शनिवार दि.२७ सप्टेंबर २०२५


लाटगाव येथे वाघाच्या हल्ल्यात बैल व म्हैस ठार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
लाटगाव (ता. आजरा) येथे वाघाने केलेल्या हल्यात बैल व म्हैस ठार झाले आहेत.
लाटगाव जंगलात दोन दिवसांपूर्वी सदर घटना घडली आहे. बिरु नवलु कस्तुरे रा.बुजवडे (ता. चंदगड) येथील शेतकऱ्यांची ही जनावरे आहेत. दक्षिण आजराचे वनपाल संदिप शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
कस्तुरे यांनी नेहमी प्रमाणे जनावरे चरावयास सोडली होती. दरम्यान झाडीत दबा धरून बसलेल्या वाघाने जनावरांच्या कळपावर हल्ला केला. त्यांच्या हल्यात बैल व म्हैस ठार झाली आहे.
वन विभागाकडून याबाबत अधिक माहिती घेतली जात आहे.
जिल्हा उद्योग केंद्रामार्फत आजरा येथे नव उद्योजकांना मार्गदर्शन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जिल्हा उद्योग केंद्रामार्फत पंचायत समिती आजरा येथे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम उत्साहात पार पडला. ताराराणी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. विजयालक्ष्मी प्रकाशराव अबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमांमध्ये नव उद्योजक महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सौ. आबिटकर यांनी छोट्या छोट्या उद्योगांमध्ये महिलांना आपली ओळख निर्माण करता येते व या छोट्या उद्योगांचे पुढे मोठ्या उद्योगांमध्ये रूपांतर होऊन एक यशस्वी उद्योजक म्हणून पुढे येण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना सुरू करण्यात आली आहे. यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व महिलांना ताराराणी फाउंडेशनच्या वतीने सर्व सहकार्य केले जाईल असे स्पष्ट केले.
प्रकाश बुरुड,समन्वयक ताराराणी फाउंडेशन यांनी या उपक्रमांतर्गत विविध योजनांची माहिती दिली. यावेळी आजरा नगरपंचायतीच्या माजी नगरसेविका सुमैय्या खेडेकर यांनी महिलांनाही उद्योजक बनण्याची संधी कशी आहे याबाबत मार्गदर्शन केले. आभार सौ. प्रियांका जाधव, सरपंच पेरणोली यांनी मांडले यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आजरा पाणीपुरवठा योजना वादाच्या भोवऱ्यात
माहितीच्या अधिकारात माहिती घेण्याच्या हालचाली सुरू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन आजरा शहरांमध्ये नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणण्यात आली. परंतु ही पाणीपुरवठा योजना दिलेला कालावधी संपून गेला तरीही अद्याप पूर्णत्वास गेली नसल्याने व पूर्णपणे रेंगाळल्याने या योजनेत अनेक अडचणी दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे यांनी नगरपंचायतीकडे माहितीच्या अधिकारांतर्गत योजनेची सविस्तर माहिती मागितली आहे.
या पार्श्वभूमीवर बोलताना परशुराम बामणे म्हणाले, वारंवार मागणी करूनही नगरपंचायतीकडून संबंधित ठेकेदाराचे नाव, पत्ता, निविदेचा कालावधी, वाढीव मुदतीचे आदेश, पाईपचा दर्जा, वापरलेले सिमेंट, मंजूर अंदाजपत्रक व प्रत्यक्ष खर्च यासह कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
यासाठी सदर माहिती मागवण्यात आली असून पुढील कायदेशीर पावले माहिती मिळाल्यानंतर उचलण्यात येणार असल्याचा इशाराही दिला आहे.

शिवाजी कांबळे यांचे निधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा साखर कारखान्याचे माजी संचालक व आजरा महाल शिक्षण मंडळाचे विद्यमान संचालक शिवाजी पांडुरंग कांबळे रा. हरपवडे ता. आजरा यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ६४ वर्षे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली आहेत. हरपवडे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह अंतर्गत वृक्षारोपण व जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा महाविद्यालय आजरा येथे राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह अंतर्गत वृक्षारोपण व सायकल रॅली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए. एन. सादळे, व्होकेशनल विभागाचे पर्यवेक्षक प्रा.मनोज कुमार पाटील, कार्यालयीन अधीक्षक श्री. योगेश पाटील, एन एस एस प्रकल्प अधिकारी श्री. रत्नदीप पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
त्यानंतर आजरा शहरामध्ये स्वयंसेवकांनी सायकल रॅली काढली ‘एक पेड मॉं के नाम’, प्लास्टिक निर्मूलन, व्यसनमुक्ती या विविध विषयांवर जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन प्रकल्प अधिकारी श्री. रत्नदीप पवार यांनी केले.

आजरा येथे संघशताब्दी निमित्त सहघोष पथसंचलन व विजयादशमी उत्सव

आजरा : मृत्युंजय महा न्यूज वृत्तसेवा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आजरा तालुक्याच्या वतीने रविवारी दि.२८ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता आजरा शहरातून सहघोष पथसंचलन काढण्यात येणार आहे.
त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता महाजन गल्ली येथील चैतन्य सभागृहात विजयादशमी उत्सव व शस्त्र पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी आजरा शहरातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका कार्यवाह विश्वनाथ हसबे यांनी केले आहे.

मलिग्रे येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
प्राथमिक आरोग्य केंद्र मालिग्रे येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान पार पडले .अभियानामध्ये अभियानामध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर जी गुरव व विस्तार अधिकारी श्री. व्हि.ए. काटकर , बी. एन. ओ. श्रीमती भांडकोळी, तसेच आरोग्य सहाय्यक डी. के.पाटील.आरोग्य सेवक कौस्तुभ पाटील, वैद्यकीय अधिकारी संगीता परमार तसेच द्वितीय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संध्या राऊत विशेष आमंत्रित डॉक्टर माहेर हॉस्पिटलच्या श्रीम डॉ. सोनाली येसणे व त्यांची टीम डॉक्टर बारदेसकर हॉस्पिटलच्या डॉ. नंदिनी पाटील व त्यांची टीम नेत्रचिकित्सक डॉक्टर सुदाम हरेर , मालिग्रे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असणाऱ्या मलिग्रे, कानोली,. किणे, सुळे, कोळिंद्रे, हात्तिवडे, मेंढोली, चितळे या आठ उपकेंद्रांतर्गत २९ गावांमधील समुदाय आरोग्य अधिकारी , आरोग्य सेविका आरोग्य सेवक आशा अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, मदतनीस हजर होत्या.
सदर कार्यक्रमांमध्ये एकूण २७६ रुग्णाची तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मलिग्रे गावच्या सरपंच सौ. शारदा शिवानंद गुरव , यांचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले,तसेच ग्रामपंचायत सदस्य मलगरे, श्री. समीर पारदे , तसेच मलिग्रे गावचे सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्राम विस्तार अधिकारी धनाजी पाटील, व त्यांचा कर्मचारी स्टाफ हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत माळवे यांनी केले, कार्यक्रमाची संपूर्ण माहिती डॉक्टर आर.जी.गुरव, तालुका आरोग्य अधिकारी यांनी दिली.

आजरा तालुका केमिस्ट असोसिएशन च्या वतीने ‘जागतिक फार्मासिस्ट दिवस साजरा ‘

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून आज तररा तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने ‘फार्मासिस्ट दिन साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम प्राचार्य श्री पन्हाळकर व्यंकटराव हायस्कूल आजरा यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. तसेच धन्वंतरी चे पूजन माजी संचालक नारायण खटावकर व माजी संचालक सोमनाथ रावजीचे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सभेची सुरुवात झाली.
प्रास्ताविक व स्वागत तालुका केमिस्ट असोसिएशनचे सचिव इरफान सय्यद यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात फार्मासिस्ट चा इतिहास सांगितला ‘फार्मासिस्ट ओथ’ सौ. उज्वला पाटील यांनी सर्व फार्मासिस्टना दिली. गुणवंत केमिस्ट सौ. उज्वला गुंजकर यांचा तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला, गतवर्षीपासून आजरा तालुक्यात सुरू करण्यात आलेला ज्येष्ठ फार्मासिस्ट अवॉर्ड यावर्षी अनुक्रमे श्री. रवींद्र मुळे (सिद्धनाथ मेडिकल,किणे ),श्री. संजय हरेर (ओम मेडिकल, आजरा) यांनि देण्यात आला.
‘ ३६४ दिवस समाजासाठी एक दिवस स्वतःसाठी ‘ सर्व फार्मासिस्टची मेडिकल चेकअप केले त्यामध्ये ब्लडप्रेशर,रक्ताच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी kdca, संचालक संजय हरेर, तालुका अध्यक्ष अमर पाटील, सेक्रेटरी इरफान सय्यद, खजिनदार दयानंद गिलबिले व सर्व तालुका पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

दुर्गा माता दर्शन
राजे कला क्रीडा आणि सांस्कृतिक तरुण मंडळ गजरगांव

अध्यक्ष : राहूल देसाई
उपाध्यक्ष : अजित पाथरवट
सचिव : दिपक पाथरवट
खजिनदार : सुशांत पाथरवट
मूर्ती देणगीदार : किरण परशराम पाथरवट
मूर्तिकार : धीरज कुंभार (हिरलगे)
पारेवाडी नवरात्र उत्सव मंडळ

अध्यक्ष : नारायण घेवडे उपाध्यक्ष : सुनील ईलगे
खजिनदार : जितेंद्र निर्मळे
सचिव : केरबा कालेकर
शिवनेरी शारदीय सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ

अध्यक्ष : बाळकृष्ण
उपाध्यक्ष : अरुण सुतार
सुतार : कार्याध्यक्ष बाळासाहेब उंडगे सचिव : बाळासाहेब पाटील

पावसाचा जोर वाढला
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहर व परिसरामध्ये शुक्रवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. शनिवारी सकाळपर्यंत पाऊस सुरूच होता. पावसामुळे नवरात्र उत्सव मंडळांच्या कार्यक्रमावर मर्यादा आल्याचे दिसत आहे.

आज महाप्रसाद
छत्रपती शिवाजीनगर नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने आज सायंकाळी सात नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.


