सोमवार दि.१७ मार्च २०२५


आमचा जगदीश कुठे दिसला का हो…?
मूकबधिर ‘जगदीश’ची सुरू आहे शोधमोहीम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर-चव्हाणवाडी (ता.आजरा) येथील श्री जोमकाईदेवी यात्रेसाठी गेलेला चिमणे येथील मूकबधिर २२ वर्षीय तरुण जगदीश दगडू कांबळे हा चार दिवस होऊन गेले तरी अद्याप परतलेला नसल्याने संपूर्ण चिमणेकरांनी शोध मोहीम हाती घेतली आहे.
मूकबधिर असला तरीही धार्मिक प्रवृत्तीचा असलेला जगदीश यात्रेनिमित्त चव्हाणवाडी येथील मंदिरात गेला. दिवसभर तो मंदिर परिसरात होता. त्यानंतर यात्रेत फिरत फिरत सायंकाळी सहापर्यंत तो चव्हाणवाडीकडे येत असताना रस्ता चुकून विरुद्ध बाजूच्या उत्तूरच्या दिशेने चालत गेला. अनेकांनी त्याला उत्तूरमध्ये पाहिलाही.मात्र तो मूकबधिर व बेपत्ता असल्याची कल्पना नसल्याने पाहणाऱ्यांना या घटनेचे गांभीर्य आले नाही. जगदीश रात्री उशिरापर्यंत न आल्याने
चिमणेकरांनी रात्रभर जोमकाईदेवी मंदिर परिसरात शोध घेतला . तो सापडला नाही. पुढे गडहिंग्लज, संकेश्वर, चिकोडी येथे मिळेल त्या माहितीच्या आधारे नागरिकांनी धाव घेऊन त्याला शोधण्याचा प्रयत्न चालवला आहे..
जगदीशच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. दुसरा भाऊही मूकबधिर आहे. आई एकटीच असते.
आईसह मूकबधिर भावाचेही जगदीशच्या परत येण्याकडे डोळे लागून आहेत.
क्ष 

राजकारणातला नवा ट्विस्ट… अशोकअण्णांचे दोन गटच आले समोरासमोर...

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्री भावेश्वरी विकास सेवा संस्था, बुरूडे च्या पंचवार्षिक निवडणुकीत अण्णाभाऊ सूतगिरणीचे संचालक शशिकांत सावंत,शंकर जोशीलकर, आनंदा तेंडुलकर ,सूर्यकांत कांबळे व अशोकअण्णाचराटी गटाचे जेष्ठ नेते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दीपक सातोसकर , उपसरपंच सुनील बागवे, संदीप होण्याळकर, संजय कांबळे यांच्या आघाडीत थेट लढत झाली. एकाच गटाच्या दोन आघाड्यांमध्ये झालेल्या या लढतीत डॉ.सातोसकर यांच्या आघाडीने एकतर्फी विजय मिळवला. विरोधी आघाडीला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले.
काल रविवारी सहाय्यक निबंध सुजयकुमार येजरे यांच्या नियंत्रणाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. विरोधकानां ५० मतांच्या आसपास मतदान संस्थापक पँनेलला १३५ मते एकूण १९४ मतदान झाले.
ग्रामपंचायत बुरूडे नंतर सोसायटी मध्ये पण या गटाचा वरचष्मा राहिला आहे. शक्य असूनही सदर निवडणूक बिनविरोध झाली नाही.दोन गट समोरासमोर भिडले. संस्थापक डॉ. दीपक सातोसकर यांच्या गटाला सभासदांनी भरघोस प्रतिसाद दिला आणि विश्वास दाखवला.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे…
सर्वसाधारण प्रतिनिधी-
डॉ .सातोस्कर दिपक केशवराव,पेंडसे कृष्णा महादेव,बागवे निलेश दशरथ,बागवे राजाराम शामराव,बागवे वसंत बंडू,बागवे सुनिल रामचंद्र,होन्याळकर अवण्णाप्पा हरी,होन्याळकर विष्णू रामचंद्र
अनुसूचित जाती / जमाती प्रतिनिधी-
कांबळे दौलती तातोबा
महिला प्रतिनिधी-
सोनुले संपदा सुभाष
होन्याळकर सुमित्रा बबन
भटक्या विमुक्त जाती प्रतिनिधी-
गिरी संतोष पांडुरंग
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी-
गुरव वैशाली नेताजी
निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व आतषबाजी करत जल्लोष केला.

पेरणोली येथील तुकाराम बीजला भाविकांची गर्दी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली (ता. आजरा) येथील तुकाराम बीज सोहळा जिल्ह्यातील हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.देहूनंतर पेरणोलीत बीजोत्सव साजरा केला जात असल्याने बीजोत्सवाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
सकाळी आठ ते नऊ पारायण झाले. त्यानंतर पंढरपूर येथील आजरेकर फडाचे अँड कृष्णा चवरे महाराज यांचे कीर्तन झाले.त्यांनी तुकाराम महाराजांच्या विचारांना व दुपारी बारा वाजता फुले वाहून तुकाराम महाराजांच्या अभंगाने कार्याला उजाळा देण्यात आला.
यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.बीजोत्सव यशस्वी करण्यात ग्रामस्थासह तरूणांनी मोठा सहभाग नोंदवला.
खेळणी स्टॉल, थंडपेय, आईस्क्रीम, नारळ, आदींचे स्टॉल मांडण्यात आले होते.


आज भादवण येथे संयुक्त शिवजयंती उत्सव व शिवजन्मोत्सव सोहळा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आज सोमवार दि. १७ मार्च २०२५ रोजी छ. शिवाजी महाराजांची जयंती (तिथीनुसार) भादवण गावामध्ये साजरी होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ८ वाजता किल्ले वल्लभगडाडून शिवज्योतीचे आगमन व शिवज्योत पुजन करून पारंपारिक पद्धतीने मिरवणूक सोहळा होणार आहे.
सकाळी ११ वाजता. श्री. शिवप्रतिमेचे पुजन,दुपारी ३ वाजता भब्य तालुकास्तरीय लेझिम स्पर्धा,रात्री ७:३० वाजता पाळणा गीत व हातप्रसाद, रात्री ८ वाजता छावा चित्रपट दाखवण्यात येणार आहे.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९ म




