


आजरा साखर कारखान्यासाठी गुरुवारी ३८ जणांचे ४१ अर्ज…
आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

◼️आजरा : प्रतिनिधी◼️
आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी ३९ जणांनी ४१ अर्ज दाखल केले आहेत. गुरूवार अखेर एकूण १०३ उमेदवारांनी १०९ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
आज शुक्रवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज अर्ज दाखल करण्यासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन व गर्दी होणार हे स्पष्ट आहे.दाखल अर्ज पुढीलप्रमाणे….
गट क्र.१ (उत्तुर-मडीलगे)
१) संजय शेणगावे
२)प्रकाश चव्हाण
३) दिपक देसाई
४)मारुती घोरपडे
५)शिरीष देसाई
६) भिकाजी गुरव
७) सदानंद पाटील
गट नं २ (आजरा- श्रृंगारवाडी)
१) युवराज पोवार
२) दिगंबर देसाई
३) अशोक चराटी
४) जी.वाय.देसाई
५) जयवंतराव शिंपी
६) विलास नाईक
७) राजाराम होलम
८) विजय देसाई
९) शिवाजी नांदवडेकर
१०)अभिषेक शिंपी (दोन अर्ज)
११) सुभाष देसाई
१२) प्रकाश बुडके
१३) महादेव होडगे
१४) तुळसप्पा पोबार
१५) विश्वास गाईंगडे
१६) बाबुराव नार्वेकर
१७) अबूताहेर तकीलदार
१८) रशीद पठाण

गट नं ३ ( पेरणोली – गवसे)
१) उदयसिंह पोवार
२) सहदेव नेवगे
३) दशरथ अमृते
४) सदाशिव डेळेकर
५) गोविंद नारायण पाटील
६) मुकूंद तानवडे
७) अजिंक्य मुकुंद तानवडे
८) रामचंद्र पाटील
९)जोतिबा चाळके
१०) रणजीत देसाई
११) संग्राम तानवडे
१२) प्रकाश पाटील
१३) राजेंद्रसिंह सावंत
१४) शिवाजी पाटील
१५) सर्जेराव देसाई (२ अर्ज)
१६) इंद्रजीत देसाई
१७) कॉ.शांताराम पाटील
१८) शामराव बोलके
१९)तुकाराम गावडे
गट नं ४ (भादवण- गजरगांव)
१) एम.के.देसाई
२) संजय मारुती पाटील
३) सुधीरकुमार पाटील
४)राजेंद्र मुरकुटे
५)मनोहर पाटील
६)शिवाजी कुराडे
७)आनंदराव कुलकर्णी
८) भीवा जाधव
९) आनंदा जोशीलकर
१०) डॉ. गोपाळ केसरकर
११) राजेश जोशीलकर
गट नं ५ (हात्तिवडे मलिग्रे)
१) आनंदराव बुगडे
२) विष्णूपंत केसरकर (२ अर्ज)
४) शंकर रावळु उगाडे
५) सदाशिव माणगांवकर
६)संभाजी पाटील/हत्तिवडे
७) अनिल फडके
८)शिवाजी लाड
९)तानाजी राजाराम
१०)सुरेश सावंत
११) गोविंद नारळकर
१२) सूर्यकांत रेडेकर
१३) राजाराम जाधव
१४)पांडुरंग हरेर(२ अर्ज)

इतर मागासवर्गीय प्रतिनिधी:-
१)गोविंद नारायण पाटील
२)जनार्दन टोपले(२अर्ज)
३)राजेंद्र मुरकुटे
४)अभिषेक शिंपी
५)अबुताहेर तकीलदर
६)काशिनाथ तेली
७)रशीद पठाण
महिला राखीव-
१)सुनिता रेडेकर
२) रचना होलम(२अर्ज)
३)सुजाता पाटील
४)संगीता माडभगत
५)रेखा राजाराम
६) सुमित्रा दीपक देसाई
७)चेतना देसाई
अनुसूचित जाती जमाती –
१)मलिककुमार बुरुड (२अर्ज)
२)दिनेश कांबळे
३)अशोक कांबळे
४)गोविंद जाधव
५) किरण कांबळे
६)भाऊसो कांबळे
७)शिवाजी कांबळे
८) हरीबा कांबळे
भटक्या विमुक्त जाती- जमाती
१) संभाजी पाटील
२)कल्लाप्पा नाईक(२ अर्ज)
३) मालुबाई गवळी
४)बयाजी मिसाळ
इतर संस्था गट-
१)नामदेव नार्वेकर
२)नौशाद बुड्डेखान ३)संतोष भादवणकर ४)अशोक तर्डेकर

हरीभाऊंची हालगी कडाडली

आज अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये पेरणोलीच्या हरीबा कांबळे यांचे शक्तिप्रदर्शन लक्षवेधी ठरले.
हालगीच्या निनादात छ.शिवाजी महाराज पुतळा ते तहसील कार्यालयापर्यंत येऊन उमेदवारी अर्ज दाखल केला.
चेअरमन प्रा. शिंत्रे आज दाखल करणार अर्ज
कारखान्याचे विद्यमान चेअरमन प्रा. सुनील शिंत्रे आज (शुक्रवारी) शक्ती प्रदर्शनाने अर्ज दाखल करणार आहेत. विद्यमान संचालकंपैकी अन्य काही मंडळी ही आज अर्ज दाखल करणार असल्याचे समजते.


‘ त्यांच्या ‘ दिवाळीला गंगापूरे ट्रस्टची साथ…

◼️आजरा : प्रतिनिधी◼️
‘ आहे रे ‘ वाल्यांनी ‘ नाही रे ‘ वाल्यांना करावी मदत अशा स्वरुपाचा उपक्रम उत्तुर येथे कांही वर्षांपूर्वी हॉटेल कोल्हापुरी नावाने चालू केलेल्या लहानशा हॉटेलमधुन सुरू करून सामाजिक कार्यकर्ते अशोक तोरस्कर व भैरू सावंत यांनी चालू केला. हॉटेलमध्ये चहा पिताना ज्या गरीबांना चहासाठी पैसे नाहीत अशा गरिबांना मदत करू इच्छिणाऱ्या लोकांनी कुपन देऊन चहा पिण्यासाठी मदत करावी असा उपक्रम माणुसकीची भिंत नावाने चालू केला.
याच स्वरुपाचा, याच धर्तीवर सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गुरव यांनी जनसेवा सामाजिक संस्थेच्या वतीने समाजातील अतिशय गरीब,अपंग,अनाथ, गंभीर आजाराने पीडित कुटुंबातील मुलांना शालेय साहित्य, दिवाळीच्या सणाला कपडे दानशूर व्यक्तींच्या मदतीने देण्याचा उपक्रम चालू केला आहे. हे काम अनेक वर्ष गोपनीयता पाळून केली जात आहे.
यावर्षीच्या दिवाळीमध्ये कै.रामचंद्र गणपती गंगापुरे ट्रस्ट, उत्तुर यांनी या उपक्रमाला प्रतिसाद देत एक हात काम करताना गमावलेल्या नेताजी साठे या अपंगाच्या दोन मुलांना व इतर काही गरजू अतिशय हलाखीच्या कुटुंबातील मुलांना कपडे देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे काम केले आहे.
दिवाळीला नवीन कपडे घालून मिरवणारी मुलं पाहून अतिशय गरीब मुलांना मात्र कोणीतरी दिलेले जुने -पुराने कपडे घालून सण साजरा करावा लागतो. हे अतिशय वाईट आहे. सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गुरव यांनी प्रत्यक्ष कांहीं कुटुंबांना भेटी दिल्याने त्यांच्या लक्षात हे आले. त्यावेळीपासून हा उपक्रम चालू आहे अशा गरीब कुटुंबातील मुलांच्यासाठी मदतीचे हात पुढे येणे गरजेचे आहे त्यासाठी समाजातील कांहीं दानशूर व सामाजिक भावनेने मदत करतील अशा व्यक्तींकडे गोरगरीब मुलांसाठी मदतीचे आवाहन करून त्यांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
समाजातील गरीब श्रीमंतीची दरी कमी करण्यासाठी ‘ आहे रे ‘ वर्गाने ‘ नाही रे ‘ वर्गासाठी थोडी मदत केल्यास गोरगरीब मुलांच्या चेहऱ्यावर फुलणारा आनंद खूप मोठा असतो. त्यामुळे हा उपक्रम यापुढेही असाच चालू ठेवणार असून समाजातील अजून खूप गरजू आपल्या आजूबाजूला असतात त्यांच्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे व त्यांना मदत करावी असे आवाहन शिवाजी गुरव यांनी केले आहे.


आजरा महाविद्यालयात ‘ रोजगार कौशल्य प्रशिक्षण ‘

◼️आजरा : प्रतिनिधी◼️
जनता एज्युकेशन सोसायटी, आजरा संचालित, आजरा महाविद्यालय आजरा येथे तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर सायन्स (संगणकशास्त्र) विभागाच्या वतीने दिनांक २ नोव्हेंबर २०२३ ते ७ नोव्हेंबर २०२३ पर्यंत ‘Employability Enhancement’ हा प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला.
नांदी फौन्डेशन महाराष्ट्र यांच्या महिंद्रा प्राईड क्लासरूम या प्रकल्पाच्या माध्यमातून या सहा दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करणेत आले. या प्रशिक्षण वर्गाच्या माध्यामातून विद्यार्थीनीना रोजगार प्राप्त करण्यासाठी आवश्यक त्या सर्व कौशल्यांचा वृद्धीसाठी प्रशिक्षित केले गेले. नांदी फौन्डेशन च्या उत्तर-पश्चिम प्रादेशिक व्यवस्थापक श्रीमती सीमा भागवत, प्रशिक्षण समन्वयक पंकज दंडगे आणि प्रशिक्षक चिन्मय अभंगराव यांच्या विशेष प्रयत्नातून हा प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला.
या प्रशिक्षणातून सहभागी विद्यार्थिनींचे कौशल्य विकसित होऊन भविष्यात व्यवसाय व नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.



जनता गृहतारणकडून सभासदांना ११ टक्के लाभांश व कर्मचाऱ्यांना बोनस

◼️आजरा: प्रतिनिधी◼️
आजरा येथील जनता सहकारी गृहतारण संस्थेकडून सभासदाना ११ टक्के लाभांश आणि कर्मचाऱ्यांना १६.६६ टक्के (दोन पगार) दिवाळी बोनस भेट देण्यात आली. त्याचबरोबर सभासदांच्या खात्यावर लाभांश रक्कम जमा करण्यात आली आहे. अशी माहीती संस्थेचे अध्यक्ष मारुती मोरे यांनी दिली.
अध्यक्ष मोरे म्हणाले, संस्थेच्या प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान लक्षात घेवून संस्थेकडून दोन पगार इतका दिवाळी बोनस, ड्रेस कोड आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. ही संस्था घरकुल उभी करीत नाही, तर माणसं उभी करते. घराला घरपण देते. त्यामुळे माणसं जोडणारी संस्था म्हणून ही संस्था ओळखली जाते. ही संस्था सभासदांच्या पाठीशी उभी आहे. संस्थेने सभासद, ठेवीदार आणि कर्जदार यांच्याशी जिव्हाळ्याचं, आपुलकीचं आणि विश्वासाचं नात जपत संस्थेने पन्नास कोटी ठेवींचा टप्पा गाठला आहे.
संस्थेने दिवाळीच्या मुहुर्तावर मुदत बंद ठेव खात्याला १२ महीनेसाठी ९ टक्के व्याजदर केला आहे. शासकीय, निमशासकीय कर्माचाऱ्यांना कर्जपुरवठा केला जातो. संस्थेने ५४ कोटींच्या कर्जाचे वाटप केले आहे. घर किंवा प्लॉट खरेदी, घरबांधणी, वाढीव बांधकाम, घर दुरुस्ती करीता एक कोटीपर्यंत २० वर्ष मुदतीकरीता सुलभ व्याज दराने संस्था कर्जपुरवठा करीत आहे.
यावेळी संचालक डॉ. अशोक बाचूळकर, डॉ. तानाजी कांबळे, प्रा. विनायक चव्हाण, मुख्य व्यवस्थापक मधुकर खवरे, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



श्री नुतन नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध…

◼️आजरा : प्रतिनिधी◼️
श्री नुतन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सुळेरानची प॓चवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली.
नूतन पदाधिकारी पुढील प्रमाणे….
चेअरमन – सौ.सरस्वती जोतीबा शेटगे
व्हा.चेअरमन- श्री. रत्नाकर भैरू कांबळे
संचालक मंडळ :-
जयसिंग सतुराम नेवगे
विष्णू भाऊ पाटील
अशोक विष्णू शेटगे
आनंदा मारूती पाटील
दिपक तुकाराम पाटकर
बाबुराव तुकाराम सांबरेकर
उत्तम तुकाराम माडभगत
सौ.सरस्वती महादेव पोवात
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून
प्रमोद फडणवीस यांनी काम पाहिले.




