शनिवार दि.७ जून २०२५

किटकनाशक प्राशन केलेल्या मेढेवाडी येथील एकाचा मृत्यू
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दोन दिवसापूर्वी कीटकनाशक प्राशन केलेल्या मेढेवाडी ता. आजरा येथील श्रावण कृष्णा दळवी ( वय ४७ वर्षे ) यांचे कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, वडील आणि भाऊ असा परिवार आहे.
शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जमिनीच्या वादातून खानापूर येथे महीलेस मारहाण : एका विरोधात गुन्हा नोंद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
खानापूर ता. आजरा येथे जमिनीच्या वादातून शिवार नावाच्या शेतामध्ये गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सुषमा सुभाष राणे रा. खानापूर यांना मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी उत्तम जोतिबा सडोलकर रा. खानापूर यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
याबाबतची फिर्याद सुषमा राणे यांनी पोलिसात दिली आहे.

बियाणे, खते भेसळ अथवा लिंकींग केल्यास कठोर कारवाई करणार : तहसिलदार श्री. समीर माने

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
खरीप हंगामामध्ये आजरा तालुक्यातील शेतक-याना दर्जेदार बियाणे व खते याचा पुरवठा व्हावा या अनुषगाने शिवसेना आजरा तालुका पक्षाच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले होते. यास अनुसरून तहसिल कार्यालय आजरा येथे तहसिलदार श्री. समीर माने याच्या अध्यक्षतेखाली तालुका कृषि अधिकारी, पंचायत समिती आजरा कडील कृषि अधिकारी यांच्या समवेत तालुक्यातील परवाना धारक बियाणे खते, किटकनाशके विक्रेते व शिव सेना पदाधिकारी याची संयुक्त बैठक पार पडली.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख यांनी तालुक्यातील कांही ठिकाणी खत विक्रीवर लिंकीग होत आहे का तसेच बियाणे विक्रीमध्ये जादा दराने विक्री होत आहे का ? याबाबत विचारणा केली तसेच या कामी तालुका कृषि अधिकारी व कृषि अधिकारी, पंचायत समिती यांनी या हंगामात किती तपासण्या केल्या अशी विचारणा करण्यात आली. आत्मा प्रकल्प सदस्य, श्री इंद्रजित देसाई यांनी तालुका कृषि व पंचायत समिती कडील कृषि विभागाने बियाणे व खताचे किती नमुने काढले या बाबत विचारणा केली. या वेळी पंचायत समिती कडील सहाय्यक गट विकास अधिकारी श्री दिनेश शेटे यांनी, वेळोवेळी कृषि सेवा केंद्राची तपासणी केली असून पंचायत समिती कृषि विभागाकडून बियाणे -१३ व खताचे ६ नमुने या खरीप हंगामात काढल्याचे सांगितले.
तालुका कृषि अधिकारी भूषण पाटील यांनी ही यांच्याकडून या हंगामात बियाणे ३, खताचा १ नमुना काढल्याचे सांगितले, तक्रारीच्या अनुषगाने तालुक्यातील कोणत्याही शेतक-याकडून बियाणे, खरेदी विक्री, खते खरेदी विक्री किवा भेसळ ज्यादा दराने विक्री व लिकीग या बाबत तक्रार आल्यास तालुका-स्तरीय भरारी पथकाकडून छापे टाकुन कठोर कायदेशीर कारवाई करणेत येईल असा इशारा तहसिलदार श्री. समीर माने यांनी दिला. सर्वाच्या समन्वयाने शेतक-यांना योग्य रितीने व दर्जेदार निविष्ठा पुरविण्यासाठी तालुका प्रशासन कटीबध्द असल्याचे श्री. माने यानी सांगितले. यावेळी शहर प्रमुख विजय थोरवत, संतोष भाटले, दाभील सरपंच श्री युवराज पाटील व साळगांव सरपंच श्री धनजय पाटील नायब तहसिलदार श्री म्हाळसाकांत देसाई यांनी यावेळी झालेल्या चर्चेत भाग घेतला.
बैठकीस सुनील दिवेकर, मंदार बिरजे, युवराज पाटील यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

आजऱ्यात पोलिसांचे संचलन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा पोलिस ठाणेच्या वतीने बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातून संचलन करण्यात आले.
गडहिंग्लजचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांच्या उपस्थितीत झालेल्या या संचलनामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्यासह पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाचे जवान सहभागी झाले होते.

आजरा तालुका मराठा महासंघामार्फत शिवराज्यभिषेक दिन

आजरा तालुका मराठा महासंघामार्फत शिवराज्याभिषेक दिन उत्सव साजरा करण्यात आला. संघटनेचे उपाध्यक्ष श्री.शंकरराव शिंदे व कार्याध्यक्ष श्री.संभाजीराव इंजल यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. पारेवाडी येथे विविध प्रजातींच्या झाडांचे रोपण करण्यात आले.
यावेळी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, जिल्हा उपाध्यक्ष सी. आर.देसाई, तालुका अध्यक्ष बंडोपंत चव्हाण, सरचिटणीस प्रकाश देसाई, खजिनदार, सूर्यकांत आजगेकर, कार्यकारिणी सदस्य भाऊ निर्मळे, आजी – माजी सैनिक वेल्फेअर फौडेशनचे अध्यक्ष, दत्तात्रय मोहिते, शिवाजीराव इंजल, सी.आर.देसाई, चंद्रकांत पारपोलकर, विष्णू सुपल, आनंदा गावडे, महादेव पोवार, शिवाजीराव गुडूळकर, गणपतराव डोंगरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.





