

बसवेश्वर विकास सेवा संस्थेत सरपंच कृष्णा कुंभार यांची सत्ता
निंगुडगे तालुका आजरा येथील श्री. बसवेश्वर विकास सेवा संस्थेत श्री. अमृतेश्वर ग्रामविकास विकास आघाडीने विजय मिळविला. तेरापैकी अकरा जागांवर या आघाडीने आपले वर्चस्व ठेवले.
या आघाडीचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे , आप्पासो नारायण देसाई बजरंग बंडोपंत देसाई प्रतापराव बापुसो देसाई , कृष्णा बाबुराव कुंभार, रवींद्र दादासो निंबाळकर, शिवाजी संतु चौगुले, दयानंद माधवराव देसाई, महादेव नारायण बंधवाले, संभाजी बाबु आगलावे , मनिषा रविंद्र देसाई, निर्मला बाजीराव मगदूम.
श्री. अमृतेश्वर ग्राम विकास आघाडीचे नेतृत्व सरपंच कृष्णा कुंभार, तंटामुक्त समिती अध्यक्ष रवींद्र देसाई,सम्राट देसाई, संग्राम देसाई, महेश भोसले, नेताजी पाटणे, सुनील देसाई यांनी केले.
अजिंक्य देसाई यांचा ‘महाराष्ट्र युवा समाजरत्न” पुरस्काराने सन्मान

परिवर्तन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था इचलकरंजी, एशिया बुक रेकॉर्ड पब्लिकेशन व अखिल दशावतारी पारंपारिक लोककला अकादमी सिंधुदुर्ग यांच्या वतीने आजरा तालुक्यातील देवकांडगाव येथील अजिंक्य आबासो देसाई देसाई यांना “महाराष्ट्र युवा समाज रत्न ” या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुप्रसिद्ध अभिनेते आनंद काळे यांच्या हस्ते करण्यात आलेल्या या सन्मान प्रसंगी निवड समिती अध्यक्ष संदिप राक्षे(सिनेमा निर्माता), शिवकन्या अर्चना पारडे, डॉ. गंगाधर व्हसकोटी, बाळकृष्ण गोरे आदी मान्यवर उपस्थित होते
.रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी शिबिर, ग्रामस्वच्छता अभियान, मतदान जनजागृती, गोरगरिबांना मदत, , गडकोट स्वच्छता व संवर्धन मोहीम , विविध सामाजिक संस्थेत काम, शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, शास्वत विकासाकरिता गाव दत्तक घेवून ग्रामविकास,पाणी फौंडेशनच्या पाणीदार शिवार चळवळीत विशेष काम, राष्ट्रीय सेवा योजनेतील राज्य स्तरावरील शिबीरात सहभाग, वृक्षारोपण ,, सेंद्रिय शेती काळाजी गरज यावर जनजागृती , कोविड काळात सर्व सेवा गरजू लोकांसाठी मिळाव्या यासाठी सर्वतोपरी प्रयत्न, या सारखी विविध कामे अजिंक्य यांनी केली आहेत.
कोरीवडे येथून बारा हजार रुपयांची वाइंडिंग तार लंपास…
कोरिवडे (ता. आजरा) येथून गणपती रामचंद्र कांबळे यांच्या शेतातून ट्रान्सफॉर्मर मध्ये ऑइल मध्ये असलेली अंदाजे 70 किलो इतकी व बारा हजार रुपये किमतीची वाइंडिंग तार अज्ञातांनी लंपास केली आहे.
याबाबतची फिर्याद अभिजीत दादासो दिवटे (वय 36 रा. सुलगाव) यांनी आजरा पोलिसात दिली आहे.

आरोग्य हीच खरी संपत्ती ;जयवंतराव
शिंपी … आजरा येथील आरोग्य शिबिरात 300 जणांची तपासणी

आरोग्याबाबत आजही समाजात अनास्था आहे. महीलांच्या आरोग्याबाबतही फारशी चांगली परिस्थिती नाही. आरोग्याबाबत समाजात जागृती आणावयाची असेल तर शिबीर व विविध माध्यातून समाजाला सजग करायला हवे. कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांनी केले.
येथील ग्रामिण रुग्णालयात स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय, भारत सरकार व राष्ट्रीय आरोग्य अभियान सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व संत गजानन महाराज रुरल हॉस्पिटलच्यावतीने झालेल्या आरोग्य शिबीरात श्री. शिपी यांनी मार्गदर्शन केले. उपनगराध्यक्ष संजीवनी सावंत, गटविकास अधिकारी श्री. डी. वाघ, जिल्हा शल्यचिकित्सक अनिल माळी, प्रभारी वैदयकिय अधिक्षक डा. शिवराज देसाई (कुपेकर), तालुका आरोग्य अधिकारी यशवंत सोनवणे, वैदयकीय अधिकारी डॉ. अशोक फर्नांडिस, डॉ. वृषाली केळकर, डॉ. असिफ बागवान आदी प्रमुख उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले.300 जणांची तपासणी करून त्यांना उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

श्री. शिंपी म्हणाले, या देशात आरोग्याबाबत हेळसांड आहे. शासनाकडून आरोग्याबाबत विविध उपक्रम राबविले जात असले तरी समाजाकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. प्रत्येकाने आपले आरोग्य उत्तम कसे राहील याकडे पाहीले पाहीजेत. त्याचबरोबर कुटुंबाच्या आरोग्याचीही काळजी घेतली पाहीजेत उपनगराध्यक्षा संजीवनी सावंत म्हणाल्या आरोग्य विभागाकडून विविध योजना व आरोग्य सुविधा पुरवल्या जातात याचा लाभ सर्वसामान्य जनतेन घ्यावा. शिबीरात सर्व सुविधा मोफत देण्यात आल्या. आयुष्यमात भारत डिजीटल मिशन अंतर्गत यूनिक हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले. जन आरोग्य अंतर्गत आयुष्यमान भारत कार्डचेही वाटप झाले. यावेळी गरजू रुग्णांना आवश्यकतेनुसार उपचार व शस्त्रक्रिया महात्मा जोतिबा फुले योजनेतंर्गत मोफत देण्यात आल्या.
यावेळी डॉ. सागर तेऊरवाडकर, डॉ.स्वाली इंगवले, अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तंत्रज्ञ मिलिद गुरव यांनी स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. आरोग्य सेवक युनूस सय्यद यांनी आभार मानले.

मंगळवारी २६ रोजी पुनर्वसन प्रश्नी श्रमिक मुक्ती दलाचा मोर्चा…
आजरा तहसीलदार यांना निवेदन
प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत यासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील धरणग्रस्तांचा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदन आज आजरा तहसीलदार यांना देण्यात आले. श्रमुदचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज तहसीलदार विकास अहिर यांची भेट घेऊन त्यांना तसे निवेदन दिले.
यावेळी तहसीलदार आजरा यांनी तात्काळ प्रांताधिकारी यांच्याशी संपर्क करून त्यांच्याच अध्यक्षतेखाली मोर्चा पूर्वी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांसह प्रकल्पग्रस्त प्रतिनिधींची बैठक घेण्याची विनंतीही केली.
उचंगी, सर्फनाला, आंबेओहळ, एरंडोळ, धनगरमोळा यातील प्रकल्पग्रस्तांच्या खालील प्रश्नांचे निवेदन देण्यात आले.
खास बाब प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून त्याचे पैसे उचंगी प्रकल्पग्रस्तांना तातडीने दिले पाहिजेत, संकलन दुरुस्ती करणे, जमीन वाटपाचे आदेश काढणे, पॅकेजचे पैसे देणे, जमीन कसण्यासाठी होत असलेला अडथळा दूर करणे, भूखंडांचे वाटप करणे, एरंडोळ आणि धनगरमोळा येथील प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप करणे, खेडगे गावाला स्वतंत्र्य महसूल गावाचा दर्जा देणे, पारपोली गावठाण या गावाच्या घरांच्या संपादनाची प्रक्रिया योग्य रीतीने वेगाने करणे, घरबांधणी साठी प्रकल्पग्रस्तांना अनुदान देणे, त्याशिवाय रस्ते, नागरी सुविधा इतर अनेक प्रश्न या निवेदनात दिले आहेत. याबाबत निर्णायक चर्चा होऊन कालबध्द कार्यक्रम मिळावा यासाठी हा मोर्चा निघणार आहे.
निवेदनावर कॉ संपत देसाई, दशरथ घुरे, प्रकाश मोरुस्कर, हरी सावंत, नारायण भडांगे, अनिल अमूनेकर, गोविंद पाटील, सचिन पावले, भीमराव माधव, विष्णू मांजरेकर, शिवाजी येजरे इत्यादींच्या सह्या आहेत.

आजरा तालुक्यातील ठीक – ठिकाणी जोरदार पाऊस
उत्तूर, मडिलगे सह आजरा तालुकयामध्ये ठीक- ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. मंगळवारी रात्री अचानक पणे पावसाने हजेरी लावली विजांच्या कडकडाटासह तालुक्यामध्ये बर्यापैकी पाऊस आला पावसामुळे सुमारे तासभर वीज पुरवठाही खंडित झाला होता.आजरा शहरांमध्ये मात्र पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या.




