mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

मंगळवार दि. १७ मार्च २०२६

नगरपंचायतीचे आज मासिक सभा..
गाळे भाडे वाढीवर होणार शिक्का मोर्तब

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा नगरपंचायतीची मासिक सभा आज मंगळवारी होत असून नगरपंचायत मालकीच्या सुमारे दीडशे दुकान गाळ्यांचा नगरपंचायतीच्या उत्पन्न वाढीसाठी भाडेवाढ करण्याचा मुख्य विषय सभेसमोर असून भाडेवाडीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

नगरपंचायत मालकीचे सुमारे दीडशे अधिकृत दुकान गाळे आहेत. यामध्ये कार्यालयीन इमारतींमध्ये ३० गाळे, हनुमान संकुलामध्ये १८ गाळे, विद्याधन कॉम्प्लेक्स मध्ये ४५ गाळे, वाडा गल्ली मशिदी समोर आठ गाळे, तर भाजी मंडईमध्ये ४१ गाळे आहेत.

मासिक प्रति चौरस मीटर तीन रुपयांपासून ते २१ रुपयांपर्यंत सदर दुकान गाळ्यांचे भाडे आहे. सदर भाडे हे बाजारपेठेतील इतर जागांच्या तुलनेने कमी असून यामुळे नगरपंचायतीच्या उत्पन्नास फटका बसत असल्याचे नगरसेवक परेश पोतदार यांनी मागील सभेत निदर्शनास आणून देऊन भाडेवाडीबाबत सभागृहात चर्चा घडवून आणली होती. आजच्या सभेमध्ये भाडेवाडीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

अनधिकृत खोक्यांचे काय…?

एकीकडे अधिकृत दुकान गाळ्यांचे भाडे वाढवले जात असताना दुसरीकडे अनधिकृत रित्या उभारण्यात आलेले ठिकठिकाणचे खोके व मूळ भाडेकरूंनी भरमसाठ भाडे घेऊन नगरपंचायत गाळ्यात पोट भाडेकरू ठेवले आहेत त्यांचे काय ? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे.

गॅस पुरवठा सुरळीत करा अन्यथा मोर्चाला सामोरे जा…
शिवसेना उ.बा.ठा.चा इशारा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

अमेरिका व इराण चा देशामध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे देशात गॅसची टंचाई आहे. त्यामुळे आजरा तालुक्यामध्ये सध्या घरगुती गॅस धारकांच्या रांगा गॅस एजन्सीच्या दारात लागलेल्या आहेत. यामुळे सर्व सामान्य माणसांची उपासमार होऊन हाल होत आहेत. तर दुसरीकडे व्यावसायिकांनाही सिलेंडर  मिळत नसल्याने आजरा शहरासह अन्य तालुक्यामध्ये हॉटेल व्यवसाय व अन्य बेकरी व्यवसाय बंद असल्याने त्याचा परिणाम नागरिकांच्या खाद्यपदार्थ मिळणेवर होत आहे. त्यामु‌ळे शहरात कामानिमित येणाऱ्या विद्यार्थी व नागरीकांची उपासमार होत आहे. गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेना उबाठाच्या वतीने देण्यात आला आहे.

एकीकडे शासन गॅसचा तुटवडा नाही अशी घोषणा करत असताना दुसरीकडे गॅससाठी लागलेल्या रांगा पाहता सर्व सामान्य नागरिक व व्यावसायिक यांचे हाल होत आहेत. तरी आजरा तालुक्यातील नागरिकांना वेळेत गॅसपुरवठा करून द्यावा अन्यथा शासनाच्या विरोधात मोर्चा काढण्यात येईल असे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

निवेदन देताना शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुकाप्रमुख युवराज पोवार, तालुकाप्रमुख संजय येसादे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, सुरेश पाटील, महादेव गुरव, अमित गुरव यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

शहरातील अनधिकृत बांधकाम प्रकरणी सामाजिक सेवा प्रतिष्ठान आक्रमक…
माहिती घेण्यास सुरुवात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा नगरपंचायत हद्दीत गेल्या काही वर्षांत झालेल्या बांधकाम परवानग्या न घेता झालेली अनधिकृत बांधकामे व त्यावर झालेली कारवाई याबाबत पारदर्शकता नसल्याची चर्चा शहरात सुरू असताना सामाजिक सेवा प्रतिष्ठान आजरा प्रणीत अन्याय निवारण समिती, आजरा यांनी माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत नगरपंचायत प्रशासनाकडे सविस्तर माहितीची मागणी केली आहे.

या अर्जामध्ये नगरपंचायत स्थापनेपासून आजपर्यंत शहरातील सर्व इमारती, घरे व कॉम्प्लेक्स यांना देण्यात आलेल्या बांधकाम परवान्यांची संपूर्ण यादी, मंजूर नकाशे, तपासणी अहवाल तसेच Completion Certificate व Occupancy Certificate यांची माहिती मागविण्यात आली आहे.
तसेच नगरपंचायत हद्दीत उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांची यादी, त्यावर नगरपंचायतीने केलेली कारवाई, दिलेल्या नोटिसा, आकारलेले दंड किंवा पाडकामाची कारवाई याबाबतची कागदपत्रेही मागविण्यात आली आहेत.

विशेष म्हणजे अनधिकृत बांधकामांना पाणी व वीज कनेक्शन कोणत्या नियमांनुसार देण्यात आले, तसेच नगरपंचायतीने घेतलेले आक्षेप आणि त्यांची पूर्तता याबाबतची माहितीही अर्जात मागविण्यात आली आहे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत अनेक बाबी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या कलम ७(१) नुसार मागितलेली माहिती ३० दिवसांच्या आत उपलब्ध करून द्यावी, अन्यथा अधिनियमाच्या कलम १९(१) अंतर्गत प्रथम अपील करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही अर्जात देण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणामुळे आजरा नगरपंचायतीतील बांधकाम व्यवहारांवर मोठ्या प्रमाणात पडदा उघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या अर्जावर नगरसेवक श्री. परशुराम बामणे (भाऊजी) यांच्यासह पांडुरंग सावरतकर, जोतीबा आजगेकर, बंडोपंत चव्हाण, दिनकर जाधव, रविंद्र नेवरेकर, संजय जोशी, संतोष बांदिवडेकर व जावेद पठाण यांच्या सह्या आहेत.


जिजामाता कॉलनी येथे रस्ता कामाचा शुभारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

पालकमंत्री ना. प्रकाश आबीटकर यांचे फंडा मधून जिजामाता कॉलनी येथे खडीकरण, डांबरीकरण कामाचा शुभारंभ उपनगराध्यक्षा सौ. पुजा डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आला.

रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे दर्जामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड होऊ नये अशी सूचना यावेळी उपनगराध्यक्षा सौ. डोंगरे यांनी केली.

यावेळी नगरसेविका अश्विनी चव्हाण शिवाजी गुडुळकर, सि.डी.सरदेसाई, रमेश डोणकर,गोपाळ जाधव, पांडुरंग हरेल, गणपतराव डोंगरे, दिलीप डोंगरे, सचिन टोपले, संतोष भाटले, विजय थोरवत, प्रकाश हरमलकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आजचे पंचांग

वार : मंगळवार
दिनांक : १७ मार्च २०२६
माह (अमावस्यांत) : फाल्गुन
माह (पूर्णिमांत) : चैत्र
ऋतु : वसंत
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : त्रयोदशी तिथी (सकाळी ०९.२३ पर्यंत) त्यानंतर चतुर्दशी तिथी
नक्षत्र : शततारका नक्षत्र (१८ मार्च सकाळी ०६.०८ पर्यंत) त्यानंतर पूर्वाभाद्रपदा नक्षत्र
योग : सिद्ध योग (सकाळी ०८.१४ पर्यंत) त्यानंतर साध्य योग
करण : वाणीजा करण (सकाळी ०९.२३ पर्यंत) त्यानंतर विस्ती भद्रा करण
चंद्र राशी : कुंभ राशी
सूर्य राशी : मीन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०३.४७ ते सायंकाळी ०५.१७ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.२३ ते दुपारी १.११
सूर्योदय : सकाळी ०६.४६
सूर्यास्त : सायंकाळी ०६.४७
संवत्सर : विश्वावसु
संवत्सर(उत्तर) : सिद्धार्थी
विक्रम संवत: २०८२ विक्रम संवत
शक संवत: १९४७ शक संवत

आजऱ्यात आज बैठक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

हिंदु नवं वर्षाच्या (गुढीपाडव्याच्या) निमित्ताने आजरा शहरात विराट हिंदु संमेलन भरवण्यात येणार असून यासाठी आज मंगळवारी सायंकाळी ८ वाजता श्रीराम मंदिर,आजरा येथे बैठक आयोजीत करण्यात आली आहे.

संप्रदायाचे,मंडळांचे, समस्त राष्ट्रभक्त नागरिक व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन सकल हिंदू समाज,आजराच्या वतीने करण्यात आले आहे.

बांदेश्वर नाट्य मंडळाचा आज नाट्य प्रयोग

आजरा येथील बांदेश्वर नाट्य मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे आज मंगळवार दिनांक १७ मार्च २०२६ रोजी रात्री ९.३० वाजता सुभाष चौक, आजरा येथे अनिल कांबळे लिखित ‘ह्योच नवरा पाहिजे’ या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

फोटो क्लिक…

कनफ्युजन ही कन्फ्युजन…

कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे…?
स्थळ – आजरा – गडहिंग्लज महामार्ग

 

संबंधित पोस्ट

आजरा अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी रमेश कुरुणकर

mrityunjay mahanews

तीन विद्यमान नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर…?

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

अल्पवयीन मुलीला दमदाटी व विनयभंग केल्याप्रकरणी चव्हाणवाडी येथील तिघा विरोधात गुन्हा नोंद…एकाचवेळी दोन हत्ती वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावर…सुलगाव व वेळवट्टी येथील प्रकार

mrityunjay mahanews
error: Content is protected !!