
आज-यात गौरी-गणपतींना भावपूर्ण वातावरणात निरोप….

आजरा शहर व परिसरामध्ये घरगुती गौरी गणपतीना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. पावसाची रिमझिम सुरू असतानाही वाद्यांच्या व बाप्पा मोरयाच्या गजरात भाविकांनी ठिकठिकाणी गणेश मुर्त्या विसर्जनासाठी गर्दी केली होती. यावेळी प्रचंड आतषबाजी करण्यात आली.

येथील मानाचा समजला जाणाऱ्या श्री रवळनाथ मंदिरातील गणेश मूर्तीचे दुपारी चार वाजता विसर्जन करण्यात आले. या मूर्तीची पालखीतून सवाद्य विसर्जन मिरवणूक करण्यात आली. त्यानंतर मात्र शहरवासीयांनी आपल्या घरगुती मुर्त्या विसर्जनासाठी बाहेर काढल्या.
शिवाजीनगर मधील तरुणांनी मुर्त्या विसर्जनासाठी खास तराफ्याची व्यवस्था केली होती.अनेक भाविकांनी या तराफ्याचा वापर करत मूर्ती विसर्जनास प्राधान्य दिले.

रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर घाट परिसर, वडाच्या गोंड येथे मुर्त्यांचे विसर्जन करण्यात येत होते.
गोंधळ बिगर शेतीचा..
आता प्रशासन काय करणार…?

बिगर शेती प्रकरणांमधील गैर व्यवहारांची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. तालुक्यात ज्यांनी अलीकडे बिगरशेती भूखंड खरेदीचे व्यवहार केले आहेत अशी मंडळी हा प्रकार पाहून अस्वस्थ झाली आहेत. या सर्व प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेणार ? याकडे आता तालुकावासियांचे लक्ष लागून आहे. अनेक जण माहितीचा अधिकार वापरून मूळ कागदपत्रे मिळवण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहेत.
बिगर शेती प्रकरणांमधील गैरव्यवहारांचे स्वरूप पाहता अनेक बिगर शेतीप्रकरणे अडचणीत येण्याची शक्यता आहे. सुक्याबरोबर ओलेही जळते या उक्तीप्रमाणे सरळ मार्गाने बिगरशेती झालेल्या भूखंडाबाबतीत आता शंका उपस्थित केल्या जात आहेत. बिगर शेती जागांचे गट नंबर, त्यामध्ये असणाऱ्या पारंपरिक वहीवाटीच्या जागा,सोडलेल्या रिकाम्या जागा, नगररचना विभागाचे दाखले, झोन दाखले, अतिक्रमणे,अधिकाऱ्यांच्या सह्या,शिक्के, प्लॉटिंग नकाशे या सर्वच बाबींचा विचार करण्याची आता गरज निर्माण झाली आहे.
यापूर्वी झालेली बिगर शेती प्रकरणे तपासून पहावीत अशी रास्त अपेक्षा तालुकावासीय व्यक्त करत आहेत. या प्रकरणांमध्ये बडी मंडळी,अधिकारी असल्याने राजकीय पातळीवर दबाव आणून या प्रकरणावर पडदा पाडण्याचा प्रयत्नही सुरू असल्याचे खात्रीलायकरीत्या समजते.
किमान यापुढे तरी बिगर शेती प्रकरणे होत असताना झाल्या चुका टाळल्या जातील अशी अपेक्षा करण्यास तूर्तास काहीच हरकत नाही.
गावठाण जमिनी सहकारी संस्थाना…?
महसूल विभागाच्या गावठाण मधील जमिनी काही सहकारी संस्थांना दिल्याचेही समजते. यामध्येही मोठे ‘अर्थ’पूर्ण व्यवहार झाले आहेत. याकरीता नेमके कोणते निकष लावले गेले ? असा नवा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.
… ज्योतीप्रसाद सावंत …
मुख्य संपादक
आजरा सूतगिरणीच्या वतीने निर्माल्य दान उपक्रम

आण्णा भाऊ आजरा सूत गिरणीचे वतीने निर्माल्य दान अभियान राबविण्यात आले.आजरा नगरपंचायत यांनी यामध्ये सहकार्य केले. आजरा व परिसरातील सामाजिक बांधिलकी जपनेचे हेतूने हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला.शिवाजी नगर येथील ह.भ.मोरजकर महाराज घाट, वडाचा गोंड, चित्री पूल, परोली पूल, तसेच सूत गिरणी परिसरातील ग्रामीण भागातील भाविकांचे सहकार्य व उत्साह या बळावर हे अभियान राबविण्यात आले.आण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकण्णा चराटी, सूत गिरणीच्या अध्यक्षा अन्नपूर्णा चराटी, व्हा. चेअरमन डॉ. अनिल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जनरल मॅनेजर अमोघ वाघ व स्टोअर परचेस ऑफिसर राजेंद्र धुमाळ यांनी नियोजन केले.गार्डन विभागाचे कर्मचारी यांनी यामध्ये मोठे योगदान दिले.

गणेश दर्शन…
समता ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सोहाळे

अध्यक्ष :- चंद्रकांत कोंडुसकर
उपाध्यक्ष ;- प्रकाश दोरूगडे
सचिव :- सचिन कळेकर
श्री भावेश्वरी गणेशोत्सव मंडळ, मडीलगे.
अध्यक्ष :- जोतिबा शामराव नेउंगरे उपाध्यक्ष :- गणेश शिवाजीराव देसाई सचिव :- पांडुरंग महादेव सुतार



