mrityunjaymahanews
अन्य

सोमवार – सातच्या बातम्या

सोमवार 

२४ ऑगस्ट २०२६

पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीची दूर्दशा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा पोलीस ठाण्याच्या जुन्या ब्रिटिशकालीन इमारतीची पूर्णपणे दुर्दशा होऊ लागली असून इमारतीवर आजूबाजूच्या झाडांच्या फांद्या आल्याने संपूर्ण इमारतीचे छप्पर कोसळण्याच्या स्थितीत आहे.

सुमारे दीडशे वर्षांपूर्वी ब्रिटिश कालावधीत बांधलेली ही इमारत अतिशय देखणी अशी असून महसूल विभागाकडे आहे. येथील एका बाजूला असणारे तहसीलदार कार्यालय व दुसऱ्या बाजूचे पोलीस ठाण्याचे कार्यालय नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. यामुळे गेल्या आठ ते दहा वर्षात या इमारतीच्या पडझडीकडे पूर्णपणे दुर्लक्ष सुरू असून ही इमारत तातडीने वापरात आणणे गरजेचे आहे.

आजरा नगरपंचायतीने सदर इमारतीची मागणी नगरपंचायतीच्या कार्यालयाकरिता केली आहे. त्या दृष्टीने प्रयत्नही सुरू आहेत. परंतु सद्यस्थितीत या इमारतीची दुरुस्ती व देखभाल करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे मुख्यालय तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी स्तरावर हलवण्यास विरोध

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे (RBSK) मुख्यालय ग्रामीण रुग्णालयातून तालुका वैद्यकीय अधिकारी (THO) कार्यालयात हलवण्याच्या राज्य आरोग्य विभागाच्या निर्णयाला विरोध होत आहे.

शासनाच्या २० ऑगस्टच्या मार्गदर्शक सूचनेनुसार हा प्रशासकीय बदल प्रस्तावित आहे. सध्या RBSK पथके ग्रामीण, उपजिल्हा आणि जिल्हा रुग्णालय स्तरावर कार्यरत आहेत.

या निर्णयामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील बालकांच्या उपचारावर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. ग्रामीण रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ, नेत्र, ENT व सर्जन उपलब्ध असल्याने बालकांना एकाच ठिकाणी तात्काळ उपचार मिळतात. THO स्तरावर या तज्ज्ञ सेवा नाहीत, त्यामुळे जन्मजात हृदयविकार, मोतीबिंदूसारख्या गंभीर आजारांवरील शस्त्रक्रियेस विलंब होईल आणि पालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल.

त्यामुळे RBSK चे मुख्यालय पूर्वीप्रमाणेच RH/SDH/DH स्तरावरच ठेवावे, अशी मागणी करणारे निवेदन NHM च्या अभियान संचालक, प्रधान सचिव आणि आरोग्य संचालकांना देण्यात आले आहे.

चमत्कार करणाऱ्या, ढोंगी साधू पासून सावध रहा : काशिनाथ मोरे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

समाजातील मानसिकतेचा फायदा घेऊन चमत्कारिक प्रभाव दाखवून, जनतेला दिशाभूल करणार्या, ढोंगी साधू पासून सावध राहावे. असे आवाहन काशिनाथ मोरे यांनी दाभिल हायस्कूल मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन दिनाच्या निमित्ताने व डाँ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मार्गदर्शन व जादूचे प्रयोग व त्यामागचे विज्ञान समजून सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक संजय देवेकर होते.

मोरे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी काही जादूच्या प्रयोगातून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.त्या प्रयोगाचे निष्कर्ष सांगत, विद्यार्थ्यांनी सजग समाजासाठी, योगदान देण्याची गरज असल्याचे सांगितले. काँ संजय घाटगे यांनी श्रध्दा व अंधश्रध्दा निर्मूलनासाठी आयुष्य संपवलेल्या डाँ. नरेंद्र दाभोळकर यांच्या कार्याचे स्मरण करून डोळसपणे कृतीतून, विचार करणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी आजरा तालुका अंधश्रध्दा निर्मूलन समिती उपाध्यक्ष भिकाजी कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत व सुत्रसंचलन बि.एम.कामत यांनी केले यावेळी दाभिल हायस्कूल शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. आभार एस. एन. नार्वेकर यांनी व्यक्त केले.

छायावृत्त…

आजरा शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम राबवण्यात आली. ही मोहीम राबवून चार दिवस होतात न होतात तोच शहरभर पुन्हा कुत्र्यांचा सुळसुळाट दिसू लागला आहे. खरोखरच भटकी कुत्री पकडली का ? हा प्रश्न निर्माण होण्याजोगी सध्या परिस्थिती आहे

मलिग्रे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सुप्रिया खेगडे यांची निवड

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

महात्मा जोतिबा फुले विद्या मंदिर मलिग्रे या मराठी शाळेच्या सन २०२६/२०२८ या साला करीता शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सौ. सुप्रिया खेगडे तर उपाध्यक्ष पदी मनिषा हरेर यांची निवड करण्यात आली.सदस्यपदी रेशमा चौगले, राणी निकम,पुजा पन्हाळकर,मनिषा भगुत्रे ,राहूल धुमाळे, बाळू कांबळे, संदीप देशपांडे,अर्जून निकम शिक्षण तज्ज्ञ राजू कोकितकर तसेच पंचायत समिती सदस्य समीर पारदे यांच्या सह सर्व सदस्यांचे स्वागत मुख्याध्यापक कल्पना कोरवी केले तर आभार शिक्षिका वैशाली जोशिलकर यांनी मानले.

निधन वार्ता

मारुती येरुडकर

पेरणोली ता. आजरा येथील मारुती हरी येरुडकर
( वय ६५ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

संक्षिप्त…

बिबट्याच्या बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर मडीलगे ग्रामस्थांच्या वतीने आज सोमवारी सकाळी ११ वाजता वनविभागाला सामूहिकरीत्या जाऊन निवेदन देण्यात येणार आहे.

आजचे पंचांग 

दिनांक : २४ ऑगस्ट २०२६
वार : सोमवार
माह (अमावस्यांत) : श्रावण
माह (पूर्णिमांत) : श्रावण
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : द्वादशी तिथी (२५ ऑगस्ट सकाळी ०६.२० पर्यंत) त्यानंतर त्रयोदशी तिथी
नक्षत्र : पूर्वाषाढा नक्षत्र (रात्री ०८.२७ पर्यंत) त्यानंतर उत्तराषाढा नक्षत्र
योग : प्रीति योग (सकाळी ०७.०३ पर्यंत) त्यानंतर आयुष्मान योग
करण : भाव करण (सायंकाळी ०५.२२ पर्यंत) त्यानंतर बलवा करण
चंद्र राशी : धनु राशी (२५ ऑगस्ट पहाटे ०३.०५ पर्यंत) मकर राशी
सूर्य राशी : सिंह राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०७.५७ ते सकाळी ०९.३२ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१६ ते दुपारी ०१.०६
सूर्योदय : सकाळी ०६.२३
सूर्यास्त : सायंकाळी ०६.५९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा अर्बन बँकेच्या गारगोटी शाखेचे नूतनीकरण व उद्घाटन..

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

नानासाहेब (बंटी) देसाई यांचे निधन

mrityunjay mahanews
error: Content is protected !!