mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

आरोग्य विभाग सतर्क…

दाभिल बंधारा कोंबडी प्रकरण..‌.


    ‌‌                आजरा:प्रतिनिधी

       आजरा तालुक्यातील दाभिल बंधाऱ्यात पोत्यात भरून मृत कोंबड्या टाकल्या जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याबद्दलचे वृत्त काल मृत्युंजय महान्यूज ने प्रसिद्ध केले होते. तालुका आरोग्य विभागासह संबंधित प्रशासकीय विभागांनी आज तातडीने या ठिकाणी भेट देऊन संबंधितावर कारवाईच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

       पोल्ट्री व्यावसायिक व कोंबड्या वाहतूक करणाऱ्यांकडून असे संतापजनक प्रकार ठीक- ठिकाणी घडत आहेत. नदी, ओढ्यांमध्ये, रस्त्याशेजारी मृत्यू कोंबड्या टाकल्या जातात. असे प्रकार तालुक्यामध्ये सर्वत्र दिसत असून यामुळे ठिकठिकाणीच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. भटक्या कुत्र्यांचाही प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य नद्यांच्या पाण्यावर अनेक गावच्या पाणीपुरवठा योजना असल्याने हे पाणी दूषित होताना दिसते.

       काल बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर दाभिल आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी कडील वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य विभागाचे अधिकारी, दाभील व देव कांडगाव येथील ग्रामपंचायत कर्मचारी आदींनी प्रत्यक्ष भेट देऊन ही प्रकार थांबवणे विषयी पोल्ट्री चालकांना सूचना केल्या.त्यातूनही प्रकार चालू राहिल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्याचा पवित्राही घेतला आहे.


विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या विरोधात निदर्शने


                    आजरा: प्रतिनिधी

        आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लोकशाहीचा गळा घोटणारा घटनाबाह्य निर्णय दिला असल्याचा आरोप करत शिवसेना (उबाठा ) घ्या वतीने वतीने छत्रपती संभाजी चौक येथे निषेध करण्यात आला.

        यावेळी जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, युवराज पोवार समीर चांद, कृष्णा पाटील आदींनी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्यावर जोरदार टीकाकेली.

         उपजिल्हासंघटक संभाजी पाटील,तालुका प्रमुख राजू सावंत, उपतालुकाप्रमुख संजय येसादे,शिवाजी आढाव, दिनेश कांबळे, महेश पाटील, राजकुमार भोगण,सुयश पाटील, सुशील लतीफ ओंकार माद्याळकर,संजूभाई सावंत, जाहीर बुड्डेखान, अमानुल्ला आगलावे, वसंत भुईंबर, भिकाजी विभूते, आदी शिवसैनिक उपस्थित होते.


सुशिक्षित बेरोजगारांसाठी आज आज-यात मेळावा


                     आजरा: प्रतिनिधी

        केंद्र शासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या शासकीय योजनांची माहिती व लाभ आजरा सुशिक्षित बेरोजगार व नव उद्योजक यांना रोजगार व कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार, नवउद्योजक यांना व्हावा याकरिता आज दिनांक १२ रोजी सकाळी अकरा वाजता प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय,आजरा येथे तालुकास्तरीय कर्ज माहिती व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

        सदर रोजगार मेळाव्यामध्ये नव उद्योजक व सुशिक्षित बेरोजगारांना यांना रोजगार व कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या जिल्हा समन्व्यक सर्व बँका, जिल्हा उद्योग केंद्र कोल्हापूर, कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य वित्त आणि विकास महामंडळ, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मकार व चर्मोद्योग महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळ, मत्स्य व्यवसाय कार्यालय तांत्रिक, दुग्ध विकास विभाग, जि. प. कोल्हापूर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ,छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था महिला आर्थिक विकास महामंडळ, तालुका स्तरीय सर्व बँक प्रतिनिधी, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कोल्हापूर, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, कोल्हापूर, जिल्हा रेशीम उद्योग विभाग कोल्हापूर, समाज कल्याण विभाग कोल्हापूर, संचालक,कोल्हापूर इ. विभागाचे स्टॉल लावण्याचे नियोजन सदर मेळाव्यात करण्यात आलेले आहे.


...तोपर्यंत संप मागे घेणार नाही

अंगणवाडी सेविकांची निर्धार सभा


                ‌      आ‌‌जरा:प्रतिनिधी

         ४ डिसेंबर पासून अंगणवाडी सेविका मदतनीस, मिनी आंगणवाडी यांचा महाराष्ट्र व्यापी संप सुरु आहे आज ३६ दिवस झाले तरी शासनाने कोणत निर्णय दिला नाही कोल्हापूर, नागपूर, कागल, गारगोटी, मुंबई, या सर्व ठिकाणी मोर्चे झाले तरी निर्णय नाही. शासनाच्या कोणत्याही दबावला बळी न पडता संप सुरु राहणार असे आजरा येथे झालेल्या निर्धार बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

      जोपर्यंत वेतनवाढ व पेन्शनचा आदेश निघत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

      यावेळी तालुका प्रतिनिधी छाया तीप्पट,माया देसाई,शशिकला रेडेकर,वैशाली कांबळे,सरिता पाटील यांच्यासह अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.


छायावृत्त

गोवा येथे विकलांग व अपंग यांच्याकरता आयोजित करण्यात आलेल्या ‘ पर्पल फेस्ट ‘ ला परशुराम बामणे, पत्रकार ज्योतिप्रसाद सावंत, रणजीत कालेकर यांनी भेट देऊन गोव्याचे सामाजिक कल्याण मंत्री सुभाष देसाई यांच्याशी संवाद साधला.

या आंतरराष्ट्रीय महोत्सवात जगभरातील विविध भागातून अपंग व्यक्तींनी सहभाग घेतला असून आठ जानेवारीपासून सदर महोत्सव पणजी येथे सुरू आहे. यामध्ये कला, क्रीडा, सांस्कृतीक कार्यक्रम आदींचा समावेश आहे.


 

.

संबंधित पोस्ट

पेद्रेवाडीच्या सरपंच सौ.रेडेकर यांच्यावर अविश्वास ठराव दाखल…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

पाऊस थांबता थांबेना… आजऱ्यातील परिस्थिती …व्यंकटराव”च्या शिक्षिका भारती कांबळे यांना आंतरराज्य पुरस्कार…आजरा महाविद्यालयात झिम्मा फुगडी उत्साहात..वर्षभरात 500 कोटीच्या अँटिबायोटिक औषधांची खरेदी ! कोणताही विचार न करता भारतीय करत आहेत औषधांचा उपयोग

mrityunjay mahanews

सावधान…. ‘लंम्पी’ चा विळखा तालुक्यात घट्ट होतोय…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!