आजरा येथील
आजरा आंबोली फाट्यावर दुचाकी घसरून युवक ठार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा आंबोली मार्गावर वर्षा पर्यटनासाठी गेलेल्या आजरा येथील आदित्य भिकाजी कोरवी या अठरा वर्षीय युवकाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आदित्य व त्याचे दोन मित्र ओंकार कारेकर वेदांत कोंडुसकर वर्षा पर्यटन आटोपून आज-याच्या दिशेने येत होते.
आजरा फाट्यावर दुचाकी घसरून आदित्य बाजूला असलेल्या दगडावर जोराने आपटला त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
आंबोली पोलीस स्टेशनचे दीपक शिंदे व मनीष शिंदे अपघाताची माहिती घेतली. आंबोलीचे वैद्यकीय अधिकारी महेश जाधव यांनी डोके दगडावर आपटल्याने गंभीर दुखापत झाल्यामुळे आदित्य याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
अन्य दोघेजण किरकोळ जखमी आहेत.
