रविवार दि.४ जानेवारी २०२६


उत्तूर जि. प. मतदारसंघातील प्रत्येक गावात विकास गंगा आणणार – मंत्री हसन मुश्रीफ

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यात जि. प. मतदारसंघ कमी झाल्याने चंदगड, भुदरगड व राधानगरी मतदारसंघातील १४ गावे वाढली आहेत. या प्रत्येक गावात प्रत्यक्ष भेट देऊन समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. राष्ट्रवादी (अजित पवार) जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी बांधकाम कामगारांना संसारोपयोगी साहित्य वाटप तसेच संजय गांधी योजनेअंतर्गत पेन्शन मंजुरीची पत्रे वितरित करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे माजी अध्यक्ष वसंतराव धुरे होते.
मंत्री मुश्रीफ यांनी विविध खात्यांच्या कार्यकाळातील कामांचा आढावा घेत जि. प. व पंचायत समिती निवडणुकीत मतभेद विसरून राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक सुधीर देसाई, वसंतराव धुरे, काशिनाथ तेली, संभाजीराव तांबेकर, गणपतराव सांगले, संजय येजरे, विश्वासराव देसाई, मारुतराव घोरपडे, दीपक देसाई, एम के देसाई, राजू मुरकुटे, उत्तम रेडेकर, विकास चोथे, महादेव पाटील, बबन पाटील, सुधीर सावंत, सुनील दिवटे, विजय वांगणेकर, सागर सरोळकर, सचिन पावले, शंकर पावले, सुनील देसाई, भूषण नाधवडेकर, आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
सूत्रसंचालन गणपतराव सांगले यांनी तर आभार संजय येजरे यांनी मानले.

जि.प.करीता शिरीष देसाई यांचे उमेदवारी जाहीर…
मेळाव्याच्या निमित्ताने मंत्री मुश्रीफ यांनी जि. प. व पंचायत समिती निवडणुकीचे रणशिंग फुंकले. उत्तूर जि. प. मतदारसंघासाठी शिरीष देसाई व पंचायत समितीसाठी बहिरेवाडीचे विकास चोथे यांची राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली.

आमदार शिवाजी पाटील यांचा आज पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघात दौरा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जिल्हा परिषद निवडणुका व विविध विकास कामांच्या उद्घाटन पार्श्वभूमीवर आमदार शिवाजीराव पाटील यांचा आज रविवारी पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघामध्ये दौरा होणार आहे. या दौऱ्यामध्ये ते दुपारी चार नंतर सरंबळवाडी, मलिग्रे,किणे, यमेकोंड, मोरेवाडी /धनगर वाडा होनेवाडी येथे भेट देणार आहेत.

तुळशीराम मुळीक यांचा आज अमृत महोत्सव कार्यक्रम…

माजी ग्राम विकास अधिकारी व कोल्हापूर जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे माजी अध्यक्ष श्री. तुळशीराम भैरु मुळीक यांचा अमृत महोत्सव समारंभ आत्मचरित्र व गौरव अंक प्रकाशन सोहळा
वेळ : सकाळी दहा वाजता
स्थळ : उत्तूर – आजरा- आंबोली मार्गावरील हॉटेल रविराज
प्रमुख उपस्थिती : गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी, श्री सिद्धेश्वर श्री क्षेत्र कारीमठ, हत्तरगी, श्री. काशिनाथ महास्वामीजी, विरक्त मठ घोडगेरी ता. हुक्केरी, वैद्यकीय शिक्षण मंत्री नाम. हसन मुश्रीफ मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, शाहू ग्रुप अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे, माजी आमदार राजेश पाटील, गोकुळ संचालिका अंजनाताई रेडेकर, आजरा नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी

निधन वार्ता
गोविंद कुंभार
सिरसंगी येथील रहिवासी गोविंद परसू कुंभार ( वय ८० वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे ,मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
हनुमान दूध संस्थेचे सचिव संजय कुंभार यांचे ते वडील होत. रक्षा विसर्जन सोमवार दिनांक ५ रोजी होईल.
येसूबाई कांबळे

सिरसंगी येथील रहिवासी येसूबाई कृष्णा कांबळे ( वय ६८ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगी एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे.

पं. दीनदयाळ विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पंडित दीनदयाळ विद्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन माजी विद्यार्थिनी (मुक्ता पेंडसे – पुणे) यांच्या हस्ते करण्यात आले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याची माहिती विजय राजोपाध्ये यांनी सांगितली. कार्यक्रमासाठी शिक्षक, विद्यार्थी ,विद्यार्थिनी उपस्थित होते.

विशेष सूचना…
मृत्युंजय महान्यूजच्या बातम्या बऱ्याच वेळा link ओपन होत नसल्याने पहावयास मिळत नाहीत अशा तक्रारी येत आहेत. याकरिता कृपया आपल्याकडे 96 37 59 88 66 हा नंबर “मृत्युंजय महान्यूज’ या नावाने save असणे गरजेचे आहे. सदर नंबर आपल्याकडे save नसल्यास आपणाला बातम्या ओपन करताना अडचण येईल. नंबर save करूनही ज्यांना बातम्या मिळणार नाहीत त्यांच्याकरता या नंबरच्या व्हाट्सअप स्टेटस वर बातम्यांची लिंक टाकण्याची व्यवस्था केली आहे. याचबरोबर jyotiprasad savant या Facebook account वरही बातम्या link द्वारे पहावयास मिळतील. बरेच मोबाईल नंबर मृत्युंजय महान्यूजकडे save आहेत परंतु संबंधितांकडे मृत्युंजय महान्यूज चा नंबर save नसल्याने अशा वाचकांना लिंक पाठवल्यास व्हाट्सअप अकाउंट बंद होत आहे. असा व्हाट्सअप ने नवीन नियम केला आहे.
यापुढे हळूहळू ग्रुप वर बातम्या लिंक पाठवणे बंद/कमी केले जाणार आहे. कृपया सर्वांनी याची नोंद घ्यावी.
…मुख्य संपादक

‘व्यंकटराव’ येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज व्यंकटराव शिक्षण संकुलात त्यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य श्री.एम.एम.नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे. शेलार, सौ.व्ही.ए. वडवळेकर, श्री.एम.एस. शिंपी, व श्रीम.एम. व्ही.बिल्ले यांच्यामार्फत करण्यात आले.
श्रीम.एम.व्ही.बिल्ले व विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर आपल्या मनोगतातून प्रकाश टाकला. समाजसेवेची व्रत हाती घेतलेले महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई या पती-पत्नींनी स्त्रियांचे शिक्षण व्हावे म्हणून अहोरात्र घेतलेले कष्ट व त्यांच्या या धाडसी कृत्याने आज मुली व स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. हे सावित्रबाईंचे ऋण आहेत असे स्पष्ट केले
या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
आज शहरात…
श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर, आजरा यांच्या वतीने जैवतंत्रज्ञान शास्त्रज्ञ डॉ. विश्वास बापट यांचे ‘वनस्पती: बहुमूल्य बहुगुणी वरदान” या विषयावर व्याख्यान व माता गौरव पुरस्काराचे वितरण
वेळ : सायंकाळी ५.३० वाजता
स्थळ : ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत स्मृती दालन


