mrityunjaymahanews
अन्य

लुटीचा बनाव करून पोलिसांना गंडवण्याचा प्रयत्न फसला… आजरा व सिंधुदुर्ग पोलिसांनी केला पर्दाफाश … अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या अलगद जाळ्यात

 

 

लुटीचा बनाव करून पोलिसांना गंडवण्याचा प्रयत्न फसला
आजरा व सिंधुदुर्ग पोलिसांनी केला पर्दाफाश …
अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या अलगद जाळ्यात

बोलेरो गाडीतून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी आपल्यावर हल्ला करत आपल्याजवळील रोख रकमेसह आपला मोबाईल चोरून नेला आहे. इतकेच नाही तर आपणाला बांधून घालून मारहाण करून आपण चालवतअसलेला ट्रकही लंपास केला आहे, असे सांगून सहानुभूती मिळवू पाहणाऱ्या अशोक पोपट पवार या लातूर येथील २७ वर्षीय अट्टल गुन्हेगाराची पोलिसांनी संशयावरून उलट तपासणी करून पोलिसी खाक्या दाखवताच अशोक याचा हा दोन साथीदारांच्या साहाय्याने केलेला बनाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातून एक अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अलगद सापडला असून सुमारे ३५ गुन्ह्यात सहभाग असणाऱ्या अशोक याला जेरबंद केल्याबद्दल आजरा व सिंधुदुर्गनगरी पोलिसांचे कौतुक होत आहे.

या प्रकरणातील अशोक याच्या आणखी दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आजरा- आंबोली मार्गावर तुलसी धाब्याच्या पुढील बाजूस रस्त्याशेजारी गुरुवारी सकाळी हात पाय बांधलेल्या स्थितीत अशोक काही स्थानिक ग्रामस्थांना दिसून आला.यावेळी त्याने बोलेरो गाडीतून आलेल्या सहा जणांनी सिंधुदुर्ग येथील हुमरमळा या ठिकाणी आपली मालवाहतूक करणारी गाडी अडवून आपल्याला मारहाण करून पंधरा हजार रुपये व मोबाईल काढून घेतले व त्याचबरोबर आपला ट्रकही घेऊन ते पसार झाल्याचे सांगितले. ग्रामस्थांनी सदर घटना आजरा पोलिसांना सांगून अशोक याला आजरा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.

सदर घटना समजताच आज-याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सिंधुदुर्ग पोलिसांच्या मदतीने या प्रकरणातील फिर्यादी अशोक याची उलट-सुलट तपासणी सुरू करून दिवसभर माहिती जमा केली.अखेर गुरुवारी रात्री अशोक याच्या कडून दिल्या जाणाऱ्या माहितीमध्ये तफावत दिसत असल्याचे आढळून आल्याने त्याला संशयावरून पोलिसी खाक्या दाखवताच हा केवळ बनाव असल्याचे स्पष्ट झाले . अशोक याने आपल्या समवयस्क दोन नातलगांच्या मदतीने सदर बनाव रचला असल्याचेही उघड झाले आहे . अशोक हा सराईत गुन्हेगार असून त्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रात्रीच्या वेळी ३५ ठिकाणी उभ्या वाहनांमधील डिझेल चोरी, ८ ठिकाणी ट्रकच्या बॅटऱ्या चोरण्यासह दुकाने फोडून आतील माल लंपास करणे यासारखे छोटे -मोठे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

एकीकडे रुग्णालयात दाखल केल्यानंतर अशोक ट्रक चोरीला गेला असल्याचे सांगत असतानाच गुरुवारी दुपारीच ट्रकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हे प्रकरण बनाव असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. अखेर अशोक व त्याच्या साथीदारांचा डाव त्यांच्याच अंगलट आल्याचे स्पष्ट झाले आहे.या प्रकरणात बोलेरो गाडीचा कोठेही संदर्भ आला नसल्याने तो सुद्धा एक बनावाचाच भाग होता.

याकामी आजरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारगुडे व सिंधुदुर्ग नगरी (ओरोस) पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एच. व्ही.देवरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

सध्या अशोक पवार हा सिंधुदुर्गनगरी पोलिसांच्या ताब्यात आहे.

 

‘मृत्युंजय महान्यूज’ ने दिले होते वृत्त…

सदर प्रकार बनाव असल्याबद्दलचे ट्रकच्या फोटोसह ‘मृत्युंजय महान्यूज’ ने वृत्त कालच प्रसिद्द केले होते. काल रात्रीपासून या वृत्ताची चर्चा होती.अखेर हा बनाव असल्याचे समोर आले आहे.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

प्रभागाचा विकास हाच ध्यास…सौ.सरीता गावडे

mrityunjay mahanews
error: Content is protected !!