पोळगाव येथील महाविद्यालयीन तरूणीच्या मृत्यूस जबाबदार…
महागावमधील तरुणाच्या विरोधात गुन्हा नोंद…
मंगळवार (दि.26)रोजी सायंकाळी आजरा तालुक्यातील पोळगाव येथील सविता नारायण खामकर या महाविद्यालयीन तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर या याप्रकरणी मुलीचे वडील नारायण विष्णु खामकर यांनी आज मुलीच्या मृत्यूस महागाव तालुका गडहिंग्लज येथील किशोर दत्तात्रय सुरंगे हा तरूण जबाबदार असल्याची फिर्याद दिल्यावरून किशोर सुरंगे याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
मंगळवारी सायंकाळी सविता हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणाची उलटसुलट चर्चा पोळगाव परिसरात सुरू होती. सविता व किशोर यांचे प्रेमसंबंध होते. किशोरच्या आई – वडिलांनी सविता हिच्या वडिलांकडे लग्नाकरिता घर बघण्यास बोलवून घेतले. त्यावेळी खामकर यांनी त्यांना मुलीचे अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर मग बघू असे अश्वस्त केले होते.त्यानंतर किशोर याने सविता हिला डीपीला फोटो लावला नाही तर मी तुझ्याशी लग्न करणार नाही असे म्हणून त्रास देण्यास सुरूवात केली होती. आजरा येथील बसस्थानकावर तिला मारहाणही केली होती. या त्रासास कंटाळून सविता हिने राहत्या घरी स्वयंपाक घरातील तुळीला ओढणीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली, अशी फिर्याद नारायण विष्णु खामकर यांनी आजरा पोलीसात दिल्याने पोलिसांनी किशोर दत्तात्रय सुरंगे रा. महागाव, ता. गडहिंग्लज याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.









