mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

सोमवार दि. १६ मार्च २०२६

सीडी रेशो विस्कटले…?
आर्थिक संस्थांची ठेवीसाठी पळापळ…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

गेल्या आर्थिक वर्षामध्ये अनेक आर्थिक संस्थांच्या ठेवीमध्ये समाधानकारक वाढ झालेली नाही. केवळ व्याज भरून कर्ज प्रकरणे नव्याने उचल दाखवण्यावर भर असल्याने कर्जाचे आकडे एकीकडे फुगले असताना दुसरीकडे ठेवींमध्ये अपेक्षित वाढ नसल्याने याचा थेट परिणाम ताळेबंद व सीडी देशावर होऊन लेखापरीक्षण वर्गाला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाल्याने अनेक संस्थांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला ठेवींची कमतरता भरून काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालवले आहेत. एकाच वेळी बहुतांशी आर्थिक संस्थांनी ठेवी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याने यात कितपत यश येणार हा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे.

अमेरिका – इराण युद्धामुळे भाव वाढीचे संकट समोर उभे राहिले आहे. भविष्यात अडचण नको म्हणून अनेकांनी रोख शिल्लक मोठ्या प्रमाणावर जवळ बाळगण्यास सुरुवात केली आहे. ऐन मार्चमध्ये अनेक उद्योग ठप्प होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने वाटप केलेले कर्ज वसूल कसे करायचे ? हा प्रश्नही संस्थांच्या कारभाऱ्यांना पडला आहे.

कर्जाचे आकडे कमी करणे व ठेवींचे आकडे वाढवणे यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. एकंदर युद्धाचा फटका आता बँकिंग  क्षेत्रालाही बसणार असे दिसू लागले आहे. ठेवीदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक संस्थांनी मार्चच्या पार्श्वभूमीवर ठेव व्याजदरात वाढ केली आहे.

धर्मवीर ज्वाला आजऱ्यात…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

वडू बुद्रुक वरून सांगलीला आलेली धर्मवीर ज्वाला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, आजरा,भगवा चौक गांधीनगर विठ्ठल मंदिर या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे.

ज्यांना धर्मवीर ज्वाला घेऊन जायचे असेल त्यांनी आपापल्या गावांमध्ये नेण्यासाठी तेथे यावे असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे आजरा तालुकाप्रमुख श्री संदीप पारळे यांनी केले आहे.

उचंगी येथे साकव बांधकामाचा शुभारंभ


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

जिल्हा नियोजन मधून मंजूर असलेल्या उचंगी,ता.आजरा येथील दलित वस्ती साकव बांधकामाचा ₹ ६० लाख शुभारंभ भाजप जिल्हा उपाध्यक्ष जयवंत मसणू सुतार यांचे हस्ते करणेत आले.

या कामाकरिता सह पालकमंत्री ना.माधुरीताई मिसाळ, आमदार शिवाजीराव पाटील, खासदार धनंजय महाडिक आणी तालुक्याचे नेते अशोकअण्णा चराटी यांचे सहकार्य लाभले.

याप्रसंगी सरपंच समीर देसाई, उपसरपंच संगीता कांबळे, जयश्री कळेकर,माजी सरपंच शामराव हरेर, दशरथ जोशीलकर, बळवंत शिंत्रे सर, माजी सरपंच नारायण सुतार, अमृत सुतार, भिमगोंड पाटील, हर्षवर्धन महागावकर, अमोल सुतार,राजेश देसाई, उत्तमराव देसाई, रवळनाथ देसाई, श्रीधर देसाई, अजिंक्य तारळेकर, संदेश कळेकर, पांडुरंग देसाई, संजय कांबळे,आकाश कळेकर,आदी उपस्थित होते.

आजरा येथील गोठण गल्ली मुख्य रस्ता कामाचा शुभारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या मार्फत मंजूर करण्यात आलेल्या मुख्य रस्ता कामाचा शुभारंभ गोठण गल्ली येथे संपन्न झाला.

यावेळी नगरपंचायत गटनेते अभिषेक शिंपी यांनी प्रभागाच्या वतीने ना. अबिटकर यांचे आभार मानले. तसेच ठेकेदार रोहित भादवणकर यांना कामाच्या दर्जा बाबत सूचना केली आणि संपूर्ण गटार टू गटर चांगला रस्ता करण्याबाबत सूचना दिल्या.

सदर कार्यक्रमास नगरसेवक किरण कांबळे, नगरसेवक विक्रम पटेकर, के.जी. पटेकर, बंडोपंत चव्हाण, बशीर दरवाजकर, विजय मोहिते, सुधीर नार्वेकर यांच्यासह मान्यवर उपस्थितीत होते.

निधन वार्ता
सखाराम हसबे

चांदेवाडी येथील मुंबई स्थित सखाराम अबू हसबे यांचे आकस्मिक निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.


श्रृंगारवाडीत आज हाफ पिच क्रिकेट स्पर्धा


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

युवा स्पोर्ट्स श्रृंगारवाडी यांच्या वतीने आज दिनांक १६ मार्च व उद्या १७ मार्च २०२६ रोजी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धांकरीता चारशे रुपये इतकी प्रवेश फी असून प्रथम चार क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे चार हजार, तीन हजार,दोन हजार व एक हजार रुपये रोख व शिल्ड देण्यात येणार आहे अशी माहिती संयोजकांनी दिली आहे.

आजचे पंचांग

वार : सोमवार
दिनांक : १६ मार्च २०२६
माह (अमावस्यांत) : फाल्गुन
माह (पूर्णिमांत) : चैत्र
ऋतु : वसंत
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : द्वादशी तिथी (सकाळी ०९.४० पर्यंत) त्यानंतर त्रयोदशी तिथी
नक्षत्र : धनिष्ठा नक्षत्र (१७ मार्च सकाळी ०६.३०पर्यंत) त्यानंतर शततारका नक्षत्र
योग : शिवा योग (सकाळी ०९.३६ पर्यंत) त्यानंतर सिद्ध योग
करण : बलवा करण (सकाळी ०९.१६ पर्यंत) त्यानंतर कौलव करण
चंद्र राशी : मकर राशी (सायंकाळी ०६.
१३
पर्यंत) त्यानंतर कुंभ राशी
सूर्य राशी : मीन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०८.१७ ते सकाळी ०९.४७ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.२३ ते दुपारी ०१.११
सूर्योदय : सकाळी ०६.४७
सूर्यास्त : सायंकाळी ०६.४७
संवत्सर : विश्वावसु
संवत्सर(उत्तर) : सिद्धार्थी
विक्रम संवत: २०८२ विक्रम संवत
शक संवत: १९४७ शक संवत

 

संबंधित पोस्ट

वाघाच्या हल्यात बैल ठार

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

घाटकरवाडी येथे गव्याच्या हल्ल्यात महिला जखमी

mrityunjay mahanews

Breaking News

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!