रविवार दि. २७ जुलै २०२५

संघटित प्रयत्नातून शहरातील व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा निर्धार
आजऱ्यात व्यापारी स्नेह मेळावा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरातील व्यापाऱ्यांना सद्यस्थितीत अनेक प्रश्न भेडसावत आहेत. संवेदनशील शहराचा शासनाचा ठपका आजही व्यापार करताना अडचणीचा ठरत आहे. विस्कटलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, ठीक ठिकाणी नव्याने सुरू झालेले आठवडा बाजार, सामाजिक वातावरण व्यवस्थित नसल्याचे बाहेर जाणारे चुकीचे संदेश व त्यामुळे बाहेरचे उद्योगधंदे शहरासह तालुक्यात येण्यावर येत असलेल्या मर्यादा याचा फटका शहरातील व्यापारी वर्गास बसत आहे. शहरातील व्यापाऱ्यांचे हे प्रश्न मार्गी लागायचे असतील तर संघर्षाशिवाय पर्याय नाही आणि संघर्ष करावयाचा असेल तर सर्व व्यापाऱ्यांनी एकसंघ राहणे गरजेचे आहे. यापुढे शहरातील सर्व व्यापारी आपल्या प्रश्नांबाबत संघटितपणे लढतील असा निर्धार आजरा येथे दुरदुंडेश्वर सांस्कृतिक कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शहरातील व्यापाऱ्यांच्या स्नेह मेळाव्यात करण्यात आला.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मेळाव्यास सुरुवात झाली. मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला.
यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिवाकर नलवडे, जनार्दन टोपले, दयानंद भोपळे, प्रभाकर कोरवी यांचीही भाषणे झाली.

यावेळी बसवराज महाळंक, श्रीकांत गजरे, दाऊद लमतुरे, सचिन शिंपी, दयानंद भुसारी, श्रीपाद कुलकर्णी, मनोज गुंजाटी ,नौशाद बुड्डेखान, रमेश कारेकर, मल्लिकार्जुन तेरणी, आण्णा फडके, संजय सावंत, प्रकाश टोपले,महेश नार्वेकर, गणपतराव डोंगरे, शिवाजी गुडूळकर, सुधीर देसाई, शरीफ खेडेकर,महंतेश गुंजाटी, प्रशांत बिल्ले, रवींद्र हुक्केरी, ओंकार माद्याळकर, अभिजीत रांगणेकर, राजू विभुते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
वाय.जी. इंजल यांनी आभार मानले.

टिक केले आणि मोबाईल हॅक झाले…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मोबाईल वरून ट्राफिक विभागाच्या चलनाच्या नावाखाली येणाऱ्या ॲपवर टिक केल्यानंतर थेट मोबाईल हॅक होण्याच्या तक्रारी आजरा परिसरात वाढलेल्या आहेत. अनेकांना या प्रकाराच्या अनुभव सध्या येत आहे. अचानकपणे मोबाईल वरून एखादा संदेश येतो. यामध्ये ट्रॅफिक चलन नावाचा संदेश आल्यानंतर हा संदेश एखाद्या माहितीचा असावा असा समजून मोबाईलधारक तो संदेश जाणून घेण्याच्या उद्देशाने संदेशावर टिक करतात. असे केल्याबरोबर मोबाईल वरील सर्व अकाउंट हॅक होताना दिसतात. हा अनुभव येणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे त्यामुळे असे कोणतेही अपरिचित एपीके ॲप वरील संदेश पाहण्यासाठी मोबाईल वर टिक करू नये असे मोबाईल तज्ञांकडून सुचवण्यात येत आहे.

नद्या पात्रा बाहेर…
साळगाव बंधारा पुन्हा पाण्याखाली
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा एक वेळ वाढला असून हिरण्यकेशी व चित्री नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे. तालुक्यातील सर्वच धरणे व पाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने व पावसाचा जोर वाढल्याने प्रकल्पातील पाणी थेट नद्यांमध्ये मिसळू लागले आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. तूर्तास साळगाव,ऐनापूर हे बंधारे पाण्याखाली गेले असले तरी इतर बंधारेही पावसाचा जोर कायम राहिल्यास पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.ऐन श्रावणामध्ये पावसाचा जोर वाढल्याने रामतीर्थ परिसरात पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे.

वीज पुरवठा खंडित…
जोरदार वाऱ्यासह पाऊस असल्याने ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या विद्युत तारांवर पडून वीज पुरवठा वारंवार खंडित होताना दिसत आहे.

उत्तूरमध्ये ई लर्निंगसह वॉटर एटीएमचे लोकार्पण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील केंद्रीय व कन्या शाळेत मुंबईस्थित एंजल लिंक फाउंडेशन आणि राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन, कागल यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या वॉटर एटीएम सेंटर व ई लर्निंग संचचा लोकार्पण सोहळा समरजितसिंह घाटगे, सरपंच किरण आमणगी यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी धनाजी उत्तूरकर, विठ्ठल उत्तूरकर, सूर्यकांत पाटील, प्रदीप लोकरे,प्रवीण लोकरे, संदेश रायकर, भास्कर भाईंगडे, योगेश भाईंगडे, संदीप गुरव, सचिन उत्तूरकर, संदीप खराडे, सचिन पवार, पूजा उत्त्तूरकर, कोमल गोरले, मेघाराणी भाईंगडे, प्रिया उत्तुरकर, चंद्रशेखर पाटील, आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापक अनिल बामणे यांनी स्वागत केले. संतोष गुरव गुरव यांनी आभार मानले.

उत्तूरच्या जलजीवन योजनेची पाहणी

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
केंद्रिय जलजीवन मिशन कमिटी दिल्ली यांनी जलजीवन योजनेची पाहणी केली. यावेळी दिनेश कुमार, अशोककुमार, अजीतकुमार, तिवले उपअभियंता ग्रामिण पाणीपुरवठा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे स्वप्नील जाधव , ठेकेदार व इतर अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक ग्रा.प.सदस्य महेश करंबळी यांनी केले, स्वागत सरपंच किरण आमणगी, उपसरपंच समीक्षा देसाई, ग्रा.पं.सदस्य भैरू कुंभार, संभाजी कुराडे, मिलिंद कोळेकर, अनिता घोडके व ग्रामपंचायत अधिकारी पी. के. पाटील यांनी केले. योजनेची पाहणी करून संबंधीत अधिकाऱ्यांनी सुचना केल्या. तसेच पाणीपुरवठा सुरळीत होणेसाठी काही गोष्टी करणे गरजेचे आहे असे सांगितले.
यावेळी अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्याही भेटी घेतल्या त्यांच्याकडूनही प्रतिक्रिया ऐकून घेतल्या. भेटीच्या निमित्ताने कामे चालू असलेली योजना अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण होणेस मदत होणार आहे. यावेळी ग्रामस्थ, शामराव मुळीक, सुरेखा आमणगी , ग्रा. पं. कर्मचारी हजर होते.

साईनाथ मल्टीस्टेट आजरा शाखेचा वर्धापनदिन उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
साईनाथ मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटीच्या आजरा शाखेचा पहिला वर्धापनदिन उत्साहात पार पडला. आजरा शहर आणि तालुक्यातील संस्थेचे ठेवीदार, हितचिंतकांनी वर्धापनदिनाच्या निमित्ताने संस्थेत भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे अध्यक्ष उत्तम जाधव, संचालक कुलदीप पाटील, बिझनेस डेव्हल्पमेंट हेड अभिजित संभाजी, सिनिअर मॅनेजर श्रीकांत हातकर यांनी शुभेच्छा स्विकारल्या.संस्थेच्या विविध ठेव व कर्ज योजना तसेच संस्थेमार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवांची माहिती वरिष्ठ व्यवस्थापक हातकर हातकर यांनी दिली.
माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, उद्योजक सचिन शिंपी, राजू होलम, रामचंद्र मुरूकटे, गणपतराव पाटील, सतीश कोगेकर, शिवाजी गिलबिले, जनार्दन बामणे,परशुराम गिलबिले आदी उपस्थित होते.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील पार्वती शंकर विद्यालय, वसंतराव पाटील विद्यालय, केंद्रीय शाळा, उत्तूर विद्यालयातील १८ गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्तूर ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच किरण आमणगी होते.
ग्रामविकास अधिकारी पी.के.पाटील यांनी स्वागत केले. शिक्षक वैशाली पाटील, संभाजी तिबीले यांची भाषणे झाली. यावेळी उपसरपंच समिक्षा देसाई,संभाजी कुराडे, मिलिंद कोळेकर,राजू खोराटे,भैरु कुंभार, संदेश रायकर, सविता सावंत, सरिता कुरुणकर,सुवर्णा नाईक ,अनिता घोडके उपस्थित होते.महेश करंबळी यांनी सुत्रसंचालन केले.संजय उत्तूरकर यांनी आभार मानले.

फोटो क्लिक




