mrityunjaymahanews
अन्य

आजरा अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी रमेश कुरुणकर

आजरा अर्बन बँकेच्या चेअरमनपदी श्री. रमेश  कुरुणकर व व्हा. चेअरमनपदी श्री. सुनिल मगदूम यांची निवड

            दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि., आजरा (मल्टी-स्टेट) या बँकेच्या चेअरमनपदी श्री. रमेश गुरुलिंगआप्पा कुरुणकर व व्हाईस चेअरमनपदी श्री. सुनिल शिवाजीराव मगदूम यांची एकमताने निवड करुन बँकेच्या संचालक मंडळाने यापुर्वीची बिनविरोध निवडीची परंपरा कायम राखलेली आहे.

       याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. अरुण काकडेसो (विभागीय उपनिबंधक कोल्हापूर विभाग) यांनी काम पाहीले. याप्रसंगी बँकेचे जेष्ठ संचालक व अण्णा भाऊ संस्था समुहाचे प्रमुख  श्री. अशोकअण्णा चराटी उपस्थित होते, त्यांनी बँकेच्या नुतन चेअरमन, व्हा.चेअरमन व सर्व संचालकांनी बँकेच्या प्रगतीच्या व ग्राहकाभिमुख जलद सेवा देणेच्या दृष्टीने एकमेकांना विश्वासात घेवून कामकाज करुन बँकेचा नावलौकीक वाढवावा असे मार्गदर्शन केले. 

        चेअरमन पदासाठी श्री. रमेश  कुरुणकर यांचे नांव श्री. अशोक  चराटी यांनी सुचविले. त्यास डॉ. अनिल देशपांडे यांनी अनुमोदन दिले. व्हा. चेअरमन पदासाठी श्री. सुनिल शिवाजीराव मगदूम यांचे नांव श्री.अशोक  चराटी यांनी सुचविले. त्यास श्री. सुरेश ईश्वराप्पा डांग यांनी अनुमोदन दिले. नुतन चेअरमन, व्हा. चेअरमन यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

        नुतन चेअरमन श्री. रमेश  कुरुणकर यांनी सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने अण्णा भाऊ व त्यांच्या संस्थापक सहकाऱ्यांनी आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार पारदर्शक व्यवहार करुन बँकेचा नाव लौकीक वाढविणेसाठी सर्व संचालकांना विश्वासात घेवून अण्णा- भाऊ संस्था प्रमुख  श्री. अशोकअण्णा चराटी यांचे मार्गदर्शनाखाली काम करणार असलेचे सांगून बँकेच्या प्रगतीच्या दृष्टीने प्रयत्न करणार असून बँकेला शेड्युल दर्जा प्राप्त करुन देण्याबद्दल प्रयत्न करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले.

         व्हाईस चेअरमन श्री. सुनिल मगदूम यांनी संचालकांनी सोपविलेली जबाबदारी सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पाडू अशी याप्रसंगी ग्वाही दिली. तसेच माजी चेअरमन डॉ. अनिल  देशपांडे व माजी व्हा. चेअरमन व विद्यमान चेअरमन श्री. रमेश  कुरुणकर यांनी संचालक मंडळाने बँकेची प्रगती करणेसाठी आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल आभार व्यक्त केले.

            यावेळी बँकेचे संचालक श्री. विलास नाईक, डॉ. दीपक सातोसकर, श्री. किशोर भुसारी, श्री.बसवराज महाळंक, श्री. मारुती मोरे, श्री. आनंदा फडके, सौ. प्रणिता केसरकर, श्रीमती शैला टोपले, सौ. अस्मिता सबनिस श्री. सुर्यकांत भोईटे, श्री. किरण पाटील, श्री. संजय चव्हाण उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रशांत गंभीर यांनी नुतन चेअरमन, व्हा. चेअरमन यांचे अभिनंदन केले.

आजरा साखर कारखान्यासाठी ६४ जणांचे ६८ अर्ज


                ◼️आजरा : प्रतिनिधी◼️

आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी २६ जणांनी २७ अर्ज दाखल केले आहेत. बुधवार अखेर एकूण ६४ उमेदवारांनी ६८ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

🟣गट क्रं.१ (उत्तुर-मडीलगे)

१) संजय शेणगावे
२)प्रकाश चव्हाण
३) दिपक देसाई
४)मारुती घोरपडे
५)शिरीष देसाई

🟣गट नं २ (आजरा- श्रृंगारवाडी)

१) युवराज पोवार
२) दिगंबर देसाई
३) अशोक चराटी
४) जी.वाय.देसाई
५) जयवंतराव शिंपी
६) विलास नाईक
७) राजाराम होलम
८) विजय देसाई
९) शिवाजी नांदवडेकर
१०)अभिषेक शिंपी (दोन अर्ज)
११) सुभाष देसाई

🟣गट नं ३ ( पेरणोली – गवसे)

१) उदयसिंह पोवार
२) सहदेव नेवगे
३) दशरथ अमृते
४) सदाशिव डेळेकर
५) गोविंद नारायण पाटील
६) मुकूंद तानवडे
७) अजिंक्य मुकुंद तानवडे
८) रामचंद्र पाटील
९)जोतिबा चाळके
१०) सागर कसलकर
११) संग्राम तानवडे

🟣गट नं ४ (भादवण- गजरगांव)

१) एम.के.देसाई
२) संजय मारुती पाटील
३) सुधीरकुमार पाटील
४)राजेंद्र मुरकुटे
५)मनोहर पाटील
६)शिवाजी कुराडे
७)आनंदराव कुलकर्णी

🟣गट नं ५ (हात्तिवडे मलिग्रे)
१) आनंदराव बुगडे
२) विष्णूपंत केसरकर (२अर्ज)
४) शंकर रावळु उगाडे
५) सदाशिव माणगांवकर
६)संभाजी पाटील/हत्तिवडे
७) अनिल फडके
८)शिवाजी लाड
९)तानाजी राजाराम
१०)सुरेश सावंत
११) गोविंद नारळकर

🟣इतर मागासवर्गीय प्रतिनिधी:-

१)गोविंद नारायण पाटील

 २)जनार्दन टोपले
३)राजेंद्र मुरकुटे
४)अभिषेक शिंपी
५)अबुताहेर तकीलदर
६)काशिनाथ तेली

🟣महिला राखीव-

१)सुनिता रेडेकर
२) रचना होलम(२अर्ज)

३)सुजाता पाटील
४)संगीता माडभगत
५)रेखा राजाराम
६) सुमित्रा दीपक देसाई

🟣अनुसूचित जाती जमाती –

१)मलिककुमार बुरुड,

२)दिनेश कांबळे
३)अशोक कांबळे
४)गोविंद जाधव

🟣भटक्या विमुक्त जाती- जमाती

१) संभाजी पाटील/आजरा

२)कल्लाप्पा नाईक

🟣इतर संस्था गट-

१)नामदेव नार्वेकर

अनेकांच्या सावध भूमिका

         आजरा कारखान्याचे माजी अध्यक्ष वसंतराव धुरे, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, मुकुंदराव देसाई, लक्ष्मण गुडूळकर, उमेश आपटे, अल्बर्ट डिसोझा यांनी अद्याप आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले नाहीत. कारखाना निवडणूक प्रक्रियेत नेहमी पुढे असणारी ही मंडळी सध्या मात्र सावध पवित्रा घेत असल्याचे निदर्शनास येत आहे. उद्या शुक्रवारपर्यंत अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शुक्रवार नंतरच प्राथमिक स्वरूप स्पष्ट होईल तर माघारीच्या प्रक्रियेनंतर आघाड्यांची अंतिम रचना स्पष्ट होणार आहे .

मी सभासदच नाही नव्हं…

        साखर कारखाना सभेमध्ये पोटतिडकीने सभासदांची बाजू मांडणारा,प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलनात भाग घेणारा एक कार्यकर्ता मोठ्या इर्षेने सर्व कागदपत्रे घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता गेला. प्रत्यक्षात मात्र त्याचे नाव सभासद यादीत सापडत नसल्याने त्याने अधिक चौकशी केली असता त्याचे सभासदत्व रद्द करण्यात आले असल्याचे सांगण्यात आल्याने तो जागीच उडाला.


३५००/-रुपयांची एक रकमी उचल जाहीर केल्याशिवाय तोडणी यंत्रणा पाठवण्याचे धाडस करू नये…
राजेंद्र गड्ड्यानवर यांच्या सूचना

                 ◼️आजरा : प्रतिनिधी◼️

         मागील ऊस बिलातील येणे हप्ता रुपये ४००/- प्रति टन व यावर्षीची  विनाकपात पहिली उचल ३५००/- प्रमाणे जोपर्यंत साखर कारखानदार जाहीर करत नाहीत तोपर्यंत त्यांनी शेतकऱ्यांच्या उसामध्ये तोडणी यंत्रणा पाठवण्याचे धाडस करू नये, असा इशारा स्वाभिमानीचे राजेंद्र गड्ड्यानवर यांनी आजरा येथे पत्रकार बैठकीत बोलताना दिला.

        यावेळी बोलताना गड्यांवर म्हणाले, गेले काही दिवस माजी खासदार राजू शेट्टी व आपण ढोल वाजवून कारखानदारांना जागे करणे, आत्मक्लेश आंदोलन करणे, पदयात्रा आंदोलन करणे यासारखी आंदोलने करून येणे चारशे रुपये मागील बाकीसह यावर्षीच्या उसाला पहिली उचल ३५००/- रुपये प्रमाणे मिळावी यासाठी आग्रही राहिलो आहोत. शेतकऱ्यांच्या भावनाही या प्रश्नी  तीव्र आहेत. अशावेळी ऊस तोडणी यंत्रणा शेतामध्ये घालण्याची चूक कारखानदारांनी करू नये. त्याऐवजी एफ. आर. पी. बाबत ठोस निर्णय घेऊन उत्पादकांना दिलासा द्यावा.

          अलीकडे बी बियाणे, खते, डिझेल, मजुरी या सर्वांचे दर प्रचंड वाढले आहेत. अशावेळी एफ.आर.पी. मात्र वाढलेली नाही. यावर्षी भात, सोयाबीन, नाचणा, रताळे इत्यादी पिकाचे उत्पादन पावसाअभावी घटले आहे. एकमेव ऊस या पिकावरच शेतकऱ्याचे आर्थिक गणित अवलंबून असल्याने शेतकऱ्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून कारखानदारांनी त्यांना दिलासा द्यावा असे आवाहनही त्यांनी केले.


पालकमत्र्यांनी लक्ष घालावे…

”  जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः कारखाना चालवतात.त्याचबरोबर त्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा माहीत आहेत. आता ना.मुश्रीफ यांनी याप्रश्नी लक्ष घालावे  ” असे    गड्ड्यानवर  यांनी सांगितले.


      यावेळी तानाजी देसाई, सखाराम केसरकर, कृष्णा पाटील, निवृत्ती कांबळे, धनाजीराव पाटील, बसवराज मुत्नाळे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.


पुणे, मुंबई करता आजर्‍यातून जादा बस फेऱ्या

                 ◼️आजरा : प्रतिनिधी◼️

         दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आजरा आगाराकडून मुंबई व पुणे येथे जादा बस फेऱ्या हंगामी स्वरूपात सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती आगार व्यवस्थापकांनी दिली.

         पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या व येणाऱ्या बस फेऱ्यांचे नियोजन पुढीलप्रमाणे असेल…

        आजरा – पुण्याच्या दिशेने… सकाळी६.००,६.३०,९.००, दुपारी २.३० …

      पुण्याहून आज-याच्या दिशेने …            सकाळी ६.००, दुपारी २.००,२.३०,५.००, वाजता

       आजरा- पुणे- वल्लभनगर करीता आजर्‍यातून सकाळी ८.३०, सायं काळी ७.३० वाजता सुटेल तर पुणे आजरा या बस फेऱ्या सकाळी ८.३०, व सायंकाळी ७.३० वाजता रहातील.

       आजऱ्यातून परेलला सकाळी ७.०० व सायंकाळी ७.०० वाजता बस फेरी असेल. तर परेल येथून आज-याकरीता सकाळी ५.५०, व सायंकाळी ७.३० वाजता बस फेरी असेल .आजरा – बोरिवली ही बस फेरी आज-यातून ४.३० वाजता तर बोरीवलीहून आज-याच्या दिशेने ४.०० वाजता सुटेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.


बाजारपेठेत ‘ ट्रॅफिक जाम ‘


                  ◼️आजरा:प्रतिनिधी◼️

          आजरा बाजारपेठेमध्ये ट्राफिक जाम होण्याचे प्रकार वाढले असून वारंवार होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे शहरवासीय त्रस्त झाले आहेत.

          मुळातच आजरा शहराच्या मुख्य बाजारपेठेतील रस्ता हा अरुंद आहे. त्यातच दुकानदारांनी मांडलेले दुकाने, दुकानासमोर उभ्या असणाऱ्या चारचाकी व दुचाकी गाड्या यामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी होताना दिसते. नगरपंचायत व पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वाहतूक सुरळीत करण्याची गरज निर्माण झाली आहे.

          या वाहतूक कोंडीचा त्रास नाहक शाळकरी मुले व वयोवृद्ध नागरिकांना सहन करावा लागत आहे.


उदयनीधी स्टॕलीन यांचा निषेध

                     ◼️आजरा:प्रतिनिधी◼️

        सनातन हिंदू धर्माविषयी आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल आजरा येथे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी तामिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांचा निषेध करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

        याबाबतचे लेखी निवेदन आजऱ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांना देण्यात आले असून यावेळी ज्येष्ठ हिंदुत्ववादी कार्यकर्ते परशुराम बामणे, संदीप पारळे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


सत्कार
विलास जोशिलकर


         मेंढोली-बोलकेवाडी ग्रुप ग्रामपंचायतच्या नूतन सरपंचपदी निवड झाल्याबद्दल विलास जोशीलकर यांचा शिवसेनेचे विधानसभा संपर्कप्रमुख दिनानाथ चौगुले यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी भाऊ सावरकर, जितेंद्र नांदवडेकर, श्रीकांत बामणे उपस्थित होते.


निधन वार्ता
उत्तम कारेकर


आजरा येथील सराफी व्यावसायिक उत्तम विष्णुपंत कारेकर (वय ५०) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगी,जावई,दोन मुले असा परिवार आहे.


संबंधित पोस्ट

साधनाताई : प्रभाग सहाच्या विकासाचे नवे पर्व

mrityunjay mahanews

लक्ष्मण कुंभार – परळकर यांचे निधन…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

डिस्टिलरी प्रकल्पासह सहवीज प्रकल्पाशिवाय कारखान्यांना पर्याय नाही : खा. प्रा.संजय मंडलिक

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!