अल्पवयीन मुलीला दमदाटी व विनयभंग केल्याप्रकरणी चव्हाणवाडी येथील तिघा विरोधात गुन्हा नोंद…
चव्हाणवाडी (ता. आजरा )येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिचा विनयभंग करण्याबरोबरच तिच्या आईला फोनवरून धमकावणे, संबंधित मुलीकडे लग्नाचा तगादा लावणेअसे प्रकार अवलंबल्याबद्दल चव्हाणवाडी येथील स्वप्निल सदाशिव शिंत्रे,संदीप सदाशिव शिंत्रे व मंगल दत्तू गोरे यांच्या विरोधात पिडीत मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिल्याने पोलिसांनी या तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संबंधित मुलीच्या पाठीमागे जाऊन वारंवार तिला कोणाशी बोलतेस? कोठे कोठे जातेस? असे बोलून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य स्वप्नील याने केले. तर संदीप शिंत्रे व मंगल गोरे यांनी तिला वाटेत अडवून स्वप्निल शिंत्रे याच्याशी लग्नाची गळ घालून तिला व कुटुंबियांना शिवीगाळ करुन त्रास दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत.
………..

एकाच वेळी दहा किलोमीटरच्या अंतरावर दोन हत्ती रस्त्यावर
सुलगाव व वेळवट्टी येथील प्रकार

आज सायंकाळी एकाच वेळी सुलगाव व वेळवट्टी येथे दोन हत्तीनी रस्त्यावरील वाहनचालकांना दोन वेगवेगळ्या ठिकाणी दर्शन दिले. गुरुवारी संध्याकाळी वेळवट्टी येथील डॉ. धनाजी गोविंद राणे यांच्या हुंबराचे पाणी या फार्म हाऊस मधील बंगल्याला लागूनच असलेल्या फणसाच्या झाडाचे फणस हत्तीने खाल्ले असून, फणसाच्या फांद्या ही मोडल्या आहेत. तसेच मेसकाठ्यापण मोडल्या आहेत त्या नंतर तो हत्ती आजरा आंबोली रोड ओलांडून देवर्डेच्या दिशेने गेला. यावेळी हत्तीला पहायला बघ्यांनी गर्दी केली होती.

याच वेळी सुलगाव नजिकच्या रस्त्यावर म्हसोबा देवस्थान परिसरात दुसऱ्या हत्तीने दर्शन दिले.
काल रात्री तानाजी विठोबा राणे यांच्या फणसाच्या फांद्या मोडून फणस पण हत्तीने खाल्ले आहेत सलग तीन दिवस सुलगाव व वेळवट्टी परीसर येथे हत्ती संध्याकाळी येत आहे.
सुळे येथील महात्मा फुले सेवा संस्थेत अनिल फडके यांच्या गटाची बाजी
सुळे (ता. आजरा) येथील महात्मा फुले विकास सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अनिल फडके यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने १२ पैकी ७ जागांवर विजय मिळवत बहुमत प्राप्त केले आहे.
या आघाडीमधील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : फडके अनिल भिमराव फडके तुकाराम दत्तू, वालवे विष्णू सुभाना, रेडेकर धोंडीबा मारुती, कोकीतकर सुधाताई गंगाराम, सुतार महेश उत्तम, कांबळे भाऊसो केरबा तर विरोधी आघाडीचे सचिन शिवाजी केसरकर, राजाराम भैरू जाधव, शांताराम बाबु कटाळे, सतीश तुकाराम पेडणेकर,भारता बाबुराव फडके हे उमेदवार विजयी झाले.






