mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

 मंगळवार  दि.३ डिसेंबर २०२४              

साहेब पराभूत…
कार्यकर्ता फिरत आहे अनवाणी…

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      विधानसभा निवडणूक निकाल संदर्भात लावलेल्या पैजा अनेक जणांच्या अंगलट आल्या  असून साहेब निवडून आले नाहीत तर पायात चप्पल घालणार नाही… असा पण केलेल्या आजरा साखर कारखान्याचे संचालक हरिबा कांबळे यांना निकालानंतर मात्र अनवाणी फिरण्याची वेळ आली आहे.

       विधानसभा निवडणुकीच्या वेळी भुदरगड- राधानगरी मतदार संघातून माजी आमदार के. पी. पाटील विजयी झाले नाहीत तर पायात चप्पल न घालण्याचा निर्धार कांबळे यांनी केला होता. या निवडणुकीत पाटील हे पराभूत झाले त्यामुळे कांबळे हे सध्या पायात चप्पल न घालता सर्वत्र फिरत आहेत.

      नेत्यावरील प्रेमापोटी कांबळे यांनी केलेला हा निर्धार व त्या निर्धाराची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना त्यांना बसणारे चटके हा सध्या तालुक्यात चर्चेचा विषय आहे. आता नेत्यानेच याप्रकरणी कांबळे यांची समजूत घालण्याची गरज निर्माण झाली आहे.

ढगाळ वातावरण… शेतकरी चिंतेत

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       तालुक्यात कडाक्याची थंडी सुरू असतानाच दोन दिवसापासून ढगाळ वातावरणाची निर्मिती झाल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. काही ठिकाणी अत्यंत हलका असा पाऊस झाला आहे.

       सध्या तालुक्यात भात मळणी व नाचणी कापणी-मळणीची धांदल सुरू आहे. त्यात ढगाळ वातावरमूळे पावसाचे सावट गडद झाल्याने सुगी पावसात सापडण्याची भिती निर्माण झाली आहे. काही शेतकऱ्यांनी भात घरी आणून गवत वाळत घातले आहे. तर काहींनी शिवारातील भात मळण्यास सुरवात केली आहे.

      अवकाळी पावसामुळे यावर्षी सुगीला विलंब झाला. तर नाचणी कापणी-मळणीलाही विलंब झाला आहे. दोन दिवसापासून ढगाळ वातावरण तयार झाल्याने शेतकऱ्यांना धान्य घरी आणण्याची गडबड लागली आहे.

      काही ठिकाणी अत्यंत तुरळक स्वरूपाचा पाऊस पडला आहे.

आजरा हायस्कूलमध्ये कायदेविषयक जनजागृती शिबीर

            आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा हायस्कूलमध्ये कायदेविषयक जनजागृ‌ती शिबीर झाले. दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आजरा, तालुका विधी सेवा समिती आजरा, वकिल बार असोसिएशन आजरा व आजरा हायस्कूल यांच्यावतीने आयोजन केले होते. आजरा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. एस. एम. देशपांडे यांनी मूलभूत तत्वे व जबाबदारी या विषयी तर ॲड. रमेश शामराव चव्हाण यांनी बालहक्क व कायदे या विषयी मार्गदर्शन केले. ॲड. सिध्देश अशोक पारपोलक राष्ट्रीय शिक्षक दिन याविषयी माहीती दिली.

      आजरा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. एस. एम. देशपांडे, उपाध्यक्ष जी. जे. पाटील, सेक्रेटरी एल. पी. पाटील, सदस्य डी डी आजगेकर, एस. एस. इजल, ॲड. रमेश शामराव चव्हाण, अशॲड. सिध्देश अशोक पारपोलकर, मुख्याध्यापक एस. पी. होलम,उपमुख्याध्यापक ए. एस. तोडकर, शिक्षक व वि‌द्यार्थी उपस्थित होते.

      एस. एस. पाटील यानी सुत्रसंचालन व आभार मानले.

कधी व कोठे होणार महाकुंभमेळा…?

       उत्तर प्रदेशमध्ये महा कुंभमेळ्याची जोरदार तयारी सध्या पाहायला मिळत आहे. १२ वर्षांपूर्वी प्रयागराज जिल्हा व्यवस्थापनाकडून या महा कुंभ मेळ्याची व्यवस्था करण्यात आली होती. पण यावेळी या कुंभ मेळ्यासाठी स्वतंत्र जिल्ह्याचीच घोषणा करण्यात आली आहे. या जिल्ह्याचं नावदेखील ‘महा कुंभ मेळा’ असंच करण्यात आलं आहे. या जिल्ह्याचं व्यवस्थापन कुंभ मेळा व्यवस्थापन पदाधिकाऱ्यांकडूनच केलं जाणार आहे.

      तब्बल १२ वर्षांनी एकदा होणाऱ्या या महा कुंभ मेळ्याची फक्त भारतातीलच नव्हे, तर विदेशातीलही भाविक मोठ्या आतुरतेनं वाट पाहात असतात. कोट्यवधी भाविक या कुंभ मेळ्याला हजेरी लावत असतात. १२ वर्षांपूर्वी झालेल्या मेळाव्याला काही कोटी भाविकांनी हजेरी लावली होती. यावेळीही ही संख्या तब्बल १० कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत असून या काळात सुरक्षा व्यवस्थेसाठीही चोख बंदोबस्ताच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून पावलं उचलली जात आहेत.

            कधी होणार महा कुंभ मेळा?

पुढील वर्षी फेब्रुवारी व मार्च महिन्यात यंदाचा महा कुंभ मेळा होणार आहे. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी असा ४४ दिवस महा कुंभ मेळा चालणार आहे. यासाठी नव्याने तयार करण्यात आलेला महा कुंभ मेळा जिल्हा जवळपास ६ हेक्टर परिसरामध्ये उभारण्यात येत आहे. त्यातील ४ हजार हेक्टरमध्ये प्रत्यक्ष कुंभ मेळ्याचं आयोजन होईल, तर १९०० हेक्टर परिसरामध्ये वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था केली जाईल, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

           सुरक्षेची चोख उपाययोजना

महा कुंभ मेळा म्हणजे शाही स्नान हे समीकरण भाविकांसाठी ठरलेलंच आहे. शाही स्नानाला मोठं महत्त्व असल्याचं मानलं जातं. त्यामुळे या काळात गंगा नदीवर लाखोंच्या संख्येनं भाविक शाही स्नान करतात. अशावेळी कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी पोलिसांसोबतच अंडरवॉटर ड्रोनचीही व्यवस्था करण्यात आली आहे. हे ड्रोन ३०० मीटरपर्यंतच्या खोलीवरचा माग काढू शकतात.

          शाही स्नानासाठी महत्त्वाच्या तारखा…

प्रयागराज जिल्हा प्रशासनाकडून महा कुंभ मेळ्यात शाही स्नानासाठी महत्त्वाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या तारखांवेळी जास्त गर्दी होणार हे गृहीत धरून त्यानुसार व्यवस्थापन व सुरक्षेचा बंदोबस्त करण्यात आला आहे.

१. १३ जानेवारी २०२५ – पौष पौर्णिमा
२. १४ जानेवारी २०२५ – मकर संक्रात
३. २९ जानेवारी २०२५ – मौनी अमावस्या (सोमवती)
४. ३ फेब्रुवारी २०२५ – वसंत पंचमी
५. १२ फेब्रुवारी २०२५ – माघी पौर्णिमा
६. २६ फेब्रुवारी २०२५ – महाशिवरात्र

        माहितीसाठी कुठे संपर्क करायचा?

अतिरिक्त माहितीसाठी प्रयागराज जिल्हा व्यवस्थापनानं संपर्क व्यवस्था सुरू केली असून त्यात फोन नंबरदेखील देण्यात आले आहेत. त्यानुसार ०५३२२५०४०११ व १५३२२५००७७५ हे दोन क्रमांक प्रयागराज जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर देण्यात आले आहेत.

(News Source:online news)

निधन वार्ता 

मंगल माईनकर


      मडीलगे तालुका आजरा येथील सौ.मंगल गणपती माईनकर (वय ६० वर्षे) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले.

      त्यांच्या पश्चात पती,एक विवाहित मुलगा, दोन मुली, जावई, सून नातवंडे असा परिवार आह

      अंत्यविधी आज मंगळवारी सकाळी ९ वाजता करण्यात येणार आहेत.

जनाबाई भादवणकर

      मुरुडे ता. आजरा येथील जनाबाई नारायणा भादवणकर (वय ८५ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

       त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, मुलगी सूना, नातवंडे असा परिवार आहे सूर्यकांत व कृष्णकांत भादवणकर यांच्या त्या आई होत.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

लक्ष्मीपूजन पडले चोरट्यांच्या पथ्यावर…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

वर्गणी काढून पैसे देतो परंतु व्हीक्टोरिया पुलावरील खड्डे तातडीने मुजवा….आजऱ्यात मनसेचे रास्ता रोको.. हाजगोळी बुद्रुक येथे केला हत्तीने लॉंग केला…आजरा साखर कारखान्यावर वसंत भोसले यांचे व्याख्यान

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!