
विहिरीत पडून महिलेचा मृत्यू

आजरा: प्रतिनिधी
गांधीनगर,आजरा येथील यासीन रशिद दरवाजकर या ७० वर्षीय महिलेचा मृतदेह आज घराशेजारील विहिरीमध्ये आढळून आला.
गेले कांही दिवस दरवाजकर यांचे मानसिक संतुलन ठीक नव्हते. त्या भरातच त्यांचा विहिरीत पडून बुडून मृत्यू झाला असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.
याबाबतची वर्दी इरफान रशीद दरवाजकर यांनी आजरा पोलिसात दिली असून पोलीस नाईक संतोष घस्ती पुढील तपास करीत आह

मलिग्रे जंगल परिसरात बिबट्याचा वावर

आजरा:प्रतिनिधी
मलीग्रे जंगल परिसरात बिबट्याचा वावर सुरू झाला आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी आजरा- महागाव रस्त्यावरील चाफ्याच्या विहिरीजवळ ट्रॅक्टर चालक सागर बुगडे यांना बिबट्या दिसला. तो आजरा साखर कारखान्याला ट्रॅक्टर मधून ऊस वाहतूक करत असताना त्याच्या ट्रॅक्टर जवळून बिबट्या गेला.
बुगडे यांनी दुचाकीस्वार संजय घाटगे यांना त्याची माहिती दिली. त्यांनी वाहनधारकांना याची कल्पना दिल्यावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या परिसरात खोल दरी व दाट जंगल आहे. कांही पोल्ट्रीचालक येथे मृत कोंबड्या टाकत असल्याने भटक्या कुत्र्यांचा वावरही या परिसरात असल्याने बिबट्या या परिसरात आला असल्याचे नागरिक सांगतात. त्याच्या वावरामुळे होनेवाडी, हात्तीवडे, पेद्रेवाडी व सिरसंगी या परिसरात भीतीचे वातावरण आहे.
शिरसंगी परिसरात टस्कर

एकीकडे मलिग्रे परिसरात बिबट्याचा वावर असताना दुसरीकडे सिरसंगी परिसरात तस्कर दाखल झाला आहे. त्याच्या वावरामुळे शेतीचे नुकसान होत आहे. शेतकरी अडचणीत आला असून वन विभागाने बिबट्यासह हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

गवसे व दर्डेवाडी इको सेन्सीटीव्ह झोन वगळा…
वनमंत्र्यांकडे मागणी

आजरा: प्रतिनिधी
वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.आजरा मार्फत इथेनॉल प्रोजेक्ट उभारणेसाठी इन्व्हॉरमेंटल क्लिअरन्स घेणे करीता सन २००६ व २०१४ मध्ये इको सेन्सीटीव्ह झोन मध्ये समाविष्ठ केलेली गवसे व दर्डेवाडी ही गावे इको सेन्सीटीव्ह झोन मधुन वगळण्यात यावीत याकरीता केंद्रीय मंत्रालयात शिफारस करण्याच्या पार्श्वभूमीवर वनमंत्री सुधीर मनगुट्टीवार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी ना.हसन मुश्रीफ,वैद्यकिय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री, कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुरे,व्हा.चेअरमन मधुकर देसाई, संचालक अनिल फडके, कोल्हापुर जिल्हा बँकेचे संचालक तथा कारखान्याचे बँक प्रतिनिधी सुधीर देसाई व कारखान्याचे कन्सलटंट डॉ. दिपक मेंगाणे, विवेक पाटील व कारखान्याचे जनरल मॅनेंजर (प्रोडक्शन) संभाजी सावंत उपस्थित होते.
वनमंत्री मनगुट्टीवार यांनी दि.१५ फेब्रुवारीपुर्वी सदर विषयावर पर्यावरण विभागाची केंद्रीय मंत्रालय दिल्ली येथे मिटींग बोलावुन सदरचा विषय मार्गस्थ करण्याबाबतचे आश्वासन दिले.

‘आजरा मर्चंटस् ‘ ची निवडणूक बिनविरोध

आजरा: प्रतिनिधी
आजरा मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड आजराची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुजयकुमार येजरे यांनी काम पाहिले
. बिनविरोध निवडून आलेले संचालक पुढीप्रमाणे…
रमेश महादेव कारेकर, सुरज किशोर जाधव, बसवराज शिवपुत्रआण्णा गुंजाटी, दिवाकर आबा नलवडे,शिवलिंगाप्पा दुंडाप्पा तेरणी, रुद्राप्पा कलाप्पा पाटील, ऋषिकेश बसवराज महाळंक, सौ. स्मिता जनार्दन टोपले, सौ. उमा शंकर हुक्केरी, गोपाळ जानबा जाधव, गोपाळ बाळू पाटील, शामराव दौलू कारंडे
निवडणूक बिनविरोध पार पाडण्यास सहकार्य केल्याबद्दल सर्व सभासदांचे संचालक रमेश कारेकर यांनी आभार मानले.

साळगाव शाळेत विविध उपक्रम

आजरा: प्रतिनिधी
राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा… हा स्पर्धात्मक उपक्रम सुरु आहे.शासन स्तरावरुन या उपक्रमाचे विशेष नियोजन होत आहे साळगाव शाळेनेही या उपक्रमातंर्गत विद्यार्थी, पालक शिक्षक व समाज यांच्या सहभागाने विविध उपक्रमाचे नियोजन केले आहे.
सुरुवातीला या उपक्रमाची लोकजागृती व्हावी यासाठी मुख्यमंत्री संदेश पत्र वाचन व वाटप, व्यवस्थापन बैठक शासन परिपत्रक वाचन व त्यानुसार विविध उपक्रमांचे नियोजनात समाज सहभाग, स्वच्छता उपक्रम, प्लास्टिक मुक्त परिसर, तंबाखुमुक्त शाळा या उपक्रमांचे नियोजन करण्यात आले.
यासाठी सरपंच धनंजय पाटील, व्यवस्थापन अध्यक्ष संदिप पाटील यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. मुख्याध्यापिका सौ. मंजीरी यमगेकर, संजय मोहिते, निवृती मिटके, सौ गिता जंगम यांनी परीश्रम घेत आहेत.

श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळा
आजरा कार्यक्रम...

आज दि.१९ रोजी कुंभार गल्ली, आजरा येथे श्री. संत गोरा कुंभार तरुण मंडळ यांच्या वतीने रात्री नऊ वाजता श्री स्वामी नरेंद्र भजनी मंडळ, कळंबा कोल्हापूर यांचा भजनी संध्या कार्यक्रम
आज श्री राम मंदिर, आजरा येथे रात्री आठ वाजता ह.भ.प. बाळासाहेब रानमाळे महाराज यांचा कीर्तन कार्यक्रम

धनगरमोळा येथे हाफ पीच क्रिकेट स्पर्धा

धनगरमोळा ता. आजरा येथे माऊली स्पोर्ट्स च्या वतीने हाफ पिच (अंडर आर्म ) बॉक्स टाईप ग्रामीण स्थानिक क्रिकेट स्पर्धांचे उद्या शनिवार दिनांक २० जानेवारीपासून आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांनी दिली. स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे रु. ५००१/-,४००१/-,३००१/-, व २००१/- रोख असे बक्षीस देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त इतर वैयक्तिक बक्षिसेही आहेत. स्पर्धेत भाग घेऊन विठ्ठला संघानी
७७६२९३७५४५…
७०३०२४२२८१…
७७९६४३०३९१…
या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.




