

आजरा तालुका वासीयांना ‘गणराया अवॉर्ड ‘ची प्रतीक्षा
कोरोना नंतर आजरा तालुक्यातील गणराया अवॉर्डचे परीक्षण बंद आहे. परीक्षण न झाल्याने अवॉर्ड वितरणही ठप्प झाले आहे. तालुक्यातील गणराया अवॉर्ड्स करीता परीक्षण व वितरण पूर्ववत करावे अशी मागणी तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांकडून केली जात आहे.
गणराया अवॉर्ड्स हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय असतो.या अवॉर्ड्स मुळे विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या पाठीवर शाबासकीची थाप निश्चितच पडत असते. याकरिता ही मंडळी दिवस रात्र राबून वर्षभर विविध उपक्रम राबवताना दिसतात. परंतु कोरोना नंतर या अवॉर्ड्स करिता परीक्षणच बंद झाले आहे. यामुळे गणेशोत्सव मंडळातून नाराजी व्यक्त होत आहे.
अवॉर्ड्स निकषlमध्ये कायदा व सुव्यवस्थेला प्राधान्य असल्याने मंडळांमध्ये आपोआपच शिस्त निर्माण होते. त्यामुळे पोलीस खात्यावरही गणेशोत्सव कालावधीत येणारा ताण कमी होण्यास मदत होते.
या सर्व पार्श्वभूमीवर गणराया अवॉर्ड्स करीता परीक्षण व वितरण पूर्ववत सुरू करण्याची मागणी गणेशोत्सव मंडळे करू लागली आहेत.
ह.भ.लक्ष्मणबुवा मोरजकर महाराजांच्या सप्ताहास प्रारंभ…

आजरा येथील ह.भ. प.पू. लक्ष्मणबुवा मोरजकर महाराजांच्या सप्ताहास उत्साहात सुरुवात झाली आहे.
शिवाजीनगर येथील विठ्ठल मंदिर येथे सदर सप्ताह सोहळा सुरू असून सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर नदीघाटावर असणाऱ्या समाधी स्थळापासून महाराज यांना आज सप्ताह सोहळ्यास आमंत्रित करण्यात आले.

विठ्ठल मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली असून येत्या आठवडाभरामध्ये भजन, कीर्तन, महाप्रसादासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे मुख्य ट्रस्टी सुभाष मोरजकर यांनी सांगितले.
आनंदराव नादवडेकर प्राथ.शिक्षक सह. पत संस्थेची वार्षिक सभा
खेळीमेळीत

आनंदराव नादवडेकर प्राथ.शिक्षक सह. पतसंस्थेची ३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली.कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन व प्रतिमा पुजन चेअरमन, व्हा, चेअरमन, संचालक, सुकाणू समिती यांच्या हस्ते करणेत आले. यानंतर संस्थेचे संस्थापक कै. आनंदराव नादवडेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करणेत आले.
श्रद्धांजलीचा ठराव संस्थेचे संचालक सदाशिव दिवेकर यांनी मांडला. प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन आनंदराव भादवणकर यांनी केले. संस्थेला ४५ लाख २९ हजार इतका नफा झालेला आहे.संस्थेने १५ टक्के लाभांश व सभा. भेट १३ टक्के म्हणून २२लाख ४१ हजार २६८ इतके वाटप करणेचे जाहीर केले. संस्थेचे भागभांडवल ८४ लाख ५३ हजार इतके आहे. संस्थेकडे ५० कोटी ठेवी असून ३७ लाख ६२ हजारांचे कर्ज वाटप केले आहे. १४ कोटी ४० लाख रुपये इतकी संस्थेची गुंतवणूक असून खेळते भांडवल ५४ कोटी ४७ लाख रुपये इतके आहे. संस्थेला ऑडीट वर्ग ‘ अ ‘ मिळालेला आहे.
यावेळी विविध क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी बजावलेल्या शिक्षक व शिक्षकांच्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला.
अहवाल वाचन संस्थेचे मॅनेजर तुकाराम प्रभू यानी केले. संस्थेच्या कारभाराबद्दल संचालक मंडळ व सेवक वर्ग यांचे सभेमध्ये अभिनंदन करणेत आले. सभेस विद्यमान संचालक मंडळ, मागील संचालक मंडळ, सुकाणू समितीचे सदस्य उपस्थित होते सुत्रसंचलन एकनाथ गिलबिले, सदाशिव दिवेकर यांनी केले. आभार उपाध्यक्ष मनोहर कांबळे यांनी मानले.

…गणेश दर्शन…
ओम गणेश तरुण मंडळ, खोराटवाडी,आजरा

अध्यक्ष :- गुरूप्रसाद खोराटे उपाध्यक्ष :- अक्षय निर्मळे सचिव :- विशाल खोराटे
श्री मसवेश्वर स्वरसंगम गणेशोत्सव मंडळ, भादवणवाडी

अध्यक्ष :-सुरेश मारुती सिमणे
उपाध्यक्ष :- सुनिल मारुती धनवडे
सचिव :- अंबाजी दशरथ काबळे
खजिनदार :- चेतन तुकाराम मोहिते
…………………..




