घराची भिंत कोसळून कीणे येथे महिला ठार

किणे (ता. आजरा) येथे पावसामुळे राहत्या घराची भिंत कोसळून त्यामध्ये सौ.सुनीता अर्जुन गुडूळकर (वय ४५) ही महिला दबली जाऊन जखमी झाली होती. तिला उपचाराकरता नेसरी येथे हलवत असताना वाटेतच मृत्यू झाला. या दुर्घटनेत सौ.सुनीता यांचे पती अर्जुन गुडूळकर व वत्सला परसु गुडुळकर व हे दोघे जखमी झाले आहेत. सदर घटना गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी…
गुडूळकर कुटुंबीय हे येथील प्राथमिक शाळेसमोरील घरामध्ये राहतात. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सौ. सुनीता या गोठ्यामध्ये गेल्या असताना अचानकपणे मातीची भिंत कोसळली. सदर भिंत चिऱ्याच्या भिंतीवर कोसळून चिऱ्याची भिंत देखील कोसळली. चिऱ्याखाली सौ.सुनीता या दबल्या गेल्या व गंभीर जखमी झाल्या. उपचाराकरीता त्यांना नेसरी येथे हलवत असताना त्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत पती अर्जुन गुडूळकर व सौ .वत्सला परसु गुडुळकर हे देखील जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर किणे पंचक्रोशीतील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. तहसीलदार समीर माने, निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांच्यासह अधिकाऱ्यांनी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली.

आजऱ्याच्या ‘स्वामी विवेकानंद पतसंस्थे’ कडून सुवर्ण बोनस शेअर्स वाटप….

(सुवर्ण महोत्सवी वर्षा निमीत्य 56 लाख रुपयांचे वाटप.
15,557 सभासदांना मिळाला लाभ.)
आजरा….
आजरा येथील स्वामी विवेकानंद नागरी पतसंस्थेने सन 2022-23 वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले. यानिमित्ताने संस्थेने सभासदांना सुवर्ण बोनस शेअर्स वाटप करण्यात आली. सुमारे 55 लाख 82 हजार रुपयांच्या शेअर्सचा 15 हजार 557 सभासदांना लाभ मिळाला. हा समारंभ संस्थेच्या आजरा मुख्यकार्यालयामध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे माजी चेअरमन आणि जेष्ठ मार्गदर्शक मलिककुमार बुरुड होते. विद्यमान चेअरमन जनार्दन टोपले, व्हा. चेअरमन दयानंद भुसारी व सर्व संचालक प्रमुख उपस्थित होते.
संस्थेने या वर्षात खासदार धनंजय महाडीक व आमदार प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत सुवर्ण महोत्सव शुभारंभ व बोधचिन्ह अनावरण, मासिक जडण घडणचे संपादक डॉ. सागर देशपांडे यांचे करिअरविषयक व्याख्यान, उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते व माजी आमदार सुरेश हाळवणकर, हिंदुराव शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत लक्ष्मीदेवी उद्यान लोकार्पण, तर आजरेकर कलाकारांचा ‘आपली माणसं आपली गाणी’ या कार्यक्रमांचे आयोजन केले. आता त्याचाच एक भाग म्हणून रुपये 1000, 500 व 300प्रमाणे बोनस शेअर्सचे वितरण करण्यात आले.
कर्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक चेअरमन श्री. टोपले यांनी केले. संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला. श्री. बुरुड यांच्या हस्ते सभासदांना बोनस शेअर्सचे वितरण करण्यात आले. संस्थेचे जेष्ठ सदस्य विजयकुमार बांदेकर, बंडोपंत चव्हाण व शिवाजीराव येसणे यांनी मनोगत व्यक्त केली.
यावेळी बंडु जाधव, सखाराम सावंत, शंकर हाळवणकर, अच्युत पाटील, तुकाराम पोवार, ज्ञानदेव ढोकरे, तुकाराम तेजम, तुकाराम गुरव, यशवंत इंजल, जॉनी लोबो यांच्यासह संचालक नारायण सावंत, रविंद्र दामले, महेश नार्वेकर, सुधिर कुंभार, रणजीत पाटील, गुरुप्रसाद टोपले, विश्वजीत मुंज, राजेंद्र चंदनवाले, मुकुंद कांबळे, सुनिता कुंभार, नेहा पाटील जनरल मॅनेजर अर्जुन कुंभार आदी उपस्थीत होते. व्हाइस चेअरमन श्री. भुसारी यांनी आभार मानले.





