
९ लाखांच्या दरोडा प्रकरणी १० अटकेत…

आजरा तालुक्यातील ९ लाखांच्या रायवाडा दरोडा प्रकरणी पोलिसांनी आणखीन ९ जणांना अटक केली आहे. आतापर्यंत पोलिसांनी १० आरोपींना अटक केली आहे.आरोपींना १८ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे. या प्रकरणातील सहभागी इतर ४ जणांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.
रायवाडा दरोडा प्रकरणात चालक रवी लक्ष्मण नाईक याला ताब्यात घेतल्यावर कर्नाटकच्या/बेळगावच्या दिशेने तपास सुरू केला आणि यामध्ये यशही आले.पोलीसांनी काल ७१ डुकरे जप्त केली याशिवाय ९ संशयितांना ताब्यात घेतले. संशयीतांनी गुन्ह्याची कबूली दिली. त्यानुसार आजरा पोलीसांनी रात्री उशिरा त्यांना अटक केली. आज गडहिंग्लज न्यायालयात हजर केले असता सर्व संशयीत आरोपींना १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. यावेळी संबंधित आरोपींच्या नातेवाईकांनी आजरा पोलीस स्टेशन आवारात मोठी गर्दी केली होती.

अटक केलेल्या मध्ये अरुणकुमार हणमंत अनमसागर (वय ३६, रा. आश्रय कॉलनी, रुक्मिणीनगर, बेळगाव) , किशोर उर्फ दर्शन राजु धारवाड (वय २९ रा. रुक्मिणीनगर, बेळगाव), गणेश दुर्गाप्पा शिपरी(वय २९, रा. सागरनगर, कणबर्गी, बेळगाव) , रवि मोराप्पा कुचीकोरवी( वय ३७, रा. रुक्मिणीनगर, आश्रय कॉलनी, बेळगाव) , अशोक रामाप्पा भंगी(वय ३५, रा. रुक्मिणीनगर, आश्रय कॉलनी, बेळगाव) , हणमंता गाळाप्पा नाशिक (वय २८, रा. कृष्णा कॉलनी, आनंदनगर,हुबळी) , अक्षय सैदाप्पा पुजारी (वय १९, रा. रुक्मिणीनगर, बेळगाव) ,आशिष मोहन दोडमनी( वय २४ रा रुक्मिणीनगर,बेळगाव) ,सुरज किरण कडोलकर, (वय २२ रा रा रुक्मिणीनगर, बेळगाव) यांचा समावेश आहे.आणखीन चार आरोपींच्या शोधात पोलीस असल्याचे आजऱ्याचे स.पो.नि. सुनिल हारुगडे यांनी सांगितले.


