mrityunjaymahanews
अन्य

आजर्‍यातून शाळकरी मुलाचे अपहरण ….

आजर्‍यातून शाळकरी मुलाचे अपहरण ….

महाजन गल्ली आजरा येथून कु.कुणाल सचिन जाधव या १५वर्षीय शाळकरी मुलाचे अज्ञातांकडून अपहरण झाले असल्याची फिर्याद सौ. सरिता सचिन जाधव यांनी आजरा पोलिसात दिली आहे .

शनिवार दिनांक १५ रोजी महाजन गल्ली येथे अज्ञात व्यक्तीने कशाची तरी फुस लावून सचिन याचे अपहरण केले असल्याचे सदर फिर्यादीत म्हटले आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान सदर मुलगा लिंगनूर  (गडहिंग्लज) येथे रविवारी रात्री आढळला असल्याची माहिती  सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हरूगडे यांनी दिली आहे.

व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्यंकटराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये संस्थेचे अध्यक्ष व माजी जि. प. उपाध्यक्ष  श्री. जयवंतराव शिंपी तसेच संचालक मंडळ यांचे शुभ हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. 

श्री. शिंपी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील खडतर प्रवास कथन करताना सांगितले की, समाजाकडून अनेक अपमानजनक वागणूक सहन करत विद्यार्थी दशेपासून आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करून ज्ञानग्रहण केले. मिळवलेले ज्ञान हे आपल्याकडे परीक्षेपुरतेच लक्षात न ठेवता ते कायमचे कसे लक्षात राहील याकडे लक्ष दिले आणि देशात व प्रदेशात जाऊन शिक्षणातील उच्चतम पदव्या संपादन केल्या. यासाठी स्कॉलरशिप व राजे महाराजे यांची कडून आर्थिक मदत घेतली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनीही मदत केली.
बॅरिस्टर पदवी प्राप्त झाल्यानंतर भारतातील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी निवड झाली असतानाही त्यांनी आपण मिळविलेल्या ज्ञानाचा आपल्या अस्पृश्य जातीतील समाजाच्या न्यायासाठी, उन्नतीसाठी, त्यांच्यामध्ये शिक्षणाची आवड निर्माण करून त्यांना संघटित करण्यामध्ये वेळ देण्याचे ठरविले.. समाजासाठी त्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र दिला.
स्वतंत्र भारताची राज्यघटना त्यांनी अहोरात्र कष्ट करत अभ्यासपूर्वक लिहिली. यामध्ये देशातील प्रत्येक नागरिकाचा विचार करून त्यांच्यामध्ये समता न्याय आणि बंधुता अखंडित राहावी असा विचार करून लेखन केले. भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा किताब देऊन सन्मानित केले अशा या महामानवाचा जयंतीनिमित्त अभिवादन केले.

या प्रसंगी आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा उपाध्यक्ष श्री. अण्णासाहेब पाटील, खजिनदार श्री. एस.डी चव्हाण , माजी प्राचार्य व संचालक श्री. सुनील देसाई, श्री. पांडुरंग जाधव, संचालक श्री. सचिन शिंपी, प्राचार्य आर. जी. कुंभार, पर्यवेक्षक सौ. व्ही. जे. शेलार, सौ. एस. डी. इलगे, प्रा. शिवाजी पारळे, श्री.एम. ए. पाटील, सुतार, कलाशिक्षक श्री. कृष्णा दावणे, श्री आर पी होरटे, श्री. पी. व्ही पाटील, श्रीमती ए. बी. पुंडपळ, श्रीमती आर. एन. पाटील, सौ आर.व्ही जावळे, शिक्षकेतर कर्मचारी.. श्री. अभिजीत देसाई, सौ. एन. आर. सुतार, श्री. सचिन कांबळे, श्री. जानबा कांबळे, श्री. जितेंद्र पाटील, श्री. दिलीप सरदेसाई, श्री. तुकाराम गुरव व ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

आजऱ्यात रविवारी शेतकरी मेळाव्याचे आयोजन अशोकअण्णा चराटी व जयवंतराव शिंपी यांची माहिती

mrityunjay mahanews

सुपडा साफ…

mrityunjay mahanews

उत्तूर येथे तरुणाची आत्महत्या ? प्रेत विहिरीत सापडले…….जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज व्हा : माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

mrityunjay mahanews

रामतिर्थ यात्रा होणारच…?

mrityunjay mahanews

अण्णाभाऊ समूहाचा शिवाजीराव पाटील यांना पाठिंबा जाहीर…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!