mrityunjaymahanews
गुन्हाठळक बातम्याराजकीय

उचंगी प्रकल्पग्रस्त व प्रशासकीय यंत्रणेत धुमश्चक्री…लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

उचंगी प्रकल्पस्थळी कार्यकर्ते व प्रशासकीय यंत्रणेत धुमश्चक्री…
प्रशासनाच्या लेखी हमीनंतर आंदोलन स्थगित

आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असताना अद्यापही पुनर्वसनाचे काही प्रश्न कायम असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य प्रकल्प व धरणग्रस्त परिषदेच्यावतीने सदर प्रकल्पाचे काम बंद करण्याचा प्रयत्न केला गेला .या वेळी प्रकल्पग्रस्त स्त्री पुरूष कार्यकर्ते व प्रशासन यामध्ये धुमश्चक्री झाली. प्रशासनाच्यावतीने विभागीय अधिकारी वसुधा बारवे यांनी प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून सकारात्मक प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले .प्रकल्पग्रस्त कार्यकर्ते व प्रशासनातील  अधिकारी  यांच्यात  झालेल्या चर्चेनंतर काही कालावधीकरिता प्रकल्पाचे काम बंद ठेवण्यात आले . त्यानंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी प्रशासनाकडून प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांविषयी सोडवणुकीसंदर्भात लेखी हमी देण्यात आली
आंदोलनकर्त्यांना अटक करण्याचा प्रयत्नही प्रशासनाने केला .आम्हाला अटक करून प्रश्न सुटणार असतील तर आम्हाला जरूर अटक करा त्यास आमची कोणतीही हरकत नाही अशी भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतली. अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेवेळी बाेलताना कॉम्रेड अशोक जाधव म्हणाले ,प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे .अशावेळी प्रलंबित प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे. शेतकर्यांना पैसे जमा असे, कागदपत्रे जमा करा असे सांगून वेळ मारून नेली जात आहे. .प्रकल्पग्रस्त शेतक-यांवर कोणत्याही प्रकारचा अविश्वास दाखवू नका. या सर्व शेतकर्यांचे प्रकल्पामध्ये मोठे योगदान असल्याने त्यांना सन्मानाची वागणूक द्या. पोलीस खात्याच्या व प्रशासनाच्या आड लपून शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक देण्याचा प्रयत्न करू नये.
एकीकडे उचंगी मध्ये पाणी तुंबवणे हे राष्ट्रीय काम आहे असे म्हटले  जात आहे. असे म्हणणाऱ्या  अधिका -यांचे नेमके काय चालले आहे ? हे सांगण्याची वेळ देऊ नका असेही त्यांनी सांगितले.
कॉ. संजय तर्डेकर यांनी यावेळी आक्रमक भूमिका घेत प्रकल्पाच्या दिशेने धाव घेतली या वेळी पोलिसांनी त्यांना अटकाव केला.प्रशासनाच्या वतीने प्रलंबित मुद्द्यांबाबत लेखी हमी दिल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले .

 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या

१. संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक द्यावी. पोलीस खात्याच्या व प्रशासनाच्या आड लपून शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक देण्याचा प्रयत्न करू नये .
२.प्रकल्पाचे ठेकेदार/ कंत्राटदार  यांना बदलावे.
३.ज्या कारणासाठी रस्ता मान्य करण्यात आला आहे तो पावसाळ्याच्या आधी त्वरित करावा.रस्त्याअभावी शेतकऱ्यांनी शेती करण्यामध्ये अडथळा आल्यास त्याची योग्य ती नुकसानभरपाई मिळावी.

या मुद्द्यावर दिले प्रशासनाने लेखी आश्वासन

१.प्रकल्प स्थळाच्या उजव्या तीरावरील रस्त्याच्या प्रत्यक्ष कामास मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरवात करण्यात येईल व रस्ता वर्दळीयोग्य करण्यात येईल .
२.चितळे जेऊर येथील गायरान जमिनीचे मे महिना अखेरपर्यंत सपाटीकरण करण्यात येईल .
३.शिल्लक जमीन असणा-या तेरा शेतकर्‍याकडून आवश्यक शुल्क भरून जमिनींची संयुक्त मोजणी करण्यात येईल.
४. रस्ता व गायरान सपाटीकरणाच्या अपूर्ण कामामुळे शेतक-याचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल.

यावेळी झालेल्या चर्चेत उपविभागीय अधिकारी वसुधा बारवे विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र नवले, तहसीलदार विकास अहिर,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारूगडे आदींनी प्रशासनाच्या वतीने भाग घेतला.यावेळी दत्तू बापट, निवृत्‍ती बापट, गोपाळ ठाकर, पांडुरंग धनुकटेकर, मारुती चव्हाण यांच्यासह प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

 

विजेच्या धक्क्याने प्रशांत कानडे याचा मृत्यू

शिरसंगी (ता. आजरा) येथील माजी उपसरपंच प्रकाश कानडे यांचे चिरंजीव प्रशांत कानडे (वय 22) यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. शेतातील मोटर चालू करण्यासाठी ते गेले असता त्यांना विजेचा धक्का लागला.

प्रशांत यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या मित्रपरिवारासह शिरसंगी ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

बहिरेवाडीत पुन्हा मारामारी…सहा जणांविरोधात गुन्हा नोंद

महिनाभरापूर्वी झालेल्या मारामारीचे पडसाद बहिरेवाडी (ता. आजरा) येथे पुन्हा उमटले असून  पुन्हा एक वेळ नाईक कुटुंबीयांमध्ये मारामारीचा प्रकार घडला. या प्रकरणी शोभा गुंडू नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

यामध्ये तानाजी गणपतराव नाईक, राजू गणपतराव नाईकग् गोपाळ जयसिंग नाईक, महादेव शिवाजी नाईक, सखूबाई शिवाजी नाईक, अनिता तानाजी नाईक यांचा समावेश आहे.

गवसेच्या रवळनाथ मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी 50 लाख रुपये देणार………
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा….

मंदिराचा कलशारोहण समारंभ उत्साहात……..

गवसे ता. आजरा येथील ग्रामदैवत श्री. रवळनाथ मंदिर परिसराचे सुशोभिकरणासह गावातील विकास कामांसाठी ५० लाख रुपये निधी देणार असल्याची प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
ग्रामस्थांच्या लोकनिधीतून बांधलेल्या मंदिराचा कलशारोहण समारंभ झाला. मंत्री मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. वामन पाटील होते.
भाषणात मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, गवसे येथील श्री रवळनाथ देवालय हे या परिसरातील जागृत देवस्थान म्हणून लौकिक आहे. ४० लाख रुपये लोकवर्गणीतून बांधलेले मंदिर व ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद आहे असेही ते म्हणाले.


“तर अधिक भाग्यवान………”
येथील प्राचार्य लक्ष्मण पाटील म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे नेतृत्व सर्वसमावेशक व सर्वांगीण कल्याणकारी आहे. आमचे गाव त्यांच्या मतदारसंघात असते तर आम्ही अधिक भाग्यवान ठरलो असतो. मतदारसंघात गाव नसूनही त्यांनी या गावासाठी दाखवलेली आत्मीयता व आपुलकी मोठी आहे.

यावेळी आजरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई, के.डी.सी.सी. संचालक सुधीर देसाई, माजी सभापती उदय पवार, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिकेत कवळेकर, राजू होलम, सौ. रचना होलम, वामन पाटील, महादेव हेबाळकर, पांडुरंग पाटील, लक्ष्मण पाटील, शिवाजी पाटील, सहदेव नेवगे, तातोबा पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

शरद शेट्टी यांचे निधन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!