आहे.



आजरा तालुक्यातील संगणक परिचालकांचे ऑनलाइन व ऑफलाईन कामकाज पूर्णपणे बंद

                    आजरा : प्रतिनिधी

       आजरा येथील संगणक परिचारक वतीने शुक्रवार दि.२४ नोव्हेंबर श पासून संगणक परिचालक संघटना आजरा तालुका यांचेमार्फत काम बंद आंदोलन करण्यात आले असून याबाबत  पुढील रूपरेषा व संघटनेच्या पुढील नियोजनासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.

       यावेळी उपस्थित आजरा तालुका दोन्ही ग्रामसेवक संघटनेचे संघटनेचे अध्यक्ष अशोक सानप, उपाध्यक्ष संदीप चौगुले दुसऱ्या संघटनेचे अध्यक्ष सचिन गुरव, सहकारी दिग्विजय देसाई या सर्वांनी उपस्थित राहून आजरा तालुका संगणक परिचालक संघटनेला मार्गदर्शन केले.

        भुदरगड तालुका संगणक परिचालक संघटनेचे कार्याध्यक्ष उत्तम मोरे तसेच संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष चंदगड तालुका संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच संगणक परिचालक संघटना गडहिंग्लज चे अध्यक्ष उपाध्यक्ष उपस्थित होते. आजरा तालुका संघटनेचे अध्यक्ष अर्जुन मिसाळ , उपाध्यक्ष सूर्याजी पाटील, सचिव सुनील धडाम, खजिनदार नितेश पाटील त्याचबरोबर आजरा तालुक्यातील सर्व संगणक परिचालक दिपाली शिरगुप्पे, जयश्री पुंडपळ, सरिता पाटील, अनिता ढोणूक्षे, स्मिता कांबळे,सुरेखा मगदूम, प्राजक्ता फगरे, शारदा गुरव, नीता कबीर, श्रावण चौगुले, बावतीस बारदेसकर, संभाजी पाटील, सचिन इलगे, महादेव बेंदके, बाळू कुंभार , संदीप भगूत्रे, प्रेमानंद पोवार, भरत पाटील, गोकुळ तेजम, सुधीर फडके, संदीप सरोळकर, शरद बोटे, सारिका संकपाळ इत्यादी सर्व उपस्थित होते.

         यावेळी आजरा तालुका दोन्ही ग्रामसेवक संघटना यांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. शासनाने आजपर्यंत आश्वासने दिली आहेत पण कार्यवाही कोणत्याही प्रकारची झाली नाही.जोपर्यंत शासनाकडून संघटनेच्या मागण्या मान्य केला जात नाही व ठोस निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत तालुक्यातील सर्व संगणक परिचालक आपले ऑनलाइन व ऑफलाईन कामकाज पूर्णपणे बंद राहील असा निर्णय संगणक परिचालक संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे.



कोविड काळातील परिचारिका व सफाई कामगार यांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लावा

शिवसेनेची मागणी

                     आजरा: प्रतिनिधी

        कोविड काळातील परिचारिका व सफाई कामगार यांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)तर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

       कोविड कालावधीमध्ये जीवाची परवा न करता परिचारिका व सफाई कामगार यांनी चांगल्या पद्धतीने काम केले आहे असे असूनही अद्याप त्यांना मानधनापासून वंचित ठेवण्यात आले आहे हा संबंधितांवर अन्याय आहे असे यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांनी सांगितले.

        प्रशासनाने संबंधितांच्या कामाची दखल घेऊन तातडीने त्यांना  मानधन अदा करावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.याबाबतचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांना शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, आजरा तालुकाप्रमुख युवराज पोवार, करवीर संपर्कप्रमुख सुरेश चौगुले यांनी दिले आहे.



सोमवारी निंगुडगे येथील श्री कार्तिक स्वामी दर्शन यात्रा


                  ‌आ‌‌जरा:प्रतिनिधी

        ‌सोमवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी निंगुडगे तालुका आजरा येथील भगवान श्री कार्तिक स्वामी यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यशवंत गिरी यांनी दिली.

        कार्तिक स्वामींचे दर्शन स्त्रियांकरीता वर्षातून फक्त एकदाच खुले असते त्यामुळे महिला वर्गांकरिता ही परभणी आहे सोमवारी पहाटे पाच वाजल्यापासून दुपारी एक वाजून ३५ मिनिटांपर्यंत सदर दर्शन घेता येणार आहे असेही गिरी यांनी स्पष्ट केले.



अखिल भारतीय जनहित पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर कोरवी

                   आजरा:प्रतिनिधी

        अखिल भारतीय जनहित पार्टीच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी(ग्रामीण) श्री. प्रभाकर यल्लाप्पा कोरवी यांची निवड करण्यात आली आहे.

        संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कृष्णात दादासो पाटील व महाराष्ट्राचे प्रभारी अध्यक्ष अमित बबन चव्हाण यांनी त्यांना नुकतेच निवडीचे पत्र दिले असून या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



संबंधित पोस्ट

राष्ट्रीयकृत बँका प्रमाणे शासनाच्या योजना पतसंस्थेमार्फत राबविणार : आ. प्रकाश आबिटकर….  आजरा येथे ‘कॅश्यू मॅन्युफॅक्चर’च्या कार्यालयाचे उद्घाटन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजऱ्यात नाताळ उत्साहात सुरुवात… भाजपाकडून अटलजींना आदरांजली… वडाप चालकांच्या मनमानीमुळे तालुकावासिय हैराण

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!