mrityunjaymahanews
अन्य

मुदत संपत आली :  कामांची पूर्तता करा…

मुदत संपत आली :  कामांची पूर्तता करा…

नगरसेवकांच्या अधिकाऱ्यांना सूचना

आजरा नगरपंचायत मासिक सभा

आजरा नगरपंचायतीच्या विदयमान नगरसेवकांची मुदत दहा मे ला संपणार आहे. दहा मे नंतर नगरपंचायतीचा कारभार प्रशासकाच्या ताब्यात जाणार आहे. निवडणूक कालावधीत शहरवासीयांना दिलेल्या आश्वासनास बांधील राहून खासदार, आमदार यांच्यासह विविध माध्यमातून अनेक विकासकामे मंजूर करून आणली आहेत. अधिकाऱ्यांनी तातडीने सदर कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. अशा सूचना नगरसेवकांनी नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

आजरा नगरपंचायतीची मासिक सभा झाली. या वेळी विविध विषयावर चर्चा झाली. नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. विकास कामांवर चर्चा सुरु असतांना नगरसेविका सुमैय्या खेडेकर यांनी एकीकडे कोट्यावधींची विकास कामे सुरु असतांना दुसरीकडे आपण सूचवलेल्या प्रभागातील कामांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. तर यास्मिन बुड्डेखान यांनी साई कॉलनीतील रस्ते, गटर्सचा मुद्दा उपस्थित करत एकंदर कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ज्येष्ठ नगरसेवक अशोक चराटी म्हणाले, विकासकामांच्या माध्यमातून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातूनही काही प्रभागामध्ये विकासकामे अपूर्ण अवस्थेत असतील तर संबंधीत प्रभागातील नगरसेवकांनी सुचवावीत व त्याबाबतचे प्रस्ताव अधिकाऱ्यांकडे दयावेत. सध्यस्थितीला सौर ऊर्जा प्रकल्प, अग्नीशमन दलाची गाडी, कचरा प्रक्रिया प्रकल्प, नवीन पाणीपुरवठा योजना या महत्वकांक्षी योजनांची कामे युध्द पातळीवर सुरु आहेत. स्वच्छ व चोवीस तास पाणी देणारी नवीन पाणीपुरवठा योजना असून या योजनेच्या पूर्ततेचा कालावधी अठरा महीन्यांचा असला तरी नऊ ते दहा महीन्यात योजना कार्यान्वीत करण्याबाबत संबंधीत ठेकेदारांना सूचना करण्यात आल्या असून त्या दिशेन प्रयत्न सुरु आहेत.

नगरसेवक अभिषेक शिंपी यांनी मांडलेला आपटे कॉलनी येथे खासदार संजय मंडलिक यांच्या शहर विकास निधीतून  लोकनेते (कै) सदाशिवराव मंडलिक यांच्या नावाने  पन्नास लाख रुपये खर्चून बगीचा तयार करण्यासाठीचा ठरावास मंजुरी देण्यात आली. तर खा. मंडलिक यांनी सौर उर्जेवर चालणाऱ्या पथदिव्यांसाठी नव्वद लाखांचा निधी मंजूर केला असल्याचेही शिंपी यांनी सांगितले. या निधीबद्दल खासदार  संजय मंडलिक यांच्या नगरपंचायतीच्या वतीने अभिनंदनचा ठरावही सभेत करण्यात आला.

नगरसेविका सौ.शुभदा जोशी यांनी हनुमान संकुलामध्ये असणाऱ्या व्यायामशाळेतील साहित्याबरोबरच पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या गळत्यांबाबत प्रश्न उपस्थित करून तातडीने साहित्य उपलब्ध करून दयावे व गळत्या रोखण्यासाठी इमारतीवर पत्रे टाकावेत असे सुचविले. पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व गटसे स्वच्छ करून घेण्याच्या सूचना या वेळी करण्यात आल्या. अग्नीशमन दलाच्या गाडीवर चालकासह दोन नवीन कर्मचारी नेमणे, नगरपंचायत कर्मचा-यांची पगारवाढ करणे, नव्याने नेमण्यात आलेल्या बांधकाम विभागाकडील कर्मचा-याचे तातडीने पगार काढणे, बाधकाम विभागाकडे आणखीन एका जादा अभियंत्याची नेमणुक करून घ्यावी याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

किरण कांबळे, यासिराबी लमतुरे, आनंदा कुमार आदीनी चर्चेत भाग घेतला. नगरसेविका शकुंतला सलामवाडे, रेश्मा सोनेखान, सिकंदर दरवाजकर, सीमा पोवार यांच्यासह नगरसेवक व अधिकारी बैठकीस उपस्थित होते. आभार संजय यादव यांनी मानले.

शहरामध्ये नवीन उद्यान तयार करण्यासाठी खासदार मंडलिक यांचे योगदान…

आजरा शहर विकासासाठी १.४० कोटी रुपये इतका निधी खासदार  श्री. संजयदादा यांच्या मार्फत मंजुर करण्यात आला आहे. त्या मध्ये

१. वीस सोलर हायमास्ट दिवे रु. ९० लक्ष
२. आपटे कॅलनी येथे बगीचा करणे रु. ५० लक्ष

हा निधी मंजुर केल्याबद्दल खा. संजयदादा मंडलिक  यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. त्याला सर्वांनी मंजुरी दिली . ‘ ‘लोकनेते स्व.सदाशिवराव मंडलिक प्रेरणा उद्यान” असे नाव नविन होत असलेल्या आपटे कॅलनीततील बगीच्याला द्यावे असा ठराव मांडण्यात आला व त्यास सर्वांनी अनुमती दिली ..

आज-याच्या मुख्याधिकारी पदी सूरज सूर्वे

आज-याच्या मुख्याधिकारी पदी जामोद(बुलढाणा), जळगावचे मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

BE झालेले सुर्वे हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून २०१७ पासून मुख्याधिकारी म्हणून काम पहात आहेत


नूतन तहसीलदार पदाचा पदभार समीर माने यांनी स्वीकारला

आजरा तालुक्याचे तहसीलदार विकास अहिर यांची नुकतीच माण (सातारा) येथे बदली झाली आहे. आजरा तालुक्याच्या नूतन तहसीलदार पदी समीर प्रेमवीर माने यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी नुकताच आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.

मावळते तहसीलदार विकास अहिर यांनी पुष्पगुच्छ देवून तहसीलदार माने यांचे स्वागत केले. तहसीलदार अहिर म्हणाले, आजरा तालुक्यात चार वर्ष समाधानाने काम करता आले. कामाचे वेगळा ठसा उमटवता आला. शंभर टक्के सातबारा संगणकीकरण यासहउधर टक्के विविध कामे करता आली. तहसिलदार माने यांनी सर्वांना बरोबर घेवून काम करणार असून महसूल विभागासह तालुक्यातील विविध कामे लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न राहील . या वेळी निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, महसूल विभागाचे विकास कोलते,नायब तहसीलदार डी. डी. कोळी, दिलीप जाधव , अनंत चोले, धनाजी चव्हाण व अधिकारी उपस्थित होते.

निधन वार्ता
तुळसाबाई देसाई

 

 

खोराटवाडी ता. आजरा येथील सौ. तुळसाबाई नारायण देसाई (वय ८४) यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, चार मुली, जावई, एक मुलगा, सून व नातवंडे असा परिवार असून प्रेस फोटोग्राफर श्रीकांत उर्फ बाळासाहेब देसाई यांच्या त्या मातोश्री होत.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

पतीच्या निधनापाठोपाठ पित्याचेही निधन…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!