mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

सोमवार  दि. ११ ऑगस्ट २०२५         

चाळोबा गणेश हत्तीचे इटे येथे आगमन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

गेले अनेक दिवस तालुक्याच्या पूर्व भागात धुमाकूळ घालून शेती पिकांचे नुकसान केलेल्या चाळोबा गणेश हत्तीचे रविवारी पहाटे इटे परिसरात आगमन झाले आहे.

बरेच दिवस हत्तीचा उपद्रव नसल्याने सुखावलेल्या बळीराजाला पुन्हा एकदा नुकसान क्सत्राला सामोरे जावे लागणार असल्याने इटे परिसरातील शेतकरी वर्ग धास्तावला आहे.

वनविभागाने शेतकरी वर्गास दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

 रक्षाबंधनात समाज- पोलिस भावबंध अधिक घट्ट….

भादवणच्या सरपंच माधुरी रणजित गाडे यांचा उपक्रम

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा (मंदार हळवणकर)

रक्षाबंधन हा सण म्हणजे प्रेम, विश्वास आणि संरक्षणाचा बंध अधिक घट्ट करण्याचा दिवस. हा बंध केवळ रक्ताच्या नात्यातील नसून, समाजातील आपल्यासाठी झटणाऱ्या प्रत्येकाच्या मनात जपला जाऊ शकतो. याच भावनेतून भादवणच्या लोकनियुक्त सरपंच सौ. माधुरी रणजित गाडे यांनी
रक्षाबंधनाच्या दिवशी उत्तूर पोलीस विशेष कार्यक्रमात परिसरातील अनेक महिलांनी उत्साहाने सहभागी होत पोलीस बांधवांना राखी बांधली. राखी बांधताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, आपुलकी आणि अभिमान याने संपूर्ण वातावरण भावनिक आणि स्नेहपूर्ण झाले.

या प्रसंगी बोलताना सरपंच माधुरी गाडे म्हणाल्या, “पोलिस हे केवळ कायद्याचे रक्षक नाहीत, तर ते समाजाचे खरे भाऊ आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि विशेषतः महिलांच्या सुरक्षेसाठी ते दिवस-रात्र सज्ज असतात. त्यांच्या या निःस्वार्थ सेवेसाठी कृतज्ञतेचा धागा बांधणे आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करणे ही मनापासूनची इच्छा होती.”कार्यक्रमातील महिलांनी पोलिस दलाचे गाव आणि परिसराच्या सुरक्षेसाठी असलेले योगदान अधोरेखित केले. पोलिसांशी असलेला हा भावबंध समाजातील विश्वास, सहकार्य आणि ऐक्य आणखी बळकट करणारा असल्याचे त्यांनी नमूद केले. 

कार्यक्रमासाठी उत्तूर पोलीस स्टेशनचे जमीर मकानदार, सुदर्शन कांबळे (हवालदार), गणेश मोरे (पोलीस कॉन्स्टेबल), रणजीत गाडे, संदेश रायकर (उत्तूर ग्रामपंचायत सदस्य), सविता सावंत (उत्तूर ग्रामपंचायत सदस्य), जयश्री सावंत, सुजाता आमणगी, दीपा जवाहिरे, प्रेरणा भाईगडे, गीता कुंभार (पोलीस पाटील), श्वेता आमणगी, कांचन पाटील, पूजा आमणगी, रेखा गाडीवड, धोंडीराम सावंत, विठ्ठल उत्तूरकर, प्रदीप लोकरे, भादवणचे तंटामुक्त समिती अध्यक्ष शिवाजी कुंभार, सुधाकर हुल्ले आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची प्रस्तावना विठ्ठल उत्तूरकर यांनी केली, तर आभार प्रदर्शन उत्तूर पोलीस स्टेशनचे सुदर्शन कांबळे यांनी केले.

 आजरा  हायस्कूलच्या NCC कॅडेट्सना माजी सैनिक संघटनेच्या वतीने क्रांतिदिनाच्या निमित्ताने विशेष मार्गदर्शन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

माजी सैनिक श्री. दत्तात्रय मोहिते यांनी क्रांतिदिना विषयी माहिती सांगितली व संस्कारक्षम , निर्व्यसनी, आरोग्य संपन्न युवा पिढी बनावी याबद्दल मार्गदर्शन केले.

 मयुर देसाई यांनी NDA परीक्षा व SSB ला कसे सामोरे जावे याचे सखोल मार्गदर्शन केले. यावेळी आजरा हायस्कूलचे मुख्याध्यापक व मा.जी NCC ऑफीसर श्री अजित तोडकर , माजी सैनिक श्री. भरत तानवडे , श्री. कृष्णा पाटील , श्री आनंदा टेंबकर व सौ.अनिता देसाई उपस्थित होते..

आजरा हलकर्णी बस पूर्ववत सुरू झाल्याने, जनतेतून समाधान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा -मलिग्रे- महागाव- हलकर्णी हि बस सेवा १९९० पासून २०२० पर्यंत कर्नाटकला जोडणारी अविरतपणे ३० वर्ष सेवा सुरू होती. आजरा तालुक्यातील पुर्वेकडील भागातील जनतेला तालूक्याला जाताना सुरुवातीची व येताना शेवटची अशी ही गाडी होती. या गाडीने महाराष्ट्र कर्नाटकातील नोकरदार, व्यापारी व काँलेज विद्यार्थी महत्वाची भुमिका घेतली होती. सुरुवातीला गडहिंग्लज एसटी डेपोच्या गाडीने चांगला जम बसवला होता. आजरा येथे नव्याने एसटी डेपो सुरु झाल्यावर हि गाडी आजरा आगारातून सुरु झाली. परंतू गाडीला अपेक्षित उत्पन्न नाही, रस्ता बरोबर नाही असे म्हणत गाडी बंद केली.

ही गाडी पाच वर्ष बंद झाल्यापासून ब-याच वेळा प्रवासी संघटना व गावोगावच्या ग्रामपंचायतीने प्रयत्न केले. यामुळे महागाव, गडहिंग्लज, कानोली अशा वस्तीच्या गाड्या सोडून उत्पन्नाचा मुद्दा करत त्याही गाड्या बंद केल्या. आजरा आगारा मार्फत पूर्व भागावर सातत्त्याने अन्याय होत असून, या भागातील राजकीय मंडळींचेही लक्ष नाही. सकाळी नऊ, दुपारी बारा व दोन, त्या नंतर चार वाजल्यापासून एकही गाडी या मार्गावर नसल्याने कामानिमित्त आलेल्यांना इतरांच्या वर अवलंबून रहावे लागते, किंवा पायी प्रवास करावा लागतो. याची जाणीव ठेऊन बहूजन मुक्ती पार्टी च्या माध्यमातून डाँ. सुदाम हरेर व कोल्हापूरवासीय प्रवासी संघटना, मुंबईचे कार्यकर्ते गणपती भणगे याच्या प्रयत्नाने सोमवार दिनांक ११ पासून आजरा आगारातून सायंकाळी ७.२५ वा. हलकर्णी वस्तीची गाडी सुरु होत असल्याने जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.

 

प्रजापिता ब्रह्माकुमारीज् च्या वतीने सरपंच, उपसरपंच यांचे रक्षाबंधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा आजरा यांच्यावतीने आजरा तालुक्यातील सरपंच आणि उपसरपंच यांच्यासाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला.

सर्वप्रथम विद्यालयाचा परिचय गंगाधरभाई पाकले यांनी करून दिला त्यानंतर मनीषा बहनजी यांनी रक्षाबंधनाचे रहस्य आणि राजयोगाचा अभ्यास करून घेतला.
गावच्या सर्वांगीण विकासासाठी स्वच्छता आरोग्य आणि एकता याबाबत मार्गदर्शन आजरा सेवाकेंद्राच्या संचालिका संध्या बहेनजी यांनी केले. के व्ही.येसणे यांनी माउंट आबू, राजस्थानचे अनुभव सांगितले. देऊळवाडी गावचे उपसरपंच संजय भाई सावंत यांनी आभार मानले. यावेळी तालुकाभरातील सरपंच उपसरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निधन वार्ता
परशुराम पाटील

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

इटे या.आजरा येथील परसराम भागोजी पाटील (वय ७९ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले ,सुना,दोन मुली ,जावई,
व नातवंडे असा परिवार आहे.

पेरणोली येथील डॉ. भगवान पाटील व पाटबंधारे विभागाचे अधिकारी श्रीकांत पाटील यांचे ते वडील होत.

 आज शहरात

♦ आज दिनांक ११ रोजी महावितरण आजरा १ शहर शाखा तर्फे वीज ग्राहक तक्रार निवारण करण्यासाठी महावितरण ग्राहक मेळावा तहसील कार्यालयात सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

♦ गणेश उत्सव २०२५ अनुषंगाने आज ११ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय आजरा येथे सर्व गणेश मंडळे, अध्यक्ष, पदाधिकारी, पोलीस पाटील यांची बैठक आयोजित केली असून सर्व प्रशासनामधील अधिकारी बैठकीला हजर राहणार आहेत.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

डॉ. दीपक सातोसकर यांचा वाढदिवस उत्साहात

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

गवसेजवळ १० कोटी ७४ लाखांची व्हेल माशाची उलटी जप्त

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आज-यात तणाव…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!