
बेलेवाडीत दर्शन…?
लिंगवाडीत हल्ल्यात बैलाचा मृत्यू

आजरा तालुक्यातील बेलेवाडी परिसरात बिबट्याने दर्शन दिले असल्याची गेले दोन दिवस चर्चा असतानाच लिंगवाडी येथील सहदेव प्रभू यांच्या बैलावर बिबट्याने हल्ला केल्याने या हल्ल्यात बैलाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याने तालुक्यामध्ये बिबट्यांची दहशत पुन्हा एकवेळ अधोरेखित झाले आहे.
गेले चार दिवस बेलेवाडी परिसरात बिबट्याचे दर्शन झाले असल्याचा दावा या परिसरातील नागरिकांकडून केला जात आहे. परंतु वन खात्याकडून मात्र याला दुजोरा मिळत नसून सदर प्राणी तरस असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान लिंगवाडी येथून दशरथ प्रभू यांचा बेपत्ता असलेला बैल आज मृतावस्थेत आढळला.सदर बैलावरील हल्ल्याचा प्रकार पाहिला असता हा हल्ला बिबट्याने केला असल्याचे वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्यांचा वावर यापूर्वीही दिसून आला आहे. आज प्रभू यांच्या बैलावरील हल्ल्याने शेतकरी वर्गात मात्र भीतीयुक्त वातावरण आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लिंगवाडी येथे भेट देऊन शेतकऱ्यांना दक्षतेचा इशारा दिला आहे.

आजरा तालुक्यात सरपंच पदाच्या ३१ जागांसाठी ८० उमेदवार
तर सदस्य पदाच्या २२९ जागांसाठी ५०२ उमेदवार रिंगणात
आजरा तालुक्यातील पारपोली- खेडगे गावठाण, चाफवडे, आवंडी, पोळगाव व लाटगाव या पाच ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाल्याचे आज माघारी दिवशी स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील ३१ गावांच्या सरपंच पदासाठी ८० उमेदवार तर २२९ सदस्य पदासाठी ५०२ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
गावातील राजकीय संघर्ष टाळण्यासाठी पाच गावातील नेतेमंडळीनी बिनविरोधसाठी पुढाकार घेतला. गावचा विकास साधण्याबरोबर गावात सलोखा टिकवण्यासाठी या गावातील ग्रामस्थ एका जाजमावर आले. त्यामुळे या पाच गावात ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात यश आलेआहे.
निवडणूक लागलेल्या ३६ ग्रामपंचायतीपैकी ३१ ग्रामपंचायतीसाठी रणधुमाळी सुरु झाली आहे. काही ठिकाणी सरपंचपदासाठी तर काही ठिकाणी सदस्यपदासाठी जोरदार धूमश्चक्री होणार आहे. सरपंचपदाची तडजोड होवू न शकल्याने एनवेळी काही गावात निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. शेवटपर्यंत प्रयत्न करून देखील सहा ते सात गावातील निवडणुका बिनविरोध करण्यात अपयश आले आहे.
….
बिनविरोध ग्रामपंचायतीचे नाव, सरपंच व सदस्यांची नावे पुढील प्रमाणे :-
पारपोली – खेडगे व गावठाण
प्रियांका प्रकाश शेटगे (सरपंच),
माया सुनिल गुडूळकर, सुचिता श्रावण शेटगे, दिपक बाळू डेळेकर, अश्विनी गणपती जाधव, संतोष मारुती पाटील, वंदना मारती राणे, प्रकाश यशवंत कविटकर
…
चाफवडे
धनाजी आप्पा दळवी (सरपंच),
तनूजा तुकाराम बापट, सुप्रिया पाडुरंग ठाकर, विजय नारायण भडांगे, विलास आप्पा धडाम, स्मिता बाळू घेवडे, नम्रता योगेश तळेकर, पांडीबा नारायण गावडे
…
आवंडी
बयाजी भोरु मिसाळ (सरपंच)
विठू बाबू गावडे, लक्ष्मी गंगाराम येडगे, साउबाई बाबू येडगे, विठोबा जानू कोकरे, संगीता बबन कोकरे
…
पोळगाव
माधुरी शामराव गुरव (सरपंच)
सुरेश तानाजी कोरगावकर, शामराव जानबा खामकर, श्रेया दत्तात्रय धडाम, नंदिनी नामदेव कांबळे, केशव गुड खामकर, नम्रता ज्ञानदेव दोरुगडे, संजय गुंडू सुतार
…
लाटगाव
वामन दत्तू सूतार (सरपंच)
महादेव बाळू कांबळे, सुरेखा दिलीप चौगुले, सरला संजय शिंदे, सुनिता अमर सरदेसाई, संदेश यशवंत दळवी, गीता तुकाराम जाधव, रणजित सूर्यकांत सरदेसाई.
…
चिन्हामुळे उमेदवारांत नाराजी
यंदाच्या निवडणुकीत १५० चिन्हांचे वाटप केले गेले आहे. दरवेळच्या निवडणुकीत सरावाची असलेली चिन्हे या निवडणुकीत मिळतील अशी आशा बाळगून अनेक उमेदवार होते. प्रत्यक्षात मात्र अशी चिन्हे मिळाल्याने उमेदवारांमध्ये नाराजी तर दिसून येत होती परंतु चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवताना चांगली दमछाक होणार असल्याची बोलले जात होते.
….
सरपंचपदासाठी या गावात होणार
चौरंगी लढती. गजरगाव, किटवडे , मडीलगे, उत्तुर,साळगाव.
…
सरपंच पदासाठी या गावात होणार तिरंगी लढती
कानोली, लाकूडवाडी सुळेरान, भादवणवाडी, भादवण कोळींद्रे,वझरे, धामणे
…




