mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


ट्रॅक्टरला आग…
पन्नास हजारांचे नुकसान


                    आजरा: प्रतिनिधी

     कोळींद्रे ता. आजरा येथे ट्रॅक्टर मधून गवताची वाहतूक करत असताना शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीमध्ये गवतासह ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले काल दुपारी सदर घटना घडली.

      गवत वाहतूक करणाऱ्या गणपतराव शिंदे रा. उचंगी ता. आजरा यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरला शॉर्टसर्किटने आग लागून आगीमध्ये ट्रॅक्टर मधील गवत बेचिराख झाले तर ट्रॅक्टरचेही सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.


अपघात प्रकरणी एका विरोधात गुन्हा नोंद


                    आजरा:प्रतिनिधी

       भरधाव वेगाने, हयगयीने छोटा हत्ती गाडी चालवून समोरून येणाऱ्या होन्याळी ता.आजरा येथील विजयकुमार मारुती कानोलकर दुचाकीस्वारास धडक देऊन गंभीर जखमी केल्याच्या कारणास्तव इंद्रजीत तुरंबेकर रा.उत्तूर याचे विरोधात आजरा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

        वांजोळेवाडी येथे सदर अपघात घडला होता.


साखर कारखान्याची आज सभा
नामदेव नार्वेकर होणार संचालक…


                   आजरा:प्रतिनिधी

       वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना संचालक मंडळाची आज कारखाना कार्यस्थळावर सभा होत असून या सभेमध्ये नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत निसटत्या मतांनी पराभवाला सामोरे जावे लागलेल्या नामदेवराव नार्वेकर यांची सभेत स्वीकृत संचालक पदी निवड होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.


उत्तुर येथे शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन


                      आजरा: प्रतिनिधी

      उत्तूर ता. आजरा येथील ‘चेस मास्टर्स असोशिएन’ व श्री फाउंडेशन, धामणे यांच्या वतीने इयत्ता पहिली ते पाचवी व सहावी ते दहावी या गटात ‘शालेय जलद बुद्‌धिबळ स्पर्धा’ रविवार दिनांक २८ जानेवारी २०१४ रोजी सकाळी १० वाजता नव कृष्णा व्हॅली स्कूल व ज्यु. कॉलेज उत्तुर येथे संपन्न होणार आहेत. दोन्ही गटासाठी रु. ५०१, ४०१,३०१, २०१, १०१ रु बक्षिस,ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवणेत येणार आहे.

      शिवाय प्रत्येक इयत्तेनुसार सर्वोत्तम खेळाडूस सुवर्ण पदक देवून सन्मानित करणेत येणार आहे. स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन व मार्गदर्शन देणेचे हेतूने सदर स्पर्धांचे आयोजन केले आहे. इच्छुकांनी नव कृष्णा व्हॅली स्कूल व कॉलेज येथे संपर्क साधावा असे आवाहन संयोजक ,तानाजी पाटील, संतोष शिवणे, संतोष पोवार, तुकाराम खवरे यांनी केले आहे.


एकांकिका स्पर्धेत बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूल गवसेचे यश


                    आजरा: प्रतिनिधी

      आजरा येथील जनता एज्युकेशन सोसायटी आजरा संचलित बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूल गवसे शाळेने महाराष्ट्र शासनाच्या राज्य बालनाट्य स्पर्धेत संजय शिंदे लिखित व संतोष कालेकर दिग्दर्शित ‘ शहिद ‘ हे बालनाट्य सादर केले होते. या नाटकांच्या प्रकाश योजना विभागास राज्य शासनाचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

      संयोजन अनिल कांबळे यांनी केले होते त्याच बरोबर इचलकरंजी येथील राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धा श्रीमंत घोरपडे नाट्यगृह इचलकरंजी येथे पार पडल्या या स्पर्धेत अथर्व मुळीक या कलाकारास अभिनयाचे उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले तर वेशभूषा विभागात अशोक महाजन यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

      या नाटकांचे दिग्दर्शन संतोष कालेकर यांनी केले होते तर मुख्याध्यापक चंद्रकांत घुणे, रणजित सावंत, अनिल कांबळे, संदीप वाटवे, अशोक महाजन, विवियन मस्कारनेस, तानाजी पाटील, आय. के. पाटील, प्रा.आनंद बल्लाळ, प्रा परसू गावडे यांनी मार्गदर्शन केले.


ध्येय प्राप्तीसाठी कठोर परिश्रमाची गरज: दत्तात्रय देसाई


                    आजरा : प्रतिनिधी

      ‘ विद्यार्थी तसेच आपण ध्येयवादी बनलो तरच जीवनात उंच भरारी घेऊ शकतो.यासाठी कठोर परिश्रम व आंतरिक इच्छाशक्तीची आवश्यकता असेल तरच इच्छित ध्येय गाठू शकतो’, असे विचार निवृत्त हवाई दल अधिकारी दत्तात्रय देसाई यांनी मांडले. ते उत्तूर विद्यालय उत्तूर प्रशालेतील आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या “हवाई दलातील इच्छा” या विषयांवर बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक शैलेंद्र आमणगी होते.

      स्वागत संदीप बादरे यांनी केले. यावेळी कु. प्रज्ञा जोशीलकर, प्रतीक्षा सूर्यवंशी, स्वालीहा शेख ,कस्तुरी कदम ,सिद्धेश पाटील या विद्यार्थ्यांनी हवाई दलाविषयी प्रश्न विचारून देसाई यांच्याशी संवाद साधला.

      यावेळी बोलताना मुख्याध्यापक शैलेंद्र आमणगी म्हणाले प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हवाई दलात अधिकारी होण्याचे स्वप्न सत्यात उतरवण्याचे कार्य आपल्या शाळेतील माजी विद्यार्थी दत्तात्रय देसाई यांनी केले, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

      यावेळी बाजीराव एकशिंगे, इंद्रजीत बनसोडे ,लता तरवडेकर, कविता व्हनबट्टे आदी शिक्षक व अशोक जाधव,सदानंद चव्हाण ,इम्रानखान जमादार,संतोष व्हनबट्टे महादेव गुरव ,राजाराम केसरकर ,नंदकुमार कांबळे , शरद जाखले ,चिदंबर पोतदार यांच्यासाह विद्यार्थी उपस्थित होते.

      आभार उमाराणी जाधव यांनी मानले.


भोवताल….

शॉर्ट सर्किटमुळे कौलगे येथे ८०० मे.टन ऊस जळाला

      शॉर्ट सर्किटमुळे कौलगे येथे ३० ते ३५ एकर उसास आग लागुन उसाचे नुकसान झाले घटनास्थळी आजरा कारखान्याचे मा.चेअरमन व पदाधिकारी यांची भेट देऊन पाहणी केली.

      गुरुवार दि १८ इ.रोजी दुपारी कौलगे, ता. गडहिंग्लज येथे शॉर्ट सर्किटमुळे ३० ते ३५ एकर उसाला आग लागुन अंदाजे ८०० मे.टन ऊसाचे नुकसान झाले आहे. सदरचा ऊस ३५ ते ४० बागायतदारांचा असुन सदर उसाची विल्हेवाट लावणेचे काम आजरा साखर कारखान्यामार्फत करणेत येत आहे.

      घटनास्थळी कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुरे, व्हा. चेअरमन मधुकर देसाई, संचालक मुकुंदराव देसाई, दिपक देसाई आणि राजेंद्र मुरुकटे यांनी भेट देवून चौकशी केली व सदरचा ऊस लवकर तोडून कारखान्यास आणण्याच्या सुचना कारखान्याच्या कौलगे सेंटरचे कर्मचारी यांना दिल्या.


काजू उत्पादकांसाठी …

काजू उत्पादक परिषद

दुपारी बारा वाजता

स्थळ-डॉ. जे. पी. नाईक सभागृह

  उद्घाटक- कॉ. दत्तात्रय आत्याळकर
मार्गदर्शक- कॉ. सुभाष काकुस्ते
    अध्यक्ष-काँ. राजेंद्र बावके

श्री रामलला प्राणप्रतिष्ठापन सोहळा आजरा कार्यक्रम

सामूहिक रामरक्षा पठण

वेळ – संध्याकाळी ठीक ४.३० वाजता

स्थळ :- राम मंदिर, आजरा



साके तालुका कागल येथील सोंगी भजनाचा कार्यक्रम

रात्री आठ वाजता

स्थळ:-रामदेव गल्ली आजरा



निधन वार्ता
प्रथमेश गुरव

         पेरणोली येथील तरूण वारकरी प्रथमेश शिवराम गुरव (वय २५) यांचे आकस्मिक निधन झाले.

त्यांच्या पश्चात आई,वडील,बहीण,भाऊ असा परिवार आहे.सोमवार दि. २२ रोजी सकाळी रक्षाविसर्जन आहे.


संबंधित पोस्ट

आज-यात गोवा बनावटीच्या दारुसह  साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

लढण्याचा वारसा घेऊन निवडणूक रिंगणात : सूर्यकांत नार्वेकर

mrityunjay mahanews

बहिरेवाडी येथे बैलाचा “लम्पी’ ने मृत्यू… गडहिंग्लज उपविभागातील पहिला बळी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!