mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

बुधवार  दिनांक १६ ऑक्टोबर २०२४

तण नाशक प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      श्रृंगारवाडी ता. आजरा येथील सौ. नम्रता सागर दळवी या २६ वर्षीय विवाहितेने चार दिवसापूर्वी तणनाशक प्राशन केल्याने तिला प्रथम गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात व त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

     याबाबतची नोंद पोलिसात झाली असून तणनाशक प्राशन  करण्याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.

    नम्रताचे माहेर मुंगूसवाडी ता.आजरा असून तिच्या पश्चात पती, मुलगी असा परिवार आहे. श्रृंगारवाडी येथे तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

आजी-माजी सैनिकांसाठी काम करता आले याचे समाधान : आम.आबिटकर आजऱ्यात सैनिक भवनचे उद्घाटन

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     देशाच्या सीमा सुरक्षित राखण्याचे काम सैनिक करतात म्हणूनच देशातील तमाम जनता सुरक्षित राहते. आजऱ्यात उभारण्यात आलेल्या सैनिक भवनसाठी निधी उपलब्ध करून देता आला याचे आपल्याला समाधान असल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. आजरा येथील सैनिक भवन (सांस्कृतिक सभागृह) उद्द्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते जयवंतराव शिंपी होते. जनता बँकेचे चेअरमन मुकुंदराव देसाई, सहाय्यक जिल्हा सैनिक अधिकारी सुभाष डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

     प्रास्ताविक माजी सैनिक वेल्फेअर फौंडेशनचे अध्यक्ष दत्तात्रय मोहिते यांनी केले. या सैनिक भवनसाठी आमदार आबिटकर यांनी निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे आजऱ्यात मध्यवर्ती ठिकाणी हे सैनिक भवन उभारले असून आजी-माजी सैनिकांसाठी हक्काचे ठिकाण झाले आहे. आम्ही सदैव आपल्या सोबत राहू अशी ग्वाही मोहिते यांनी आबिटकर यांना दिली.

     यावेळी आमदार आबिटकर म्हणाले, देशाच्या संरक्षण सेवेत आजरेकरांचे मोठे योगदान आहे. तुम्ही सर्व आजी-माजी सैनिकांनी कुटुंबापासून शेकडो मैल दूर राहून देशसेवा बजाविली. तुमची उमेदीची वर्षे देशसेवेसाठी दिली आहात, तुम्हा सैनिकांना आम्हाला सदैव अभिमान आहे. यापुढच्या काळातही आपले सहकार्य राहील अशी हमी आबिटकर यांनी दिली. अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ नेते शिंपी यांनी आजऱ्यात सैनिक भवन उभारण्यासाठी जागा मिळविण्यापासून इमारत उभी राहण्यापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी माजी सभापती रचना होलम, माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, माजी नगरसेविका संजीवनी सावंत, गोविंद गुरव, राजू होलम यांच्यासह आजी-माजी सैनिक उपस्थित होते.

निधन वार्ता
प्रकाश घोडके

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

         संभाजी चौक, आजरा येथील हॉटेल व्यावसायिक/हॉटेल समाधान चे मालक श्री. प्रकाश मल्हारी घोडके (वय ६६ वर्षे) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने काल मंगळवारी दुपारी निधन झाले.

      त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

रामतीर्थ रस्त्यावरील पर्यटक कर आकारणी बंद करण्याची मागणी

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजऱ्यापासून जवळच असलेल्या रामतीर्थ या धार्मिक व पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या मार्गावरील वन विभागाच्या हद्दीमध्ये कर आकारणी नाका उभारण्यात आला आहे. या कर आकारणीमुळे दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या रोडावत चालली असून रामतीर्थ परिसरात उभारण्यात आलेल्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. वनविभागाने तातडीने ही कर आकारणी बंद करावी अशी मागणी अन्याय निवारण समितीच्या वतीने परिक्षेत्र वन अधिकारी मनोज कुमार कोळी यांच्याकडे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत करण्यात आली .

     यावेळी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे,सुधीर कुंभार, वाय. बी. चव्हाण, रवी भाटले, ज्योतिप्रसाद सावंत, बंडोपंत चव्हाण, दयानंद भोपळे आदींनी समितीची भूमिका मांडत हा कर अन्यायी स्वरूपाचा आहे व तो बंद करावा अशी मागणी केली.

     परिक्षेत्र वन अधिकारी मनोजकुमार कोळी यांनी या कर आकारणीच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या समितीचे जिल्हा वनसंरक्षक हे प्रमुख असून त्यांच्याकडे कर बंद करण्याच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन मागवले आहे. त्यांच्यासोबत बैठक घेऊन याबाबत चर्चा करण्यात येईल. या बैठकीला अन्याय निवारण समितीच्या पदाधिकाऱ्यांनाही आमंत्रित केले जाईल असे स्पष्ट केले.

     सदर बैठक होऊन पुढील चर्चा होईपर्यंत कर आकारणी बंद करण्याचा संयुक्त निर्णय घेण्यात आला.

व्यंकटराव प्रशालेत वाचन प्रेरणा दिन

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे प्राचार्य श्री. आर. जी.कुंभार, पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार यांचे हस्ते करण्यात आले.

     श्रीम.एन.ए.मोरे यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा संपूर्ण जीवन परिचय आणि वाचनाची आवड व त्याचे फायदे सांगून विद्यार्थ्यांनी वाचनालयातील जास्तीत जास्त पुस्तके आपल्या विद्यार्थी जीवनात वाचणे आवश्यक आहे असेही सांगितले. सूत्रसंचालन आर्या जाधव, मयुरी पाटील व विद्यार्थी भाषणमध्ये अलका पाटील ,प्राची ठाकर व आस्था गुरव यांनी आपले विचार मांडले.

      वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून ग्रंथपाल श्री. टी. एम. गुरव यांनी पुस्तक प्रदर्शन भरविले. त्याचे उद्घाटन प्राचार्य श्री. आर. जी. कुंभार व पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार यांच्या हस्ते करण्यात आले.

     यानंतर जागतिक हात धुवा दिनानिमित्त माहिती सौ. ए.एस. गुरव यांनी दिली व प्रत्यक्ष हात कसा धुवावा हे प्रात्यक्षिक सौ. व्ही.ए. वडवळेकर, श्रीम.एस.टी पाटील यांनी करून दाखविले. आभार श्री. पी.एस.गुरव यांनी मानले.

                          (Advt.)

लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..

     तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त…

       ✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
        ✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
        ✅ इतर अनेक सुविधा

                  🏡साईटचा पत्ता :

       समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा

                     ☎️ संपर्क –

            +91 9527 97 3969



 

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

राज्यपाल कोशारी यांच्या विरोधात आजऱ्यात शिवसैनिक आक्रमक… संभाजी चौकात केले जोडे मारो आंदोलन

mrityunjay mahanews

GROUND REPORT

mrityunjay mahanews
error: Content is protected !!